एकूण 20 परिणाम
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
मे 22, 2019
जालना, बीड - जालना व बीड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून या शेतकऱ्यांनी जीवन संपविले. अकोलादेव (ता. जाफराबाद, जि. जालना) येथील शेतकरी बाबासाहेब फकिरबा सवडे (वय 41) यांनी पहाटे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. "...
मे 13, 2019
औरंगाबाद - सरकारनी मालक गेल्याचं ५० आणि लेक गेल्याचं लाकबर रुपये हातावर ठिवलं; पण माझा उघडा पडलेला संसार पुन्हा नेटानं उभा करण्यासाठी धडपडतेय; पण दुष्काळ जगूबी द्यायनाय, असा उद्विग्न सवाल सिंदीफळ (ता. तुळजापूर) येथील विमल दणके या वृद्ध महिलेने केला.  करजखेडा-पाटोदा (जि. उस्मानाबाद) येथील जनावरांचा...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सततचा दुष्काळ, शासनाचे अनुदान व कर्जमाफीची प्रतीक्षा, शेतीमालाचे गडगडलेले दर, डोक्‍यावरील कर्जाचे ओझे या प्रमुख कारणांमुळे मागील ५ वर्षांत राज्यातील तब्बल १४ हजार २६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती राज्याच्या मदत व पुनवर्सन विभागाच्या सूत्रांनी दिली.  शासनाच्या उपाययोजनांमुळे मागील...
फेब्रुवारी 25, 2019
लखमापूर (नाशिक) - बोपेगाव ता. दिंडोरी येथील वयाच्या अवघ्या पंचविशीत पतीने आत्महत्या केल्यामुळे वैधव्य आल्यानंतरही खचून न जाता आपल्या लहानग्या दोन लेकरांना मोलमजुरी करत लहानाचे मोठे करून त्यापैकी एकाला लष्करात भरती करून आपल्या पतीचे लष्करात जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. बोपेगाव हे तसे चार हजार...
फेब्रुवारी 23, 2019
प्रस्ताव ३ हजार अन्‌ ५७१ कुटुंबांनाच लाभ सोलापूर - राज्यातील शेतकऱ्यांचे २०१५-१६ पासून गोपिनाथ मुंडे अपघाती विमा योजनेतील सुमारे साडेचार हजार, तर २०१७-१८ मधील दोन हजार ८३१ प्रस्तावांपैकी एक हजार १६५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. कागदपत्रांची पूर्तता करूनही दुर्घटनाग्रस्त शेतकरी कुटुंबांना या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
सप्टेंबर 03, 2018
हिंगोली - कळमनुरी तालुक्‍यातील महालिंगी तांड्यावरील दोन तरुण महिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. निकिता राजू राठोड (वय 20), सीमा बालाजी राठोड (वय 19) दोघीही महालिंगी तांडा येथील रहिवासी होत्या. दोन्ही महिला एकमेकींच्या नातेवाईक असल्याचे सांगण्यात येत आहे....
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद, उस्मानाबाद - मी मराठा आहे म्हणून नोकरी नसल्याचे चिठ्ठीत नमूद करून औरंगाबादच्या चिकलठाणा परिसरातील तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले.  उमेश आसाराम एंडाईत असे त्याचे नाव आहे. दरम्यान, आरक्षणासह विविध कारणांनी आलेल्या नैराश्‍यातून विष घेतलेल्या देवळाली (ता. कळंब) येथील तृष्णा तानाजी माने (वय...
जुलै 05, 2018
रेणापूर (जि. लातूर) - पत्नीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या पाहिल्यानंतर पतीने सासरे व नातेवाइकांशी मोबाईलवर संपर्क साधून "मी तरी आता कशाला जगू,' असे म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. घनसरगाव (ता. रेणापूर) येथे ही घटना घडली. संदीपान गिरी (वय 48) यांच्या पत्नी सरोज यांनी बुधवारी रात्री (ता. 4) गळफास...
मे 16, 2018
महागाव (जि. यवतमाळ) - तालुक्‍यातील अंबोडा येथील अल्पभूधारक शेतकरी उमाजी भीमराव पाटे यांनी आज सकाळी शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्याकडे साडेचार एकर कोरडवाहू शेती नागपूर-तुळजापूर राज्यमार्गाला लागूनच आहे. चौपदरीकरणाच्या प्रक्रियेत पाटे यांची 20 गुंठे...
मे 11, 2018
वैजापूर - कर्जबाजारीपणाला व सततच्या नापिकीला कंटाळून गेल्या दोन वर्षांमध्ये तालुक्‍यातील ३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. यंदा मात्र तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती येथील तहसील कार्यालयाने दिली.  तालुका अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षापासून पावसाचे...
मे 06, 2018
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) सारख्या मागास भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गंगा गावात आणणाऱ्या संस्कृती संवर्धन मंडळाचा सर्वदूर नावलौकिक आहे. गेल्या काही वर्षांपासून या मंडळाने शैक्षणिक कार्यासोबतच शेती आणि शेतकरी यांच्या विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले आहेत....
एप्रिल 26, 2018
पांगरी (जि. सोलापूर) - कर्जास कंटाळून सौदागर भानुदास डोईफोडे (वय 60) या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी नारी (ता. बार्शी) येथे उघड झाली. क्षीरसागर हे मंगळवारी (ता. 24) रात्री जेवण करून झोपण्यासाठी बाहेर गेले होते. ते सकाळी घरी न परतल्याने शोध घेतला असता त्यांनी शेतात...
एप्रिल 23, 2018
पाथरी (जि. परभणी) - सततच्या नापिकीला कंटाळून नागोराव संतोबा अंभोरे (वय 55) या शेतकऱ्याने शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सरोळा बु. (ता. पाथरी) येथे रविवारी घडली. नागोराव अंभोरे यांच्या नावे दोन एकर शेती आहे. चार वर्षांपासूनच्या नापिकीमुळे बॅंकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते...
एप्रिल 23, 2018
वालचंदनगर (जि. पुणे) - नीरा डावा कालव्यातून गेली दोन वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्याने इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी, ता. इंदापूर) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.  दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठ्या वसंत...
एप्रिल 06, 2018
नांदेड - नापिकी, कर्जामुळे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यात परभणीतील दोन, तर नांदेड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे. इमारतीवरून मारली उडी पूर्णा - देगाव (ता. पूर्णा) येथील शेतकरी अतिष विश्वनाथ वळसे (वय ३२) यांनी गुरुवारी (ता. पाच) दुपारी पूर्णा नगरपरिषदेच्या इमारतीवरून उडी मारून...
डिसेंबर 18, 2017
बीड - इनामी जमिनीच्या पडताळणी प्रमाणपत्रासाठी खेटे मारणाऱ्या एका शेतकऱ्याने शुक्रवारी येथील भूसुधार कार्यालयातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रविवारी (ता.17) पहाटे या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रल्हाद हरिभाऊ टेकाळे (वय 45, रा. नागापूर बु.) असे आत्महत्या...
सप्टेंबर 18, 2017
रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलस्रोतमंत्री नितीन गडकरी यांच्या हाती आता देशाचा जलकारभार आलाय. गडकरी आधी ‘रोड’करी होते, आता ‘जोड’करी बनू पाहताहेत! त्यांच्या स्वप्नातले नदीजोड मार्गी लागतील, एका खोऱ्यातून वाहत दुसऱ्या खोऱ्यात पोचलेल्या झुळझुळ पाण्याच्या संगतीनं ते शीळ घालत फिरतील, की...
जून 06, 2017
जलालखेडा येथील शेतकरी मोतीराम बनकरने सोडली आशा जलालखेडा - संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनाची आग फोफावत असतानाच जलालखेडा येथील तरुण शेतकरी मोतीराम सीताराम बनकर (वय 40) यांनी रविवारी (ता. 4) रात्री घरी पंख्याला पत्नीची साडी बांधून गळफास घेतला. त्यात त्यांचा...