एकूण 62 परिणाम
जुलै 17, 2019
कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत उद्या (ता. 17)...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते,...
जुलै 10, 2019
औरंगाबाद - छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्रांती चौकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यानुसार सोमवारी (ता. आठ) रात्री पुतळा स्थलांतराचे काम सुरू करण्यात आले होते. तब्बल आठ तासांनंतर तारेवरची कसरत करीत तीन टन वजनाचा हा पुतळा मंगळवारी (ता. नऊ) सकाळी ८.३०...
जुलै 07, 2019
काही भागात दोन दिवस पाणी नाही मुंबई - मुंबई पालिकेने काही विभागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने काही विभागातील पाणी पूरवठा खंडित करण्यात येणार आहे. दिनांक 9 आणि 10 जुलै रोजी तानसा (प) या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे के/पूर्व, एच/पूर्व आणि जी/उत्तर विभागातील पाणीपुरवठा...
जून 28, 2019
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असतानाच बहुप्रतीक्षित पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात विसावलेला वैष्णवांचा मेळा पावसाच्या आगमनाने सुखावला. काही ठिकाणी वारकऱ्यांची दुपारच्या विश्रांतीची गैरसोय झाली खरी. पण...
जून 19, 2019
देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य देऊळवाड्याबाहेरील परिसरात, तसेच सोहळ्यातील चांदीच्या...
जून 19, 2019
आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदा पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे. सर्व दिंड्यांना प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. पालखी मार्गावरील ग्रामपंचायती आणि पालिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून रोपांचे वाटप करणार असल्याची माहिती...
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 15, 2019
रत्नागिरी - रयतेसाठी झटणारा राजा संभाजी महाराज यांना कसबा गावी कैद करण्यात आले होते. त्यामुळे कसबा या गावाला एक वेगळे महत्त्व आहे. कसबा गावात अंदाजे ३०० ते ३५० मंदिरे आहेत. कसबा येथे संभाजी महाराजांच्या स्मारकाचे कामही सुरू आहे. कसबा हे गाव पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करून ते जगाच्या...
मे 07, 2019
बांबवडे - शिवकालीन विहिरीत आजही असलेला उत्तम पाण्याचा स्रोत म्हणजे शिवकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना! पांढरपाणी (ता. शाहूवाडी) येथील शिवकालीन विहीर आजही पिण्याच्या पाण्याकरिता गावासाठी वरदान ठरत आहे. जीर्ण झालेल्या या विहिरीचे संवर्धन होण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. पांढरपाणी हे गाव इतिहासात...
एप्रिल 22, 2019
पुणे - पुणे हा काँग्रेस आघाडीचा बालेकिल्ला राहिला आहे. गेल्या पाच वर्षांत शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. हे चित्र बदलण्यासाठी काँग्रेसचा एक निष्ठावंत सैनिक म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असून, पुणेकरांचा आपल्याला मनापासून पाठिंबा मिळेल, असा विश्‍वास काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी ‘सकाळ...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
एप्रिल 13, 2019
मुंबई - पावसाळ्यात पूल पडण्याचा धोका असल्यामुळे महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईतील धोकादायक पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाणार असून, त्यासाठी प्रशासनाने पुन्हा निविदा मागविल्या आहेत. शहर विभागातील 77 पुलांचे नव्याने स्ट्रक्‍चरल ऑडिट केले जाईल. त्यामुळे मुंबईतील धोकादायक पुलांच्या दुरुस्तीचे काम...
मार्च 16, 2019
माणसाचा जीव किती स्वस्त असू शकतो आणि जगणं किती बेभरवशी असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंबई! प्रशासनाच्या कृपेमुळे मुंबईतील कोट्यवधी जनता रोज मृत्युच्या सावटाखाली जगत असते आणि तरीही रोज पिचत-झगडत असते. संध्याकाळची वेळ.. ऑफिसचं काम उरकून घरी धाव घेण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते.. आजही...
मार्च 14, 2019
मुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (गुरुवार) किमान दोघांना जीव गमवावा लागला. आता नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'आम्ही त्यांना सांगितले होते', असे सांगत...
फेब्रुवारी 19, 2019
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. सध्या देशात जी दोन नावे सर्वात जास्त चर्चेत आहेत त्यांनी देखील महाराजांना सोशल मिडीयाद्वारे मानाचा मुजरा केला आहे. ही नावे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल...
फेब्रुवारी 18, 2019
पिंपरी - पुणे ते लोणावळादरम्यान प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या लोहमार्गाचा अंतिम अहवाल तयार झाला असून, येत्या महिन्यात तो मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात येणार आहे. बोर्डाकडून याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर तो मंत्रिमंडळ समिती आणि निती आयोगाकडे मंजुरीसाठी जाणार आहे. या प्रस्तावासाठी...
फेब्रुवारी 12, 2019
कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे महिलांच्या ग्रामसभेत महिलांनी नवीन दारु दुकाने तसेच सांस्कृतिक कलाकेंद्राला तीव्र विरोध दर्शवित आक्रमक पवित्रा घेतला. दरम्यान सरपंच व ग्रामपंचायत प्रशासनानेही गावात दारुबंदीचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविणार असल्याचे सांगितले. कोरेगाव...
फेब्रुवारी 04, 2019
सेनगाव : मराठा आरक्षण आंदोलनात गुन्‍हे दाखल झालेल्‍या नऊ जणांनी सोमवारी (ता. 4) स्‍वतःहून अटक करून घेतली. यावेळी नागरिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. सेनगाव तालुक्‍यात मराठा आरक्षण आंदोलन चांगलेच पेटले होते. यामध्ये तालुक्‍यातील ठिकठिकाणी रास्‍तारोको आंदोलन करण्यात आले.  तसेच रस्‍त्‍यावर झाडे तोडून...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील सहा अधिविभागांना स्वायत्ततेचे वेध लागले आहेत. राज्य सरकारचे अधिविभागांसाठीचे परिनियम येण्यापूर्वीच या अधिविभागांनी प्रशासनाकडे स्वायत्ततेसाठी प्रस्ताव पाठविले आहेत. विशेष म्हणजे सहापैकी पाच प्रस्ताव विज्ञान शाखांशी संबंधित आहेत. महाविद्यालयांसाठीचे...