एकूण 23 परिणाम
जुलै 05, 2019
नवी दिल्ली : जागतिक अर्थव्यवस्थेच्या मंदगतीचे प्रमाण वर्तमान आर्थिक वर्षात (2019-2020) आणखी घसरणार असले तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासवाढीचा दर सात टक्के राहणार असल्याचा दावा संसदेला आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पपूर्व पाहणी अहवालात करण्यात आला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती पाहता...
जून 07, 2019
मुंबई - चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळवल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने विकासाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे बॅंकांसाठीचा आरबीआयचा कर्जदर ५.७५ टक्के झाला आहे. मागील तीन पतधोरणांत रेपो दर पाऊण टक्‍क्‍याने (०.७५ टक्के) कमी झाला असला, तरी...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 06, 2019
मुंबई - मरगळलेल्या अर्थचक्राला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेनुसार गुरुवारी (ता. ४) प्रमुख व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात केली. यामुळे रेपोदर ६ टक्‍के झाला आहे. सलग दुसऱ्या पतधोरणात बॅंकेने व्याजदर कमी केल्याने नजीकच्या काळात गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी होण्याची शक्‍यता...
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...
ऑक्टोबर 01, 2018
पुणे : आक्टोबर महिन्याच्या सरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम होणार आहे. काही मुद्दे सर्वासामान्यांच्या लाभाचे तर काही मुद्दे त्यांच्या गैरसोयीचे आहेत. या बाबी विस्ताराने समजून घेऊया पीपीएफ आणि अल्पबचत योजनांमधील व्याजदर  अल्पबचत...
ऑक्टोबर 01, 2018
देशातील बॅंका; तसेच बिगरबॅंकिंग संस्थांच्या ठेवींचे व्याजदर अलीकडच्या काळात वाढले होते. परंतु, दुसरीकडे, सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढताना दिसत नव्हते. सुरक्षिततेच्या निकषाचा विचार केला, तर अल्पबचत योजना नेहमीच आघाडीवर राहिलेल्या आहेत....
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी ०.४ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ केली आहे. बॅंकांकडून व्याजदरात होत असलेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे.  अल्पबचत योजनांवरील व्याजदराचा तिमाही आढावा घेण्यात येतो. चालू आर्थिक वर्षातील ऑक्‍टोबर...
जुलै 03, 2018
नवी दिल्ली - केंद्र सरकारने टपाल खात्यातील विविध गुंतवणूक योजना, किसान विकास पत्र, सुकन्या समृद्धी आदी अल्पबचत योजनांवरील व्याजदर कायम ठेवले आहेत. १ जुलैपासून अल्पबचतीचे सुधारित व्याजदर लागू झाले. मात्र, सलग दुसऱ्या तिमाहीत कोणतीही वाढ न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये...
जून 05, 2018
मुंबई - अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईचा आगडोंब उसळला असून, रिझर्व्ह बॅंकेवरील दबाव वाढला आहे. महागाईची चिंता लागून राहिलेल्या ‘आरबीआय’च्या पतधोरण समितीची द्वैमासिक बैठक आजपासून मुंबईत सुरू झाली. या बैठकीत महागाईच्या पार्श्‍वभूमीवर पतधोरणात रेपो दरवाढ अटळ असल्याचे बोलले...
एप्रिल 23, 2018
गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि परताव्याचं प्रमाण वेगवेगळं...
एप्रिल 06, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) पतधोरणात स्थिर ठेवलेले व्याजदर आणि चलनवाढीचा कमी केलेला अंदाज यामुळे शेअर बाजाराने गुरुवारी उसळी घेतली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५७७ अंशांची झेप घेऊन ३३ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १९६ अंशांची...
फेब्रुवारी 19, 2018
सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) ही योजना करबचत व करसवलत यासाठी मध्यमवर्गीयांमध्ये अनेक वर्षे लोकप्रिय असून, एक सुरक्षित व आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून मान्यता पावलेली आहे. या योजनेचा हेतू गुंतवणुकीच्या माध्यमातून प्राप्तिकर सवलतींसह वाजवी परतावा देऊन अल्पबचतीस प्रोत्साहन देणे हा होय. केंद्र...
जानेवारी 23, 2018
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ४८ वी आर्थिक परिषद दावोस (स्वित्झर्लंड) येथे उद्यापासून (मंगळवार) होत आहे. या परिषदेच्या सहअध्यक्ष होण्याचा मान माणदेशी महिला बॅंक व फाउंडेशनच्या संस्थापिका चेतना सिन्हा यांना मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत जागतिक स्तरावर चर्चा होणाऱ्या ठरावांसंदर्भात ‘सकाळ’साठी...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : अल्पबचत योजनांवरील व्याजदरात केंद्र सरकारने 0.2 टक्के कपात केली असून, ही कपात जानेवरी ते मार्च या तिमाहीसाठी असेल. सरकारच्या या निर्णयामुळे ठेवींवरील व्याजदरात बॅंकांकडून कपात होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे.  राष्ट्रीय बचतपत्र, सुकन्या समृद्धी योजना, किसान विकासपत्र आणि सार्वजनिक...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने (एमपीसी) बुधवारी जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये रेपो दर स्थिर ठेवले. त्यामुळे अर्थतज्ज्ञांच्या रिझर्व्ह बॅंकेकडून व्याज दरकपातीच्या अपेक्षा पुन्हा फोल ठरल्या. बॅंकांमधील बुडीत कर्जाचे प्रमाण आणि महागाईवर लक्ष ठेवून असल्याचे रिझर्व्ह बॅंकेकडून...
सप्टेंबर 22, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50...
जुलै 24, 2017
शेअर बाजाराचा राष्ट्रीय निर्देशांक-‘निफ्टी’ बहुचर्चित १० हजार अंशाला गवसणी घालण्याच्या तयारीत असताना, बाजारात ‘करेक्‍शन’ येण्याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे. या भीतीपोटी नफावसूल करून बाजारापासून दूर राहणे पसंत केले जाते. हे योग्यही आहे. परंतु, बाजारात मोठे ‘करेक्‍शन’ लगेच सुरू होण्याची शक्‍यता...
जून 30, 2017
सर्वसामान्य गुंतवणूकदारांना फटका बसणार  नवी दिल्ली : केंद्र सरकारने अल्प बचत योजनांच्या व्याजदरात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी 0.10 टक्का कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या वेळीदेखील सरकारने व्याजदरात कपात केली होती. सलग दुसऱ्या तिमाहीत दरकपात झाल्याने सर्वसामान्य...