एकूण 12 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
पुणे: माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळात स्वीकारलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यन स्वामी यांनी केली आहे.  'मला वाटतं अरुण जेटली यांच्या कार्यकाळात राबवलेल्या चुकीच्या धोरणांमुळेच ही मंदी आली आहे. तीच काही...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली - सलग तीन पतधोरणांमध्ये रेपो दरात कपात केल्यानंतर बॅंकांकडूनही लवकरच व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना दिला जाईल, अशी अपेक्षा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नजीकच्या काळात गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज स्वस्त होतील, असे त्यांनी म्हटले आहे....
जून 07, 2019
मुंबई - मंदावलेल्या अर्थचक्राला गतिमान करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गुरुवारी (ता. ६) रेपोदरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. सलग तिसऱ्या पतधोरणात व्याजदर कमी केल्याने रेपो दर ६ टक्‍क्‍यांवरून ५.७५ टक्के झाला आहे. रेपो दर गेल्या नऊ वर्षांतील नीचांकावर आला असून, यातून नजिकच्या काळात गृह आणि...
डिसेंबर 17, 2018
मुंबई - रोजगार निर्मितीला बसलेली खीळ, देशांतर्गत आर्थिक घडामोडी आणि बदलांनी ग्राहकांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाल्याचा निष्कर्ष रिझर्व्ह बॅंकेच्या सर्वेक्षणात काढण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्यात इंडियन कंझ्युमर कॉन्फिडन्स इण्डेक्‍समध्ये घट झाली आहे. अर्थव्यवस्थेची मंदीच्या दिशेने वाटचाल...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - महागाई काही प्रमाणात कमी झाली असली, तरी चलन बाजारातील रुपयाची दयनीय स्थिती आणि तूट वाढण्याची शक्‍यता असल्याने रिझर्व्ह बॅंकेकडून आगामी पतधोरणात तिसऱ्यांदा व्याजदर वाढवण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी जून आणि ऑगस्टमधील पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्‍सची आगेकूच कायम आहे. मंगळवारी (ता.३१) निर्देशांकात ११२.१८ अंशांची वाढ झाली आणि तो ३७ हजार ६०६ अंशांच्या नव्या उच्चांकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत सलग चौथ्या सत्रात वाढ झाली. दिवसअखेर निफ्टी ३६.९५ अंशांच्या वाढीसह ११ हजार ३५६ अंशांवर...
जुलै 31, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण समितीच्या बैठकीला आजपासून सुरवात झाली असून, चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी द्विमाही बैठक आहे. पाच महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोचलेली महागाई तसेच, तीन वर्षांच्या उच्चांकावर असलेले इंधनाचे दर पाहता या बैठकीत व्याजदर...
एप्रिल 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीची दोन दिवसीय बैठक बुधवारपासून सुरू झाली. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वाढत असल्याने व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता कमी आहे.  पतधोरण आढावा बैठकीतील निर्णय उद्या (गुरुवार) रिझर्व्ह बॅंकेकडून जाहीर होतील. चालू...
एप्रिल 01, 2018
नवी दिल्ली - सार्वजनिक क्षेत्रातील अलाहाबाद बॅंकेने कर्जदरात ०.४५ टक्के कपात केली आहे. यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला असून, त्यांचा कर्जाचा हप्ता कमी होणार आहे. बॅंकेने बेस रेट आणि बेंचमार्क प्राईम लेंडिंग रेट(बीपीएलआर)मध्ये ०.४५ टक्के कपात केल्याचे आज जाहीर केले. बॅंकेने बेस रेट ९.६० टक्‍क्‍...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेच्या ८ टक्के व्याजदराच्या करपात्र सेव्हिंग्ज बाँडमध्ये नवी गुंतवणूक घेणे बंद केले असले, तरी त्याच्याजागी ७.७५ टक्के व्याजदराचे नवे बाँड आणले जाणार आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभागाने हे स्पष्ट केले. भारत सरकारचे ८ टक्के व्याजदराचे करपात्र सेव्हिंग्ज बाँड बंद...
डिसेंबर 06, 2017
मुंबई: रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) आज (बुधवार) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला असून रिव्हर्स रेपो दरदेखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. तसेच रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले आहे. बँकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष...
डिसेंबर 06, 2017
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक मंगळवारपासून सुरू झाली. या बैठकीमध्ये व्याजदर कपातीचा निर्णय होण्याची शक्‍यता नसल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची आढावा बैठक दोन दिवस चालणार आहे. या बैठकीकडे उद्योग क्षेत्र आणि शेअर...