एकूण 232 परिणाम
जुलै 11, 2019
बदनापूर (जि. जालना) -  जालना जिल्ह्यामधील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी  येथील शेतकरी बळीराम रखमाजी कान्हुले (वय 42) यांनी शेलगाव शिवारातील गट क्रमांक 551 मधील स्वतःच्या शेतातील गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (ता. 11) सकाळी उघडकीस आली.   कान्हुले यांच्याकडे अडीच...
जून 29, 2019
सिरसाळा (जि. बीड) - नापिकी, बॅंकेचे कर्ज व पाऊस नसल्याने एका शेतकऱ्याने लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगपूर (ता. परळी वैजनाथ) येथे आज पहाटे उघडकीस आली. अशोक गोपाळ लहाने (वय 32) असे मृताचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. अशोक यांना दोघे भाऊ...
जून 26, 2019
नाशिक ः जिल्ह्याच्या 18 हजार कोटींच्या पत आराखड्यात प्राधान्य क्षेत्रा (प्रायोरिटी सेंटर)साठी सुमारे 14 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात यंदा कृषी क्षेत्रात स्टोरेज आणि मार्केटिंगला प्राधान्य देतानाच शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांच्या आर्थिक प्रश्‍नावर काम करण्याला प्राधान्य...
जून 21, 2019
लातूर - शेतकरी आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीला अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. कधी कधी तर जगणेच कठीण होते. हे लक्षात घेऊन राज्य महिला आयोगाने अडीच वर्षे अभ्यास करून केलेल्या शिफारशींची राज्य शासनातर्फे अंमलबजावणी केली जाणार आहे. यात महसूल, महिला आणि बालकल्याण, शालेय शिक्षण, आरोग्य, कृषी...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 19, 2019
नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे एका तरूण शेतकऱ्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना निमगाव (ता. हदगाव) शिवारात शनिवारी (ता. १९) सकाळी उघडकीस आली. निमगाव (ता. हदगाव) येथील शेतकरी अशोक रामधन चव्हाण (वय ४०) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
मे 07, 2019
लातूर : कर्जाचा डोंगर व नापिकीमुळे आत्महत्या केलेल्या खानापूर (ता. रेणापूर)  येथील एका शेतकऱ्याच्या शेतात जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी मंगळवारी (ता. सात) जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक घेतली. शेतकऱ्यांवरच तुमचा व्यवसाय अवलंबून असून तो जगला तरच तुम्ही जगाल, असे स्पष्ट करत `बिझनेस` न करता `...
मे 06, 2019
हिंगोली, नांदेड - भाटेगाव (ता. कळमनुरी, जि. हिंगोली) येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. जयसिंग उल्हास राठोड (वय 26) असे त्यांचे नाव आहे. सततच्या नापिकीमुळे बॅंक, खासगी कर्ज कसे फेडावे, या विवंचनेतून त्यांनी विहिरीवरील वीजपंपाच्या स्टार्टरला स्पर्श करून आत्महत्या केली. आखाडा...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाच्या उपाययोजनांमुळे मागील...
एप्रिल 06, 2019
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतविषयक चुकलेल्या धोरणामुळे देशात गेल्या दोन वर्षात १८ हजार ९९८ शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्येची जबाबदारी मोदी सरकारची आहे. शेतमालाला हमीभाव, कर्ज माफी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. ते आश्वासन पुर्ण न केल्याने शेतकरी...
मार्च 17, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘शेतकरी सुखी तर जग सुखी असे म्हणतात’ सध्याच्या काळात शेतकरी उपाशी अन् शासन तुपाशी असेच चित्र दिसत आहे. चाळीसगाव तालुक्यात पाच वर्षात ९४ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याचे हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राज्यात एकूण ११ हजार ९९५ शेतकऱ्यांनी...
मार्च 04, 2019
जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातच स्वतःचे सरण रचले व पेटत्या सरणात उडी घेऊन स्वतःला संपविल्याची घटना शुक्रवारी (ता.१) घडली. मदना येथील शेतकरी गोपाळराव काशिबाजी जाणे (वय८५) या वयोवृद्ध शेतकऱ्याने आपण मेल्यानंतर कोणालाही त्रास द्यायचा नाही, असा विचार करून शेतात सरण रचले...
फेब्रुवारी 26, 2019
नागपूर - गेल्या पाच वर्षांत नागपूर विभागात एक हजार सहाशे बारा (१६१२) शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कर्जमाफी, उत्पादन दुप्पट, विविध योजना शासनाकडून  राबविण्यात येत असताना शेतकऱ्यांना त्याचा फारसा फायदा होत नसल्याचे दिसत आहे.  देशात शेतकरी आत्महत्येचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र राज्याकडे...
फेब्रुवारी 24, 2019
मुंबई :  ''भाजप-शिवसेना सरकारने आपण ‘गल्ली बॉय’ आहोत, असा आव आणला होता. पण मागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात हे सरकार ‘बॅड बॉईज’ असल्याचे सिद्ध झाले आहे.'' ,अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्य विधीमंडळाच्या प्रथम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - शासकीय योजनांचा अभाव आणि अंमलबजावणीत प्रशासनाकडून होणारी चालढकल, पावसाचे अत्यल्प प्रमाण, पाणीटंचाई, शिक्षणाचा अभाव, दुर्गम भागातील गावांत जाण्यासाठी रस्त्यांची दुरवस्था या ग्रामीण भागातील विदारक स्थितीचे चित्र ‘दारिद्य्राची शोधयात्रा’मधून समोर आले आहे. ग्रामीण भागातील गरिबीचे वास्तव...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता...
फेब्रुवारी 12, 2019
नांदेड - चिंचोली (ता. कंधार) येथील शेतकरी शिवाजी गोपीनाथ कौशल्य (वय 42) यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 10) दुपारी घडली. सततच्या नापिकीमुळे ते काही लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड करू शकत नव्हते. त्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. धारच्या सरकारी...
फेब्रुवारी 08, 2019
अमरावती - अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची मालिका सुरूच असून गेल्या सहा वर्षांत आत्महत्यांचा आकडा ५९४२ च्या घरात पोहोचला आहे. विशेष म्हणजे यातील ३ हजार २०७ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत दिली आहे, तर २ हजार ५३२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत. आरटीआय...