एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
सप्टेंबर 19, 2019
यवतमाळ : शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी घाटंजीच्या तहसीलदार पूजा माटोडे यांच्या बाबतीत अपशब्द वापरून त्यांचा अवमान केल्याचा आरोप महसूल विभागाच्या सात कर्मचारी संघटनांनी केला असून तिवारींच्या निषेधार्थ संपाचा पवित्रा घेतला आहे. उद्या शुक्रवारी 20 तारखेला...
ऑगस्ट 10, 2019
नेर (जि. यवतमाळ)  : तालुक्‍यातील घारेफळ येथील नितीन दादाराव कचरे (वय 32) या तरुण शेतकऱ्याचा कपाशीवर फवारणी करताना विषबाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. 10) सकाळदरम्यान घडली. या घटनेने शासन व जिल्हा प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात 22 शेतकऱ्यांवर...
सप्टेंबर 19, 2018
कळस : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे व तालुक्यातील लोकप्रतिनीधींच्या रेट्यामुळे अखेर खडकवासला कालव्याचे पाणी आज इंदापूर तालुक्यात पोचले. पावसाने पाठ फिरविल्याने गेल्या काही दिवसांपासून खडकवासला कालव्याच्या पाण्याकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल्याची स्थिती निर्माण झाली...
सप्टेंबर 08, 2018
फलटण (सातारा) - हुमणीचा जीवनक्रम व नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांसह प्रभावी किडनियंत्रणसाठी योग्य किडकनाशक वापरल्यास हुमणीवर नियंत्रण सहज शक्य असल्याचे कृषि महाविद्यालय कोल्हापूरचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग मोहिते यांनी सांगितले.  पवारवाडी (ता.फलटण) येथे महाराष्ट्र शासन कृषि विभाग मार्फत हुमणीकिड...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....
जून 22, 2018
मेहुणबारे (चाळीसगाव) : शासनाच्या शिवाजी महाराज सन्मान योजनेतंर्गत चाळीसगाव तालुक्‍यातील 11 हजार 853 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वंचितांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,...
जून 19, 2018
पुणे - दस्तावेज नोंदणीसाठीची ग्रास (गव्हर्न्मेंट रिसिट अकौंटिंग सिस्टीम) प्रणाली आज तरी सुरू होईल, या आशेने रविवारी सकाळी सातपासून संध्याकाळी साडेसहापर्यंत सुमारे दीडशे नागरिक आशेने थांबले होते; पण त्यांच्या पदरी निराशाच पडली. अशी निराशा चार दिवस हजारो नागरिक अनुभवत आहेत. आज (सोमवारी) ही या...
मे 30, 2018
अंबासन (नाशिक) - गोराणे (ता.बागलाण) येथील ग्रामस्थांनी हरणबारी उजवा कालव्यासाठी हरणबारी धरणातून पाणी आरक्षित करावे या मागणीसाठी नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार शंभर टक्के यशस्वी केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात मतदानाचे बुथ लावण्यात आले होते....
एप्रिल 27, 2018
जळगाव : खरीप हंगाम तोंडावर असून कृषी विभागाने जिल्ह्यासाठी सुमारे 3 लाख मेट्रिक टन एवढी विविध खतांची मागणी केली आहे. दरम्यान, खानदेशातील मुख्य पीक असलेल्या कपाशी लागवडीसाठी अद्यापही नवीन बीटी बियाण्याची प्रतीक्षा कायम आहे.  एप्रिल महिना सरत आला असून आता खरीप हंगामपूर्व कामांना सुरवात झाली आहे. या...
मार्च 14, 2018
नाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून "सकाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून "नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...
नोव्हेंबर 21, 2017
मुंबई - राज्याच्या महत्त्वाकांक्षी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजने'चा बोजवारा डिजिटल तंत्रज्ञानाचे उडवून दिल्याने त्याचे खापर अखेरीस माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांच्यावर फोडण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून समजते. कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या...
मे 18, 2017
वाढदिवसाला भाजप देणार गडकरी यांना अनोखी भेट नागपूर - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोनेगाव तलावातील गाळ लोकसहभागातून उपसून त्यांना वाढदिवसाची आगळीवेगळी भेट देण्याचा संकल्प दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. याकरिता...
एप्रिल 05, 2017
अभोणा - काश्‍मीरसारख्या थंड प्रदेशात फुलणारे केशर उष्ण वातावरणात पिकविण्याची किमया बोरदैवत (ता. कळवण) येथील तरुण आदिवासी शेतकऱ्याने केली. या तरुणाचे नाव आहे, अनिल पवार. पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळा प्रयोग करण्याची खूणगाठ बांधलेल्या या तरुण शेतकऱ्याने चक्क केशरची शेती फुलवत स्थानिक...
मार्च 18, 2017
धुळे - मालपूर (ता. शिंदखेडा) येथील अमरावती धरणात अकरा वर्षांपासून पूर्ण क्षमतेने जलसाठा झालेला नाही. धरणाचे काम झाल्यापासून एकदाही देखभाल- दुरुस्ती न झाल्याने दुरवस्था झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अमरावती प्रकल्प तापीच्या पाण्याने भरण्यासाठी प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेला गती...
जानेवारी 29, 2017
पुणे - संदेश फलकांतून स्वच्छतेचा जागर, पथनाट्यातून उलगडलेले स्वच्छतेचे महत्त्व...तरुणांनी एकत्र घेतलेली शपथ अन्‌ ‘स्वच्छ पुण्यासाठी’ दिलेले योगदान...अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी शनिवारी ‘ग्रीन पुणे, क्‍लीन पुणे’चा संदेश पुणेकरांना दिला. सुमारे १२० ठिकाणी पाच हजार तरुण-तरुणींनी एकत्र येऊन...
जानेवारी 13, 2017
सेवा हमी कायदा; अंमलबजावणीबाबत उदासीनता पुणे - नागरिकांना तत्पर सेवा मिळावी, यासाठी राज्य सरकारने सेवा हमी कायदा लागू केला. त्यास वर्षभराचा कालावधी होऊनदेखील त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आले आहे. काही प्रमुख शासकीय कार्यालयांमध्ये ‘सकाळ’च्या ‘टीम’ने प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या...
जानेवारी 12, 2017
चौदा वर्षांपूर्वी दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेल्या उद्योगाने आता निर्यातक्षम म्हणून लौकिक कमावला आहे. कार्याचा विस्तार तीन एकरांवर पसरला असून, तिनशे कामगार काम करत आहेत. उद्योग तोट्यात गेल्याने फटका सोसला, त्यावर मात केली. अभियांत्रिकी विशेषतः उद्योग क्षेत्राची कोणतीही पार्श्‍...
जानेवारी 07, 2017
रत्नागिरी - धीरुभाई अंबानी यांची ८४ वी जयंती, रिलायन्स फांउडेशनचा वर्धापन दिन यानिमित्त महिला, पशुपालक, मच्छीमार शेतकऱ्यांसाठी ज्ञानगंगा कार्यक्रम भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात झाला. या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ने माध्यम प्रायोजकत्व दिले होते. सुरवातीला रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत...