एकूण 87 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - पाचगावमधील शिल्पकाराने साकारलेले बुद्धाचे शिल्प मॉस्को (रशिया) येथील निकोलस रुरीच म्युझियममध्ये असेल तर नक्कीच आश्‍चर्य वाटेल. पण, ही वस्तुस्थिती आहे. सतीश वसंतराव घारगे या अभिजात शिल्पकाराच्या हाताच्या बोटांची ती जादुई करामत आहे. विविध राष्ट्रपुरुषांचे, नेत्यांचे पुतळे तयार करण्यात हा...
जुलै 12, 2019
पुणे - विश्‍वातील प्रत्येक प्राणिमात्राबद्दल मैत्रीभाव बाळगण्याची शिकवण आपल्याला भगवान महावीर यांनी दिली आहे. तसे झाल्यास आपल्या कुटुंबापासून जागतिक पातळीपर्यंत शांतता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन आचार्य शिवमुनीजी महाराज यांनी गुरुवारी येथे केले. आचार्य शिवमुनीजी...
जुलै 08, 2019
सेवे लागी सेवक  झालो........ तुमच्या लागलो निज चरणा...... तुकोबारायांच्या या अभंगाची आठवण पदोपदी होत होती. त्याला कारणही तसेच होते. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळा अकलूजमध्ये पोचला. त्यावेळी त्याचे जंगी स्वागत झाले. त्यात पोलिसही मागे नव्हेत. त्यांच्या हातात आज काठी नव्हती. होता तो नमस्कार होता....
जून 29, 2019
पुणे - ‘देव भेटेल तुजला आपुल्या घरी, आई-वडिलांच्या पावन चरणावरी...’ चिमुकले वारकरी टाळ-मृदंगाच्या तालात गात होते आणि त्यांच्याप्रमाणेच ‘आई-वडिलांसाठी चार पावलं वारीत चाला’, या ‘सकाळ’च्या आवाहनाला प्रतिसाद देत आलेले असंख्य पुणेकरही हीच भावना जागवत होते.  आई-वडिलांच्या सेवेत मग्न असल्याने प्रत्यक्ष...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’...
जून 28, 2019
वीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पूर्वेकडील जिब्राल्टर अशी सार्थ बिरुदावली मिरवणारा रायगड हा महाराष्ट्रातला दुर्गदुर्गेश्‍वर आहे. चहूबाजूनं तासलेले कडे, या कड्यांवर न उगवणारी गवताची काडी, अभेद्य, बलाढ्य आणि अजिंक्‍य असलेला हा रायगड. दक्षिणेतल्या हिंदू साम्राज्याची राजधानी असलेल्या देवगिरीच्या...
जून 28, 2019
पुणे - पंढरीच्या वाटेवर असलेला वैष्णवांचा मेळा विसावला आणि अवघी पुण्यनगरी विठ्ठलाच्या नामस्मरणाने दुमदुमली. सकाळपासूनच शहराच्या वेगवेगळ्या भागांत टाळ-मृदंगांच्या तालावरील अभंगाचे सूर गुरुवारी पुणेकरांच्या कानी पडले. पालख्यांच्या दर्शनासाठी सकाळीच पुणेकर भाविकांची पावले पालखी विठोबा आणि निवडुंगा...
जून 27, 2019
पुणे - ‘ज्ञानेश्‍वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करीत लाखो वैष्णवांच्या साथीने पुण्यनगरीत बुधवारी दाखल झालेल्या संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालख्यांचे पुणेकरांनी प्रथेप्रमाणे दिमाखात स्वागत केले. पालख्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांची...
जून 27, 2019
पुणे - ‘‘स्वतःसोबतच इतरांचेही जीवन प्रकाशमान व्हावे, या विचारांनी गरजू विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे,’’ असे प्रतिपादन मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘राजर्षी शाहू...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील...
जून 26, 2019
पिंपरी : आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात बुधवारी (ता. 26) पादुकांची महापूजा आणि आरती झाली. त्यानंतर पहाटे पाच वाजता संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली.  आकुर्डी येथे मंगळवारी (ता. 25) रात्री पालखीने विसावा घेतल्यावर रात्री कीर्तन व जागरण झाले. पहाटे आकुर्डी येथील...
जून 25, 2019
आळंदी - कपाळी केसरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा आणि खांद्यावर भगव्या पताका घेत राज्यभरातून आलेल्या सुमारे साडेचारशेहून अधिक दिंड्यांतील लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पालखीचे प्रस्थान मंगळवारी (ता. २५) सायंकाळी होणार आहे. दुपारी बारापर्यंत माउलींचे समाधी दर्शन भाविकांना खुले ठेवण्यात येईल....
जून 25, 2019
पिंपरी - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २६) पुण्याकडे मार्गस्थ होणार असल्याने वाहतुकीत बदल केला आहे. पालखी आकुर्डीतील विठ्ठल मंदिर ते खंडोबामाळ चौकातून जाईपर्यंत निगडी जकात नाका ते खंडोबा माळदरम्यान ग्रेड सेपरेटरमधील दोन्ही बाजू व पुण्याकडील सेवारस्ता वाहतुकीसाठी आवश्‍...
जून 24, 2019
पिंपरी - संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी शहर पोलिस वाहतूक विभागाने बुधवारपर्यंत (ता. २६) वाहतुकीत बदल केले आहेत. काही रस्ते बंद केले असून त्याची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.  अशी असेल व्यवस्था पालखी मंगळवारी (ता. २५) देहू...
जून 24, 2019
मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित...
जून 22, 2019
पिंपरी : संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवार (ता. 21) ते बुधवार (ता. 26) पर्यंत पुणे-आळंदी रस्त्यावर वाहतुकीत बदल केले आहेत. पालखी देहूफाटा-आळंदी चौक ते मॅक्‍झीन चौक पास होईपर्यंत खालील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुणे-आळंदी रस्ता (मॅक्‍झीन चौक), मोशी-...
जून 21, 2019
आळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 17, 2019
पुणे - घोरपडी रस्त्यावरील दक्षिण मुख्यालय (सदर्न कमांड) परिसरातील युद्ध स्मारक (वॉर मेमोरिअल) या जागी असलेल्या संग्रहालयात फेरफटका मारताना पावलोपावली थरारून जायला होतं. विशेषत: येथे दर शनिवारी हुतात्मा सैनिकांना दिल्या जाणाऱ्या मानवंदनेत नागरिक सहभागी होतात, ते क्षण आयुष्यभरासाठी मनावर कोरले जातात...
जून 10, 2019
पिंपरी - आषाढी वारीनिमित्त देहू येथून संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचा पालखी सोहळा अनुक्रमे २४ व २५ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. त्यात सहभागी झालेल्या वैष्णवांचा मेळा टाळ-मृदंगाचा गजर आणि ‘ज्ञानोबा-तुकोबांचा’ जयघोष करीत पिंपरी-...