एकूण 6 परिणाम
एप्रिल 29, 2018
बेळंकी (ता. मिरज,जि.सांगली) येथील सौ.राजश्री सिद्धार्थ दरबारे यांनी मोठ्या कष्टाने माळरानावर चार एकर द्राक्ष बाग फुलवली आहे. प्रयोगशील शेतकऱ्यांकडून त्यांनी द्राक्ष शेतीची सूत्रे समजाऊन घेतली. स्वतःच्या शेतीमध्ये प्रयोग करत, चुका सुधारत त्यांनी दर्जेदार द्राक्ष उत्पादनावर भर दिला आहे. बेळंकी (ता....
डिसेंबर 05, 2017
नाऊमेद न होता जो मार्गातील अडथळ्यांवर योग्य पद्धतीने मात करतो, तोच यशस्वी होतो. वरखेडा (जि. नाशिक)  येथील उफाडे बंधूंची कथा अशीच आहे. कुटुंबाकडे अवघे दोन एकर क्षेत्र. मागील पाच वर्षांत एका गाईपासून सुरवात करून सोळा गाईंपर्यंत उफाडे बंधूंनी मजल मारली. दुग्ध व्यवसायातून त्यांनी आर्थिक सक्षमतेकडे...
नोव्हेंबर 19, 2017
अहिंसक, समता, न्याय, शाश्‍वत समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाची व्यवस्था निर्माण करणे हा ‘आनंद निकेतन'  शाळेचा उद्देश आहे. वर्धा येथे १९३७ मध्ये महात्मा गांधी यांनी शिक्षण संमेलन घेतले. या संमेलनात हिंदुस्तानी तालिमी संघ तयार करण्यात आला. डॉ. झाकिर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली देशात कशा प्रकारच्या...
नोव्हेंबर 09, 2017
हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...
जुलै 18, 2017
सांगली येथील श्री पांजरपोळ संस्थेने देशी गोपालनाचे व्रत काही वर्षांपूर्वी घेतले. आजच्या महागाईच्या काळातही खर्चाचा विचार न करता सुमारे २१० गायींचा सांभाळ पोटच्या पोरांप्रमाणे करून हे व्रत टिकवले आहे. तीन ठिकाणी संस्थेने जागा घेत आपला विस्तार साधला आहे. गायींच्या दुधाची विक्री केली जातेच, शिवाय...
जून 23, 2017
अगदी लहानपणापासून शेती सांभाळणारे नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील नाठेबाबा आज वयाच्या एेंशीमध्ये आहेत. पहाटे पाचला दिवसाची सुरवात करीत १५ एकरांतील द्राक्षांचं व्यवस्थापन ते या वयातही तरुणाच्या तडफेनं सांभाळतात. विविध प्रयोगांद्वारे स्वतःची शेती घडवीत इतरांना मदत केली. आज एकूण शेतीच संकटाच्या गर्तेत...