एकूण 24 परिणाम
डिसेंबर 05, 2019
नांदेड : कोणत्याही कुटुंबाला कर्जाच्या संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून नांदेडच्या ‘साईप्रसाद प्रतिष्ठान’च्या संकल्पनेतून मोफत सामुहिक विवाह सोहळ्याचा उपक्रम गत पाच वर्षांपासून राबवण्यात येत आहे. यंदा या मेळाव्याचे सहावे वर्ष असून शेतकरी आत्महत्या कुटुंब, शहीद जवान, अनाथ, अपंग अशा...
नोव्हेंबर 11, 2019
औरंगाबाद- ऊसतोड कामगार हा समाजातील अत्यंत वंचित, दुर्लक्षित घटक. दोनवेळच्या भाकरीसाठी संपूर्ण कुटुंबालाच आपले घरदार सोडून ऊसतोडीसाठी परजिल्ह्यांत जावे लागते. कित्येक महिने उसाच्या फडात जीवन जगणाऱ्या कुटुंबात सर्वाधिक फरपट होते ती त्यांच्या मुलांची. हे कुठेतरी थांबावे, मुलांना चांगले, उच्च दर्जाचे...
सप्टेंबर 10, 2019
नाशिक ः राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खापर आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विकास सोसायट्यांवर फोडले. तसेच बुडालेल्या तीन आणि डबघाईस आलेल्या तेरा जिल्हा बॅंकांविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांना प्रशिक्षणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. सहकार, पणन व...
जून 19, 2019
लातूर : शेतकरी आत्महत्या करून निघून जातो. पण पुढे त्याच्या विधवा पत्नींना मात्र अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच मुश्कील होते. हे लक्षात घेवून राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारसीची राज्य शासनाच्या वतीने अंमलबजाणी केली जाणार आहे. यात महसूल, महिल आणि बालकल्याण, शालेय...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत ...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सतत आंदोलन करूनही सरकारला जाग आलेली नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी अद्यापही ठोस उपाय योजना सुरवात झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबू शकल्या नाहीत. हा प्रश्‍न लावून धरण्यासोबतच शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना व्यक्‍त करण्यासाठी...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र असून, जानेवारी महिन्यात तब्बल 66, तर 11 फेब्रुवारीपर्यंत 11 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यातील लातूर, परभणी, नांदेड जिल्ह्यांतील प्रकरणांची छाननी करण्यात आली; मात्र अन्य जिल्ह्यांत प्रकरणांच्या छाननीसाठीची...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांसाठी विशेष धोरण आखावे, त्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवावी, तसेच घरकुल योजनांमध्ये शेतकरी कुटुंबातील महिलांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा शिफारसी राज्य महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत. नागपूर येथे २२ व २३...
नोव्हेंबर 17, 2018
मुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ कोर्सपासून मोर्चा काढणारे आदिवासी शेतकरी असो हा वणवा देशभर पेटत चाललाय. २१ नोव्हेंबरला मुंबईमध्ये महिला शेतकऱ्यांचे प्रमुख आंदोलन...
फेब्रुवारी 07, 2018
वर्षभरात तीन हजार जणांनी मृत्यूला कवटाळले; अमरावतीत सर्वाधिक मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी झाले नाही. घोषणेनंतरच्या अवघ्या सात महिन्यांत एक हजार 753 शेतकऱ्यांनी; तर वर्षभरात दोन हजार 917 शेतकऱ्यांनी मृत्यूला...
जानेवारी 31, 2018
औरंगाबाद - ""शिवसेना सरकारचा पाठिंबा काढू शकत नाही. सरकारमधून बाहेर पडण्याच्या त्यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या, तरी त्यांचा हा फुसका बार आहे. अशा डरकाळ्या किती वेळा फोडल्या, हे मोजणे लोकांनीही आता सोडून दिले आहे. शिवसेना भाजपबरोबरच फरफटत जाईल, अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण...
ऑगस्ट 17, 2017
औरंगाबाद - सरकारी निकष लावून गेलेली कर्जमाफी, पेरण्या करूनही पुन्हा पावसाने दगा दिल्याने पिके करपलेली, शेतमालास न परवडलेला भाव अशा सततच्या प्रश्‍नांच्या माऱ्यामुळे गेल्या सात दिवसांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील शेतीची सद्य:स्थिती गंभीर बनत चालली आहे. मागील चार वर्षांपासून...
जुलै 24, 2017
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या पगारातून शेतकरी कुटुंबियांना मदत औरंगाबाद: जिल्हा परिषदेचे अधिकरी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या एक दिवसाच्या वेतनातून औरंगाबाद जिल्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 158 वारसांना आज (सोमवार) प्रत्येकी पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत...
जून 01, 2017
मदतीसाठी 231 प्रकरणे पात्र; 44 अपात्र, 86 प्रकरणे प्रलंबित औरंगाबाद - मराठवाड्यातील दुष्काळ, नापिकी आणि डोक्‍यावरील वाढत जाणाऱ्या कर्जाच्या डोंगरामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चिंताजनक प्रमाणात वाढ होत आहे. 1 जानेवारी ते 28 मे 2017 यादरम्यान मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत तब्बल 361...
मे 14, 2017
औरंगाबाद - कोपरवेल (ता. कन्नड) येथील शेतकरी रामेश्‍वर यमाजी मुरकुटे (वय 28) यांनी शेतातील झाडाला गळफास घऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी आईच्या नावे शेतीसाठी 24 हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्जफेडीच्या विवंचनेत त्यांनी हे टोकाचे पाऊल...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात दुष्काळाचा विक्राळ चेहरा आणखी पुढे येतोय. गतवर्षी झालेल्या चांगल्या पावसाने यंदा परिस्थिती सुधारेल अशी आशा वाटत होती; मात्र दररोज शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. काल लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावातील शीतल व्यंकट वायाळ या...
एप्रिल 14, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या शेतकरी आत्महत्या अत्यंत चिंताजनक असूनही राज्य शासनाला पाझर फुटत नाही. त्यामुळे कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ कधी येईल? असा प्रश्‍न उपस्थित करत आमदार बच्चू कडू यांनी राज्य शासनावर जोरदार टीका केली. आमदार कडू यांच्या नेतृत्वात...
एप्रिल 13, 2017
फुलंब्री - बोरगाव अर्ज (ता. फुलंब्री) येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.11) घडली आहे. रामेश्‍वर दावल बलांडे (वय 55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बलांडे मंगळवारी (ता.11) सकाळी साडेतीन ते चारच्या दरम्यान...
एप्रिल 13, 2017
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त "जय शिवराय, जय भीमराय' फाउंडेशनने मिरवणूक, डीजेचा खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत करून समाजापुढे एक आदर्श घालून दिला. टाकळी माळी (ता. औरंगाबाद) येथील शेतकरी विष्णू बुरकूल यांनी 80 हजार रुपयांच्या...