एकूण 60 परिणाम
जुलै 16, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पावनखिंडीत फरसबंदी मार्गाचे काही अवशेष शिल्लक आहेत, काळाच्या ओघात नष्ट होत असलेले फरसबंदी मार्गातील अवशेषाचे संवर्धन करु, असा विश्वास खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केला. संसद आदर्श ग्राम योजना येळवणजुगाई अंतर्गत पांढरेपाणी...
जुलै 12, 2019
‘अठरा दिवस वारीत चालताना आत्मानंद घेतला; पण पंढरीत आल्यानंतर एकच म्हणावेसे वाटते, पावलो पंढरी, वैकुंठ भुवनी...’, अशी भावना व्यक्त केली हरिदास बंडे या युवा वारकऱ्याने. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याबरोबर हरिदास पंढरीच्या भूमीत पोचला, तेव्हा त्याच्याशी संवाद साधला. तो म्हणाला, ‘‘आज...
जुलै 10, 2019
भंडीशेगाव - ‘लावून मृदुंग श्रुती टाळघोष, सेवू ब्रह्मरस आवडिने,’ हा संतांनी दिलेला मंत्र वारीत वारकरी मोठ्या आनंदाने जगतो. पंढरीच्या वारीच्या वाटचालीत गायिलेले गाणे आत्मानंदाची अनुभूती देते, ही भावना आहे जालना जिल्ह्यातील गायक रविमहाराज मदने यांची. संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात दिंडी...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जुलै 08, 2019
नीरा नरसिंहपूर - नीरा नदी कोरडी असल्याने संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराटी (ता. इंदापूर) येथे टॅंकरच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. महाआरती व पूजेनंतर पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्यात अकलूज येथे प्रवेश केला. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी सोहळ्यास निरोप देण्यात आला...
जुलै 07, 2019
नातेपुते - वारीच्या वाटचालीत आज पाऊस झाला. गावाकडेही पाऊस सुरू आहे. मात्र, पेरण्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. शेतकऱ्यांचे जीवन सुखी व्हावे, यासाठी दीर्घकालीन पावसाची आणि सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर समीप आल्याने विठ्ठलाच्या भेटीची आस लागली आहे, अशी भावना यवतमाळ...
जुलै 06, 2019
नाशिकः आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथून मार्गस्थ होणाऱ्या संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांचा रथ आणि पालखी रोज सकाळी मुक्कामाच्या ठिकाणी विविध मंडळातील भाविकांतर्फे वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्पांनी, हार-तुऱ्यांनी सुशोभीत करण्यात येते. रोज सकाळी नव्या उत्साहाने निघणाऱ्या पालखीची...
जुलै 06, 2019
दुधेबावी - ‘ज्ञानोबा- माउली, माउली- तुकाराम’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी बरड (ता. फलटण) येथे भाविकांनी वरुण राजाच्या साक्षीने उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा आज बरड येथे मुक्कामी असून, उद्या (शनिवारी) सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे. ...
जुलै 05, 2019
फलटण -  संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे येथे आज सायंकाळी पाच वाजता मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. जिंती नाक्‍यावर पालिका प्रशासनासह विविध संस्थांच्या वतीने पालखीला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी मनोभावे स्वागत केले.  तरडगावचा मुक्काम संपवून संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा आज सकाळी फलटणकडे येत असताना...
जुलै 05, 2019
निमगाव केतकी -  हरीनामाचा जप करीत व टाळ-मृदंगांच्या गजरात सव्वीस किलोमीटरचा टप्पा पार करीत गुरुवारी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विड्याच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत मुक्कामी दाखल झाला. पान उत्पादक शेतकऱ्यांनी मोफत विड्यांच्या पानांचे वाटप केले. सवंदडीच्या माळावर भजनी मंडळी,...
जुलै 03, 2019
बारामती-  बुऱ्हाणपुराच्या पठारावरील मोकळ्या काळ्याशार रानात अनेक राहुट्या पडल्या होत्या. त्यात काही राहुट्यांनी भजनांची लय पकडली होती. नांदेडच्या दिंडीत पांडुरंग महाराज देगलूरकर या  युवकाच्या भजनांनी साऱ्याचे लक्ष वेधले जात होते. वारीत येऊन प्रत्यक्ष माउलीला भेटल्याचा आंनद होतो, अशी...
जुलै 03, 2019
सोमेश्वरनगर - टाळ-मृदंगांच्या आणि विठ्ठलनामाच्या टिपेला पोचलेल्या गजरात नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचा मानाचा नीरास्नान सोहळा मंगळवारी पार पडला. यानंतर पुणे जिल्ह्याचा निरोप घेत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. तत्पूर्वी, पिंपरे खुर्द ग्रामस्थांची...
जुलै 03, 2019
लोणंद - श्री संत ज्ञानेश्‍वर महराजांच्या पालखी सोहळ्याचे आज दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात अगमन झाले. त्या वेळी जिल्ह्याच्या वतीने पालखी सोहळ्याचे पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत करण्यात आले. त्या वेळी जिल्ह्यातील पदाधिकारी, अधिकारी व भाविकांनी मोठी गर्दी केली होती...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’...
जून 28, 2019
पुणे - पंढरीच्या वाटेवर असलेला वैष्णवांचा मेळा विसावला आणि अवघी पुण्यनगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली. सकाळपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत टाळ-मृदंगांच्या तालावरील अभंगाचे सूर गुरुवारी पुणेकरांच्या कानी पडले. पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळीच पुणेकर भाविकांची पावले पालखी विठोबा आणि निवडुंगा...
जून 28, 2019
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असतानाच बहुप्रतीक्षित पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात विसावलेला वैष्णवांचा मेळा पावसाच्या आगमनाने सुखावला. काही ठिकाणी वारकऱ्यांची दुपारच्या विश्रांतीची गैरसोय झाली खरी. पण...
जून 27, 2019
पुणे - ‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात स्वागत केले. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांची...
जून 27, 2019
पिंपरी - आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. २६) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. आकुर्डी येथे मंगळवारी (ता. २५) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन व जागरण झाले. पहाटे आकुर्डी येथील विठ्ठल...
जून 27, 2019
आळंदी - माउली नामाचा अखंड गजर, भगव्या पताका उंचावत लाखो वैष्णवांसह पालखी बुधवारी सकाळी आळंदीतून पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. निरोप देण्यासाठी आळंदीकर आणि पंचक्रोशीतील भाविक वडमुखवाडीतील थोरल्या पादुकापर्यंत आले होते. पालखी थोरल्या पादुकापासून पुण्याकडे मार्गस्थ झाल्यावर आळंदीकरांनी माउलींना...
जून 27, 2019
भोसरी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध...