एकूण 98 परिणाम
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
मे 31, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काँग्रेस आघाडीत सामावून घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. राज...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांचा सोशल मीडियावर जोरदार विजयोत्सव सुरू आहे. तर प्रतिस्पर्धी व महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आपला पराभव झाला असला तरी विश्‍वास दाखविणाऱ्या मतदारांचे, कार्यकर्त्यांचे व सहयोगी राजकीय पक्षांचे आभार...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
एप्रिल 20, 2019
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असल्याने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. विस्तृत मतदारसंघात सर्व मतदारांपर्यंत पोचणे उमेदवारांसाठी अशक्‍य असल्याने सोशल मीडिया, तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून मतदारांपर्यंत पोचण्यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे...
एप्रिल 16, 2019
परतूर (जि. जालना) - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या हातात सत्ता देणे म्हणजे स्वतःच्या हाताने लोकशाहीचा गळा कापल्यासारखे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केले. परभणी लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ परतूर...
एप्रिल 14, 2019
उरण(रायगड) : ''घारापूर परिसरात पोचविण्यात आलेली वीज, नगरपालिकेला विकासकामासाठी राज्य सरकारकडून देण्यात आलेला शंभर कोटी पेक्षा जास्त निधी, जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टचा (जेएनपीटी) रस्ता आठ पदरी केला जात आहे.'', ही विकास कामे उरण तालुक्यात करण्यात आल्याचे युतीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. तर...
एप्रिल 10, 2019
उत्साह  पिंपरी - महापुरुषांना अभिवादन, रखरखते ऊन, ‘जितेंगे भाई जितेंगे’चा जयघोष आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह... अशा वातावरणात मावळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केला.  वाल्हेकरवाडीतील आहेर गार्डन...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
एप्रिल 02, 2019
यवतमाळ-वाशीम मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे आणि शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार खासदार भावना गवळी यांच्यात सरळ लढतीची चिन्हे आहेत. मात्र, उल्लेखनीय अपक्ष उमेदवारांचे आव्हान दोघांच्याही मतांना खिंडार पाडणारे ठरू शकते. मतविभाजनच निवडणुकीचा निकाल निश्‍चित करणार आहे....
मार्च 31, 2019
पुणे : 'मोदी सरकार हटाव, देश बचाव', अशी घोषणाबाजी करत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे पुण्यात निवडणूक प्रचारास प्रारंभ झाला. उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी आघाडीच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन  आघाडीने प्रचाराचा नारळ वाढविला. यावेळी...
मार्च 28, 2019
मुंबई - भ्रष्टाचार, काळा पैसा, बेरोजगारी, दहशतवाद व लोकपाल या प्रमुख मुद्द्यावरून दिल्लीच्या तख्तावर विराजमान झालेल्या मोदी सरकारने पाच वर्षांनंतर आता या प्रमुख मुद्द्यांना प्रचारातून बगल दिल्याचे चित्र आहे. केंद्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनीही प्रचार ‘प्रखर राष्ट्रवाद’ या मुद्द्याभोवती फिरत राहील...
मार्च 25, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची एकजूट, तर भारतीय जनता पक्ष व शिवसेना पदाधिकाऱ्यांची अद्याप दिलजमाई झाली नसल्याचे रविवारी (ता. २४) दिसून आले. निवडणूक प्रचाराच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधींनी दुपारी एक ते तीन या कालावधीत...
मार्च 24, 2019
कऱ्हाड :  जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या भाजप सरकारला उलथवून लावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे केले. भाजपच्या सरकारने धनगर, मुस्लीम, मराठा व दलीत समाजाची फसवणूक केली आहे. त्यांनी राफेल विमान खरेदीत केलेला भ्रष्ट्राचार करून त्यातही गैरव्यवहार करून फसवणूक...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 24, 2019
मोजके मतदारसंघ वगळता सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यामुळे महाराष्ट्रातील लढतींचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. पक्षांतराच्या कोलांटउड्या, प्रमुख राजकीय घराण्यांच्या नव्या पिढीत उफाळून आलेल्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातून आकाराला आलेले डावपेच या पार्श्‍वभूमीवर सगळ्यांच पक्षांनी...
मार्च 23, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची...
मार्च 23, 2019
राज्याच्या राजकारणात कोल्हापूर आणि सांगली हे पश्‍चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ युती आणि आघाडीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळेच त्यांच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून होत आहे; परंतु विरोधकांशी लढण्याआधी येथील उमेदवारांना स्वकीयांशीच लढावे लागेल, असे सध्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २४)...