एकूण 1047 परिणाम
जून 15, 2019
यवतमाळ : शेतकरी सुलतानी आणि अस्मानी संकटाखाली पुरता पिचला गेला आहे. तरीही खरीप हंगामात मोठ्या उमेदीने उठून उभा झाला. मात्र, वेळेवर राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीक कर्जासाठी नकारघंटा वाजविली जात आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात जावे लागत आहे. गेल्या पाच...
जून 15, 2019
चंद्रपूर ः पूरग्रस्त शेतात सौरपंपाचा अट्टहास चंद्रपूर : शेतकऱ्यांनी थ्री फेज वीजपुरवठ्यासाठी महावितरणकडे अर्ज केला. आता मात्र महावितरणने थ्री फेजऐवजी सौरपंपाचा अट्टहास धरला आहे. पूरग्रस्त शेतातील सौरपंप शेडच्या सुरक्षेवरून बळीराजा साशंक आहे. थ्री फेज वीजपुरवठा मिळणार, या आशेने लाखो रुपये खर्चून...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर या सरकारने घेतलेल्या योग्य व चांगल्या निर्णयामुळे साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. कागलच्या शाहू साखर कारखान्याचे संस्थापक (कै.) विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याचे अनावरण श्री....
जून 13, 2019
कागल - कोणत्याही क्षेत्रात कोण "परमनंट' नसते, राजकीय क्षेत्रात जे रस्ता भरकटत गेले अशा अनेक दिग्गजांना जनतेने घरी बसवले आहे. राजकारणात पाच वर्षासाठी जनता निवडून देते, पण काही लोक स्वतःला अमरत्त्व प्राप्त झाल्यासारखे जगतात, पण त्यांनी तसे समजू नये, राजकारणात कोण "परमनंट' नसते, असा टोला राज्याचे...
जून 13, 2019
कोल्हापूर - "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी गेल्या चार वर्षात केलेले काम पाहता त्यांची शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी आताच जाहीर करा, त्यांना राज्यात विक्रमी मताधिक्‍यांनी विजयी करू, अशी ग्वाही आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या...
जून 09, 2019
लासूर (जि. औरंगाबाद), ता. 8 ः मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीने शासन काम करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. गंगापूर तालुक्‍यातील लासूर स्टेशन येथे जानकीदेवी बजाज फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या चारा छावणीस फडणवीस यांनी आज भेट...
जून 07, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या धावत्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी भाजपाध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीतील नावे मुख्यमंत्र्यांनी पक्षनेतृत्वाकडून 'फायनल' करून...
जून 05, 2019
मुंबई - धुळे जिल्ह्यातील कल्पेश आणि प्रियांका देवरे या नवविवाहित दांपत्याने नोंदणी पद्धतीने विवाह करून लग्न समारंभाच्या आयोजनात वाचवलेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस दिली आहे. राज्यातील दुष्काळ निवारणासाठी मदत म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 2 लाख 51 हजारांचा धनादेश आज...
जून 01, 2019
कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-...
जून 01, 2019
मंगळवेढा : तालुक्यातील रहाटेवाडी व तामदर्डी दरम्यान असणारा पूल गाळाने भरले आहे. या गाळात साचलेल्या पाण्यामुळे लगतच्या तीन गावातील तब्बल 700 एकर क्षेत्र क्षारपड झालेली असून संबंधित खात्याच्या निष्काळजीपणामुळे  या भागातील शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.  या शहरातील जमिनीला जादा पाणी...
मे 28, 2019
वालचंदनगर : इंदापूर तालुक्यासह राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीसाठी आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेवून सरसकट कर्जमाफी मागणी लावून धरली आहे.  इंदापूर तालुक्यासह राज्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीस आला आहे....
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 23, 2019
पुणे ः पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी कॉंग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांच्या पेक्षा 65 हजारांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांच्या विजयसाठी निर्णायक ठरत आहे. राज्यात मंत्री असणारे बापट हे खासदार म्हणून निवड होणारे पहिलेच मंत्री असल्याने पुण्यातील भाजपचे कार्यकर्त्यांचा जल्लोष...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील  यांनी...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
एप्रिल 27, 2019
नाशिक -‘‘नाशिक दत्तक घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही विकासकाम केले नाही. याउलट मनसेच्या सत्ताकाळात झालेली कामे स्मार्ट सिटी प्रकल्पात दाखवून खोटारडेपणा दाखविला. नाशिकची वाताहत होत असताना कुठे गेला नाशिककरांचा दत्तक बाप?’’ असा थेट सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
एप्रिल 26, 2019
लोकसभा 2019 नाशिक : आज येवल्यात मुख्यमंत्र्यांची सभा होत असून, अर्धनग्न आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुणास कुठलीही गडबड करु नये म्हणून पहाटे 5 वाजल्यापासून स्थानिक साध्या वेशातील पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे. 'मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने...