एकूण 122 परिणाम
जून 25, 2019
आळंदीतील समाधी आणि पोहंडुळ येथील जन्मस्थळ दुर्लक्षित आळंदी / परभणी - ज्या काळात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांना आळंदीत कुणीही आश्रय देत नव्हते, त्या वेळी त्यांना मायेने सांभाळले ते भोजलिंगकाका यांनी. मात्र या भोजलिंगकाकांची आळंदीतील समाधी आणि पोहंडुळ (ता. सोनपेठ...
जून 24, 2019
पिंपरी - आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. मंगळवारी (ता. २५) सकाळी गावालगतच्या अनगडशाहबाबा दर्ग्यापर्यंत पालखी खांद्यावर उचलून नेली जाईल. अभंग आरतीनंतर रथात पालखी ठेवून पुढे मार्गस्थ होईल. चारशे वर्षांची ही परंपरा...
जून 24, 2019
देहू - आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता.२४) दुपारी अडीच वाजता देहूतील देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे.  राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी रविवारी (ता. २३) देहूत दाखल झाले आहेत. त्यामुळे देऊळवाडा आणि इंद्रायणीचा नदीकाठ भाविकांनी फुलून गेला...
जून 24, 2019
हिंगोली - तालुक्‍यातील नर्सी नामदेव येथील संत नामेदव महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून, रविवारी (ता. २३) या पालखीचे पहिले रिंगण हिंगोलीत झाले.  तेवीस वर्षांपासूनची परंपरा असलेली संत नामदेव महाराज पालखी पंढरपूरकडे नरसी नामदेव येथून सकाळी साडेसातला मार्गस्थ...
जून 21, 2019
आळंदी - आषाढी वारीसाठी माउलींची पालखी मंगळवारी (ता. २५) प्रस्थान ठेवणार आहे. यासाठी येथे होणारी गर्दी लक्षात घेता मरकळ औद्योगिक विभागात जाणाऱ्या अवजड, तसेच मालवाहू वाहनांना शुक्रवारपासून (ता.२१) बुधवारपर्यंत (ता. २६) आळंदी शहरातून प्रवेश बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ...
जून 21, 2019
देहू - आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) प्रस्थान ठेवणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देहूतील मुख्य देऊळवाड्यात देहूरोड पोलिसांकडून कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात येणार आहे. प्रस्थान सोहळ्याच्या वेळी देऊळवाड्यातील भजनी मंडपात भाविकांची गर्दी...
जून 19, 2019
पिंपरी - धर्मानं मुस्लिम. व्यवसाय हिंदू देवतांच्या मूर्ती, प्रतिमा व पूजा साहित्य विक्री. दुकानाचे नाव ‘सौभाग्य अलंकार.’ त्याच्या फलकावर लिहिलंय ‘जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज प्रसन्न.’ मालकाचे नाव शाकिर अत्तार. उत्सुकता म्हणून चौकशी केली आणि कळलं, की वर्षानुवर्षे अत्तार कुटुंब...
जून 19, 2019
देहू - आषाढी वारीसाठी जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा सोमवारी (ता. २४) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्‍वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मुख्य देऊळवाड्याबाहेरील परिसरात, तसेच सोहळ्यातील चांदीच्या...
जून 19, 2019
नाशिक - "संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज की जय', "ग्यानबा तुकाराम'सह विठुनामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या निनादात मंगळवारी (ता. 18) सकाळी साडेदहाच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराज पालखी सोहळ्याने नाशिककडे प्रस्थान ठेवले. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा दिंडीतून...
जून 19, 2019
आळंदी - प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वारीसाठी आळंदी देवस्थान यंदा पालखी सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांना मोफत सेवा देणार आहे. सर्व दिंड्यांना प्रत्येकी एक हजार कागदी पत्रावळी मोफत देणार आहे. पालखी मार्गावरील ग्रामपंचायती आणि पालिकांना वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन म्हणून रोपांचे वाटप करणार असल्याची माहिती...
एप्रिल 30, 2019
देहू: आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे 24 जूनला प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती संत तुकाराम महाराज संस्थानचे पालखी सोहळाप्रमुख संजय महाराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मोरे म्हणाले, पालखी सोहळा सोमवारी, 24 जूनला देऊळवाड्यातून...
ऑगस्ट 08, 2018
पिंपरी - ढोल-ताशांच्या खणखणाटात, रांगोळीच्या पायघड्या घालून जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज पालखीचे परतीच्या प्रवासात पिंपरीगाव येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. ‘ज्ञानोबा.. तुकाराम’च्या गजरात पुणे-मुंबई महामार्गाने पिंपरी येथे दुपारी सव्वाचारच्या सुमारास पालखीचे आगमन झाले....
जुलै 23, 2018
पंढरपूर - देहूपासून निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज सायंकाळी पंढरीत पोचला. सगळ्याच पालख्या पंढरपुरात दाखल झाल्या आहेत. संतभार पंढरीत दाखल झाल्याने आणि त्याच पावनभूमीत आल्याने जीवन धन्य झाल्याची भावना सत्तरी ओलांडलेल्या द्रौपदा रावंडले व शारदाबाई दारकोंडे यांनी व्यक्त केल्या. रथामागे...
जुलै 23, 2018
पंढरपूर - खांद्यावर भागवत धर्माची पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत अठरा दिवसांपूर्वी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज पंढरीत प्रवेश केला. विठूरायाच्या भक्तीने शेकडो किलोमीटर चालत आलेला भक्तीचा महासागर चंद्रभागेच्या काठावर विसावला. भाग गेला, शीन गेला । अवघा...
जुलै 21, 2018
भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा धावा केला, की पंढरपूर समीप आल्याची वारकऱ्यांची भावना होते. सावळ्या विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पावलांना बळ मिळते. सकाळी वारकरी गोल रिंगणात उडीचा खेळ खेळले. तोंडले- बोंडल्यातील ओढ्यावर एकमेकांवर पाणी शिंपडत आनंद लुटला. आनंदाने बहरलेल्या वातावरणात सोहळाटप्पा...
जुलै 21, 2018
पिराची कुरोली (जि. सोलापूर) - तुका म्हणे धावा... पंढरी आहे विसावा, अशी आर्त हाक देत तोंडले बोंडलेच्या उतारावर संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा धावा भक्तिमय वातावरणात झाला. पंढरीच्या ओढीने धावलेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसला. याच सोहळ्यात चार वेगवेगळ्या राज्यांतील...
जुलै 20, 2018
वेळापूर - हरिनामाचा अखंड जयघोष म्हणजे वारी, टाळ-मृदंगांचा गजर म्हणजे वारी, भक्तीची कसोटी म्हणजे वारी, सहनशीलतेचा साक्षात्कार म्हणजे वारी, तसेच लोकरंगांची उधळण म्हणजेही वारी... हे लोकरंगांचे अनोखे रूप गुरुवारी वेळापूरच्या माळरानावर पाहायला मिळाले.  रिंगण, धावा आणि त्यानंतर रंगलेल्या भारुडांनी...
जुलै 20, 2018
बोरगाव - संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला. सकाळी आठच्या सुमारास माळीनगर येथे कोवळे ऊन अंगावर घेत पहिला उभा रिंगण सोहळा रंगला. रिंगण सोहळ्याचा आनंद घेतल्यानंतर तेथेच झालेल्या पहिल्या विसाव्याला ‘अवघा रंग एक झाला... रंगी रंगला श्रीरंग,’ अशीच भावना घेऊन साठीतील चार...
जुलै 19, 2018
नीरा नरसिंहपूर - जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपल्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास निरोप दिला....
जुलै 19, 2018
समाधानकारक पावसाचा परिणाम, सर्व सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या अधिक माळशिरस - सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी राज्यातून निघालेल्या सकल संतांच्या पालख्यांसमवेत मोठ्या संख्येने भाविक पंढरीची वाट चालत असून, सर्वत्र झालेल्या समाधानकारक पावसामुळे पेरण्या उरकून वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. संत...