एकूण 778 परिणाम
जून 25, 2019
पुणे :  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव हळूहळू वाढत चालले आहेत. सध्या किरकोळ बाजारात प्रतिकिलो 25 रुपये या भावाने कांद्याची विक्री होत आहे. शेतकऱ्यांनी पावसाळ्याच्या तोंडावर मोठ्या प्रमाणावर कांदा साठवणूक करण्यास सुरवात केली आहे. कांद्याला जादा भाव मिळण्याची शक्‍यता असल्याने तो साठवला जात आहे...
जून 24, 2019
पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. उशिराचा...
जून 21, 2019
पुणे - अरबी समुद्रात आलेल्या वायू चक्रीवादळामुळे आगमन लांबलेल्या मॉन्सूनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मॉन्सूनने गुरुवारी (ता. २०) कोकणात दमदार हजेरी लावत रत्नागिरी, तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या कोल्हापूरपर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. मॉन्सून दाखल झाल्यानंतर शनिवारपासून (ता. २२...
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 19, 2019
मुंबई - राज्याचा अर्थसंकल्प सादर होत असताना अर्थसंकल्पातील तरतुदी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या ट्‌विटर हॅंडलवरून व्हायरल झाल्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्प...
जून 18, 2019
चिपळूण - बाजारात 40 रुपये दराने मिळणारे चंदनाचे रोप काही संस्था चंदन कन्या योजनेच्या नावाखाली 160 रुपये दराने शेतकऱ्यांच्या माथी मारत आहेत. चंदनकन्या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुट सुरू आहे.  चिपळूणात एका स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. ज्यांच्या घरात मुलगी जन्माला...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 14, 2019
पुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही...
जून 13, 2019
पुणे : भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्यामुळे दौंड तालुक्‍यातील धनाजी गेनबा धुमाळ या धरणग्रस्त शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील रेलिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही धक्‍कादायक घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. या वेळी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनी धुमाळ यांना ओढून...
जून 12, 2019
वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांना चारा छावणीमुळे आधार मिळाला असून निरवांगीच्या छावणी हाउस फुल झाली आहे. छावणीमध्ये ३३१ शेतकऱ्यांची १२५० जनावरे दाखल झाली आहेत. गतवर्षी इंदापूर तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवल्यामुळे चालू वर्षी तालुक्यामध्ये दुष्काळी तीव्रता वाढली....
जून 09, 2019
रत्नागिरी - कोकणच्या मुलभूत प्रश्‍नांवर पहिले कोकण रोजगार हक्क महाआंदोलन होणार आहे. येत्या 17 जूनला त्याची सुरवात रत्नागिरी शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव याचे नेतृत्व करीत आहेत. पक्षविरहित आंदोलनाच्या माध्यमातून बेरोजगारी,...
जून 09, 2019
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. पुणे...
जून 07, 2019
रत्नागिरी जिल्ह्यातील शिरळ येथील अनिकेत बापट हा युवक तीन वर्षांपासून कोकणगिड्ड या स्थानिक देशी गायीच्या संवर्धनात गुंतला आहे. कोकणातील हे जातीवंत ‘ब्रीड’ नामशेष होत चालले आहे. त्या धर्तीवर त्यांची संख्या वाढवण्याचा त्याचा उद्देश आहे. सध्या त्याच्याकडे १५ गायी आहेत. गोमूत्र व शेणापासून विविध...
जून 06, 2019
पुणे - हवामान खात्यातर्फे शेतकऱ्यांना दिला जाणारा कृषी हवामान सल्ला देशभरातील आणखी दोनशे जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय हवामान खात्याने घेतला आहे. त्यासाठी या जिल्ह्यांमध्ये कृषी हवामान सल्ला केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.  ‘‘शेतकऱ्यांनी कोणत्या हंगामात नेमके...
जून 05, 2019
पुणे - मधमाश्या नृत्य करतात हे माहीत आहे का? त्यांच्यामुळे मध जसा मिळतो, त्याप्रमाणे परागीभवन होऊन झाडांना जास्त फळं लागतात, हे माहीत होतं का? मधमाश्यांचं विलक्षण जीवन समजून घेण्यासाठी जाऊया पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील 'केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण केंद्रा'त. "मधमाश्या नृत्य करत आहेत, असं...
जून 04, 2019
पुणे - खेडेगावातील मोकळ्या जागेत विटी-दांडू खेळणारी मुलं, लंगडी खेळणाऱ्या मुलींच्या चेहऱ्यावरील हसू, मैदानात रंगलेली कुस्ती... असं जल्लोषपूर्ण वातावरण त्या ठिकाणी कायम असतं. हे गाव वसलं आहे पाषाणमधील सोमेश्वरवाडीतील ग्रामसंस्कृती उद्यानात. गजबजलेल्या या गावात गेल्यावर तिथून आपला पाय निघत नाही. ते...
जून 02, 2019
जळगाव : मतदारसंघातील सिंचन प्रकल्पांना प्राधान्य देण्यासोबतच विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या रस्ते व रेल्वे विकासालाही चालना देण्यात येईल. रोजगार निर्मितीसाठी जळगाव एमआयडीसी व अन्य ठिकाणी औद्योगिक वसाहती उभ्या करणे हे विषयही या पाच वर्षांत आपल्या अजेंड्यावर राहतील. मतदारसंघाच्या...
जून 01, 2019
पाच महिन्यांत ८०९ शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा सोलापूर - दुष्काळ, नापिकी, खासगी सावकार आणि बॅंका, पतसंस्थांच्या कर्जाचा डोक्‍यावर असलेला डोंगर, मुला-मुलींचे विवाहाला, शिक्षणाला पैसा नाही, हमीभावाची प्रतीक्षा अशा प्रमुख कारणांमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...