एकूण 21 परिणाम
डिसेंबर 31, 2018
सरते 2018 हे वर्ष आर्थिक आघाडीवर अस्थिर वर्ष ठरले. 2019 मध्ये मात्र काही सकारात्मक घटना घडतील. फेडरल रिझर्व्ह दोनदा व्याजदर वाढवेल, ज्यामुळे बाजारात तरलता राहील. चीन आणि अमेरिका व्यापारयुद्धाचा भारताला फायदा होऊ शकतो. शेअर बाजार सध्याच्या पातळीवरून 10 टक्‍क्‍यांपर्यंत वर जाऊ शकतो....
ऑक्टोबर 22, 2018
गेले काही दिवस शेअर बाजारात होत असलेली पडझड पाहून काही म्युच्युअल फंड गुंतवणूकदार घाबरून गेल्याचे दिसून येत आहे. परिणामी, हे लोक आपली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक भीतीपोटी काढून घेत असल्याचेही दिसून येत आहे. पण त्यांनी असे करणे योग्य आहे का, याचा विचार करूया. अस्थिर स्थितीत काय करावे? गेले काही दिवस...
ऑक्टोबर 07, 2018
शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषत: एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं "परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट...
मे 26, 2018
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित दोनदिवसीय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’ शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) सकाळी ११ ते सायं ८ पर्यंत चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर एक्‍झिबिशन सेंटर येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे....
एप्रिल 23, 2018
गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार हे दिशादर्शकाचं काम करतात. गुंतवणूकदारांना संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि यशस्वीरीत्या गुंतवणूक करण्यासाठी त्यातून योग्य मार्गदर्शन मिळत असतं. गुंतवणुकीचे वेगवेगळे प्रकार उदाहरणार्थ इक्विटी, डेट, रिअल इस्टेट, सोनं यामध्ये असणारं जोखमीचं आणि परताव्याचं प्रमाण वेगवेगळं...
मार्च 23, 2018
पुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान...
फेब्रुवारी 26, 2018
दु:खेष्वनुद्विग्नमना: सुखेषु विगतस्पृह: । वीतरागभयक्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते।। अर्थ - सुख आणि दु:ख ज्याच्यासाठी समान आहेत, ज्याच्या मनामधील मोह, भय हे नाहीसे झालेले आहे, असा माणूस स्थिर बुद्धी असलेला मुनी म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१८ पासून भारतीय शेअर बाजार ७ टक्के वाढला आणि केंद्रीय...
नोव्हेंबर 27, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ गेले काही महिने सातत्याने १० हजार अंशांच्या वर टिकून आहे आणि ‘निफ्टी’च्या पीई रेशोने २६ चा टप्पा गाठला आहे. १९९९-२००० च्या तेजीमध्ये हा पीई २८.५, तर २००८ च्या तेजीमध्ये २८.२ पर्यंत पोचला होता. यामुळे सध्याचा पीई २६ असल्याने अनेक जण गुंतवणूक करण्यास धजावत...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
नोव्हेंबर 03, 2017
वाहनकर्जाच्या प्रकरणात २० टक्क्यांची वाढ; गृहकर्जांना सकारात्मक प्रतिसाद पुणे - वाहनकर्जामध्ये १७ ते २० टक्‍क्‍यांची वृद्धी आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून महिन्याला गृहकर्जासह अन्य पंधराशे ते अठराशे कर्ज प्रकरणांना देण्यात येत असलेली मंजुरी यामुळे नोटाबंदीनंतर बॅंकिंग व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली....
सप्टेंबर 25, 2017
पहिल्या तिमाहीतच आठ प्रमुख शहरांतील उलाढाल चार ते सहा टक्‍क्‍यांनी वाढली पुणे - नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष पूर्ण होण्यास दीड महिना शिल्लक आहे; मात्र त्यापूर्वीच बांधकाम क्षेत्राला ‘अच्छे दिन’ येत असल्याचे दिसत आहे. २०१७-१८ या वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच देशातील आठ प्रमुख शहरांतील सरासरी उलाढाल...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
जुलै 21, 2017
जागतिक परिस्थितीच्या तुलनेत विचार करता देशाची अर्थव्यवस्था सध्या वेगाने वाढत आहे. साडेसहा ते सात टक्के असलेला आर्थिक विकास दर आठ ते नऊ टक्‍क्‍यांपर्यंत उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. निर्यातवाढीसाठीची धडपड हा त्याचाच भाग. संरक्षण सामग्रीबाबत स्वयंपूर्णता मिळवणे दूरची गोष्ट असली तरी...
जून 18, 2017
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्‍स) दीड महिन्यापेक्षा जास्त काळ तीस हजारांच्या पुढंच आहे आणि आता तर त्यानं ३१,२६२ अंशांची विक्रमी पातळीही गाठली आहे. सेन्सेक्‍सची ही आगेकूच कशामुळं सुरू आहे, शेअर बाजारातली तेजी पुढं किती काळ कायम राहील, सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं आदी गोष्टींचं...
मे 25, 2017
पुणे - ‘नोटाबंदी, केंद्रीय अर्थसंकल्प व त्यानंतर ‘रेरा’ व ‘जीएसटी’ यांसारख्या काही महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक चालना मिळत आहे. त्यामुळे सध्याचा काळ हा घर घेण्यासाठी योग्य आहे,’’ असे मत ‘क्रेडाई-महाराष्ट्र’चे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी व्यक्त केले.   कटारिया म्हणाले, ‘‘...
एप्रिल 01, 2017
नव्या आर्थिक वर्षातील बदलांची आजपासून अंमलबजावणी पुणे - प्राप्तिकराच्या दरात कपात, विवरणपत्राचा सोपा अर्ज, अल्पबचत योजनांच्या व्याजदरात घट, आरोग्य व वाहन विम्याच्या हप्त्यात वाढ, रोखींच्या व्यवहारांवर बंधने आणि काही शहरांत रेडी रेकनरच्या दरात वाढ अशा विविध अनुकूल-प्रतिकूल बदलांना नव्या (...
मार्च 29, 2017
औरंगाबाद - साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा हा एक मुहूर्त मानला जातो. यानिमित्त घरामध्ये नव्या वस्तूचे आगमन हमखास होते. नोटाबंदीनंतर बाजारातील हालचाली मंदावल्या होत्या. गुढीपाडव्यानिमित्त वाहन, रिअल इस्टेट, सोने-चांदी आणि इलेक्‍ट्रॉनिक बाजारामध्ये तेजी बघायला मिळाली. दरवर्षीपेक्षा यंदा एकूण बाजारातील...
मार्च 28, 2017
औरंगाबाद - गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरवात. या मुहूर्तावर इलेक्‍ट्रॉनिक, रिअल इस्टेट, वाहन आणि सोने-चांदी खरेदी करणे चांगले मानले जाते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी नवी वस्तू घरात येणे सकारात्मक प्रतीक समजले जाते. त्यामुळे नोटाबंदीच्या तब्बल सहा महिन्यांनंतर बाजारात तेजीचे संकेत मिळाले आहेत. ...
मार्च 03, 2017
कंपन्यांच्या मुदत ठेवींकडे आजकाल अनेकजण वळताना दिसत आहेत. बॅंकांपेक्षा थोडा अधिक व्याजदर मिळत असल्याने अनेकांना त्याचे आकर्षण वाटते; पण कंपन्यांमधील गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित आहे का, असा प्रश्‍न कोणी विचारला तर याचे उत्तर दुर्दैवाने "नाही' असेच येते. आज आपल्या आजूबाजूला असे...
जानेवारी 02, 2017
आता तातडीचे आव्हान आहे ते चलनतुटवड्याची परिस्थिती कार्यक्षमतेने हाताळून विकासाची लय फार बिघडू न देण्याचे; तर दूरगामी कसोटी आहे ती आर्थिक सुधारणांची वाटचाल चालू ठेवण्याची. यासंदर्भात पंतप्रधानांच्या भाषणाने अपेक्षाभंग केला. फुंकर घातल्याने वेदना शमते असे नाही; परंतु दाह कमी झाल्यासारखे वाटते....