एकूण 24 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
मुंबई - राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांमध्ये ‘प्रेरणा प्रकल्पा’च्या माध्यमातून आतापर्यंत तीन वर्षांत सुमारे ९० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांना नैराश्‍यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या १०४...
नोव्हेंबर 14, 2018
औरंगाबाद - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. नापिकी आणि कर्जाला कंटाळून चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना मंगळवारी (ता. १३) समोर आल्या. यामध्ये जालना, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. ...
जुलै 05, 2018
रेणापूर (जि. लातूर) - पत्नीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या पाहिल्यानंतर पतीने सासरे व नातेवाइकांशी मोबाईलवर संपर्क साधून "मी तरी आता कशाला जगू,' असे म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. घनसरगाव (ता. रेणापूर) येथे ही घटना घडली. संदीपान गिरी (वय 48) यांच्या पत्नी सरोज यांनी बुधवारी रात्री (ता. 4) गळफास...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे आश्‍वासन देत सत्ता मिळविणाऱ्या राज्यकर्त्यांनी शेतीप्रश्‍न कधीचाच बाजूला ठेवला आहे. फसवी कर्जमाफी, हमीभावाचे गाजर दाखवत प्रत्यक्षात मातीमोल भाव अशा अनेक प्रश्‍नांचा सामना करून थकलेला शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळेच मराठवाड्यात आत्महत्येचे सत्र...
मे 22, 2018
जळकोट (जि. लातूर) - केकत सिंदगी (ता. जळकोट) येथील शेतकरी शिवाजी नामदेव दळवे (वय 40) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 20) रात्री घडली. सततची नापिकी, कर्जाला कंटाळून त्यांनी विष घेतले. नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मागे पत्नी,...
मे 18, 2018
अकोला- विदर्भात १९७९ पासून ग्राहकांच्या सेवेत असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे विदर्भातील दोन विभागीय कार्यलय बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे. अकोला येथील कार्यालय अमरावती येथे तर चंद्रपूर येथील कार्यालय नागपूर कार्यालयात हलविण्यात येणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाची ता. ५ मे २०१८...
मे 15, 2018
औसा - लोदगा (ता. औसा) येथील शेतकरी दत्तू नरसिंग डिग्रसे (वय 55) यांनी सोमवारी (ता. 14) सकाळी दहाच्या सुमारास शेतात विष घेतले. लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. नापिकी, पडलेले भाजीपाल्याचे भाव, मुलींच्या लग्नात झालेला कर्जाचा डोंगर...
मे 13, 2018
लातूर : मुलीचं लग्न म्हटले की बापाची वाढणारी चिंता, लग्नासाठी होणारा लाखोंचा खर्च, कर्ज काढून करावे लागणारे लग्न, कर्जाचा डोंगर घेऊन जगावे लागणारे जीवन, त्यातून येणारी नैराश्यता, प्रसंगी मृत्यूलाही कवटाळण्याचे घडत असलेले प्रकार ही समाजाच्या दृष्टीने चिंतेची बाब होती. हे लक्षात  आल्यानंतर राज्याचे...
मे 09, 2018
औराद शहाजानी - हनमंतवाडी (हलगरा, ता. निलंगा) येथील शेतकरी राजू शेषराव चव्हाण (वय ४०) यांनी सोमवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे २५ हजार, तर सोसायटीचे नऊ हजार रुपये कर्ज आहे. मुलगी, वडिलांच्या उपचारासाठी पैसे नसल्याने ते...
फेब्रुवारी 01, 2018
औरंगाबाद - मागील काही वर्षांपासून विविध संकटांचा सामना करणारे शेतकरी जीवनयात्राच संपवत असल्याचे सातत्याने पुढे येत आहे. ही संकटे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. यंदा चांगला पाऊस झालेला असला, तरी कपाशी पिकांवर बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने...
जानेवारी 12, 2018
पातुर: शेतकऱ्यांप्रती कोणतीही संवेदनशीलता नसलेल्या राज्य सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र अजूनही सुरुच आहे. वसंता कान्हू राठोड, रा गावंडगाव, ता. पातूर या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज (दि. १२ जानेवारी) सकाळी ११ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली....
डिसेंबर 11, 2017
अकोला: शेतकऱ्यांनी घाम गाळून पिकविलेला शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अकोला-आकोट मार्गावरील उगवा फाटा येथे आज (सोमवार) सकाळी ११ वाजता शेतमालाची होळी करण्यात आली. नागपूर येथे विधीमंडळाच्या...
ऑक्टोबर 16, 2017
अकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून मुक्ती हवी अाहे. ते अाता २०२२ पर्यंत थांबायला तयार नाहीत. सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस अशा सर्वच पिकांचे भाव पडले अाहेत. नाफेडमार्फत हमीभावाने शेतीमाल खरेदी होत आहे, मात्र त्यासाठी काही क्विंटलची मर्यादा घालण्यात अाली आहे. वास्तविक सरकारने...
सप्टेंबर 03, 2017
हवामान खात्यासारखंच सरकारबी बेभरवशाचं झालं आहे जी. कवा सांगते कर्जमाफी, कवा म्हणते कर्जमुक्‍ती आणि देत काहीच नाही. कर्जमाफीचा अर्ज भराले गेलं त सर्व्हर डाउन, तवा असं वाटतं की ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचं आवतनच होय, अशी शेतकऱ्यांप्रती सरकारची अनास्था बोर्डा गणेशी येथील मंगेश बालकुटे मांडत होते. या...
ऑगस्ट 17, 2017
औरंगाबाद - सरकारी निकष लावून गेलेली कर्जमाफी, पेरण्या करूनही पुन्हा पावसाने दगा दिल्याने पिके करपलेली, शेतमालास न परवडलेला भाव अशा सततच्या प्रश्‍नांच्या माऱ्यामुळे गेल्या सात दिवसांत ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील शेतीची सद्य:स्थिती गंभीर बनत चालली आहे. मागील चार वर्षांपासून...
जुलै 21, 2017
शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या हमखास खरेदीची खात्री आणि हुकमीभावांची व्यवस्था अस्तित्वात आणली, तर भविष्यात कर्जमाफी मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही आणि शासनालाही कर्जमाफी करावी लागणार नाही.  मागील सहा महिन्यांपासून तूर खरेदीचा प्रश्न राज्यात गाजतोय. शेतकऱ्यांचा तुरीचा दाणा न दाणा खरेदी करू, असे...
जुलै 20, 2017
पुणे - ‘शेतकऱ्यांच्या गळ्याला आयातवाढीचा फास’ या ॲग्रोवनमध्ये बुधवारी (ता. १९) प्रसिद्ध झालेल्या बातमीवर राज्यभरातून विविध स्तरांतून प्रतिक्रिया प्राप्त होत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेते, कृषी अभ्यासक, राजकीय नेते यांचा समावेश आहे. देशात भरघोस उत्पादन होत असताना आयातीची...
जून 22, 2017
औरंगाबाद - मराठवाड्यात कर्जबाजारी आणि नापिकीमुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. राज्यात धुळे, नाशिक, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत आठ जणांनी जीवन संपविले. त्यात शेतकरी दाम्पत्याचा समावेश आहे. तसेच शैक्षणिक साहित्यासाठी पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्याच्या...
जून 03, 2017
मागण्या मान्य न झाल्यास सोमवारी "महाराष्ट्र बंद'; कोअर कमिटीचा निर्णय पुणतांबे - शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी किसान क्रांतीचे सदस्य आज मुंबईला रवाना झाले. चर्चा यशस्वी न झाल्यास सोमवारी (ता. पाच) "महाराष्ट्र बंद' ठेवण्याचा निर्णय त्यापूर्वी कोअर कमिटीच्या...
जून 02, 2017
सांगली - शेतकऱ्यांचा संप मोडीत  काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून राजू शेट्टी यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना म्हणजे नाव स्वाभिमानी आणि धंदा बेईमानी, असा घणाघात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केला....