एकूण 1047 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
औरंगाबाद: सुरवातीला कमी झालेल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगामही कोरडा जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतर झालेल्या पावसामुळे पेरणीसाठी पोषक वातावरण तयार होऊन खरीप हंगामात तब्बल 93.98 टक्के पेरणी झाली. रब्बी हंगामासाठी शेतकरी जोमाने कामाला लागला आहे. जिल्ह्यातील...
ऑक्टोबर 15, 2019
नवेगावबांध(गोंदिया) : येथील जलाशयात गाळ साचला असून, बुडीत क्षेत्रातील जागेवर अवैधरित्या अतिक्रमण करण्यात आले. तेथील शेतात शेतकरी पीक लागवड करतात. पिकांवर रासायनिक खते, कीटकनाशक औषधी फवारणी करतात. त्यामुळे जलाशयातील पाणी दूषित, विषारीयुक्‍त झाले असून, नवेगावबांध ग्रामपंचायत, सिरेगाव,...
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता पसरली आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः सोयगावसह तालुक्‍यात दुष्काळाची धग अधिकच तीव्र होत आहे. मजुरांना कुटुंबाची चिंता लागली असल्याने तालुक्‍यात दोन दिवसांत चक्क चारशेंवर मजुरांनी कुटुंबांसह स्थलांतर केल्याचे रविवारी उघड झाले आहे. आदिवासी तालुका म्हणून सोयगावची ओळख आहे. सततच्या पावसाने पिकांचे झालेले नुकसान आणि...
ऑक्टोबर 13, 2019
साकोली (जि. भंडारा) : मतदार आता आंधळेपणाने मतदान करीत नाही. तो विकास करणाऱ्यालाच मते देतो आणि गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने विकासाची अनेक कामे केली आहेत. घराघरांत शौचालये झाली, ग्रामीण भागात सर्वांना वीज पुरविण्यात आली, गरिबांचे घरांचे स्वप्न साकार होत आहे, चांगल्या दर्जेदार रुग्णालयातून मोफत...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 13, 2019
लिंबेजळगाव  (जि.औरंगाबाद) : लिंबेजळगावसह (ता.गंगापूर) परिसरातील असलेल्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तिचे पाने लाल होऊन सुकून जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. संबंधित कृषी विभागाने मात्र वेगळाच जावईशोध लावला असून, त्यांच्या मते हा रोग नसून पोषक...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 11, 2019
नाशिक :  काही वर्षांत सातत्याने पावसाचा कालावधी बदलतो आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागा (आयएमडी)च्या व्याख्येनुसार मॉन्सून 1 जूनला सुरू होऊन 30 सप्टेंबरला संपतो. आता मॉन्सूनचा पॅटर्न बदललेला सल्याने 15 नोव्हेंबरपर्यंत होणारा पाऊसदेखील मॉन्सूनमध्ये मोजण्यासाठी मॉन्सूनची व्याख्या बदलण्याची...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 10, 2019
नामपूर : राज्यात निर्माण झालेल्या अतिरिक्त दूध व दूध भूकटीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात पूरक आहार म्हणून दूध भुकटीचा समावेश करण्याचा कल्याणकारी निर्णय शालेय शिक्षण विभागाने गेल्यावर्षी घेतला होता. अद्यापही ग्रामीण भागात दुधाची...
ऑक्टोबर 09, 2019
कोल्हापूर - माहिती तंत्रज्ञानामुळे टपालाव्दारे पाठविल्या जाणाऱ्या पत्रांची संख्या काहीशी कमी जरूर झाली आहे तरीही कार्यालयीन कामकाजातील कागदपत्रे टपालाव्दारे पाठवण्याचे महत्व आजही कायम आहे अशी पत्रे घेऊन घरोघरी जाणाऱ्या पोस्टमनला टपाल खात्याच्या अनेक महत्वपूर्ण, जनउपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी...
ऑक्टोबर 09, 2019
सोयगाव (जि.औरंगाबाद) ः जरंडी (ता. सोयगाव) गावालगतच्या पटेलनगरात झोपडीत बांधून ठेवलेल्या वीस शेळ्यांवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत त्यांचा फडशा पाडला. ही घटना मंगळवारी (ता.आठ) दुपारी घडली. शेळ्यांचे मालक घरी नसल्याची संधी साधून झोपड्यात शिरून या मोकाट कुत्र्यांनी वीस शेळ्या फस्त केल्या. जरंडी...
ऑक्टोबर 07, 2019
कलेढोण : मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावात गेल्या पाच वर्षांनंतर पाणीसाठा वाढत असून, तलावाला लागलेल्या गळतीने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. पाटबंधारे विभागाकडून ही गळती काढण्याची मागणी शेतकरी, निसर्गप्रेमी संघटनांनी केली आहे. तलाव भरण्यासाठी केवळ तीन ते चार फुटांवर आला असताना ही गळती सुरू...
ऑक्टोबर 07, 2019
जलालखेडा (जि.नागपूर) : नागपूर जिल्यातील नरखेड व काटोल तालुक्‍यातील अति उष्ण तापमानामुळे वाळलेल्या संत्रा व मोसंबी झाडांचे अनुदान मिळावे ही मागणी शेतकरी मागील चार महिन्यांपासून करीत आहे. मात्र, निवडणूक लागल्यावरही काहीच निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.  मार्च ते जुलै...
ऑक्टोबर 06, 2019
पिशोर  (जि.औरंगाबाद) : माळेगाव ठोकळ (ता.कन्नड) परिसरातील मका पिकावर दुर्मिळ करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जवळपास सत्तर टक्के मक्‍याचे पीक वाया जाऊन केवळ चारा शिल्लक हातात राहणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मका पीकविषयक कृषितज्ज्ञ डॉ.एस.बी.पवार, डॉ.जगताप, डॉ.त्रिपाठी...
ऑक्टोबर 04, 2019
यवतमाळ : मराठवाडा व विदर्भातील निवडक जिल्ह्यातील शेतकरी गटांना मत्स्यव्यवसायासाठी फिरते वाहन देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली होती. मात्र, राष्ट्रीय मत्स्यिकी विकास मंडळाकडून 40 टक्के सहभाग प्राप्त न झाल्याने दहा लाखांच्या अनुदानाची ही योजना राज्यशासनाने सहा लाखांवर आणली आहे....
ऑक्टोबर 04, 2019
मंठा-  परिसरात सकाळी धुके पडत आहे. वातावरणातील या बदलामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.  मंठा तालुक्‍यात अत्यल्प व रिमझिम पावसावर खरिपाच्या सोयाबीन, उडीद, मूग, कापूस पिकांची वाढ झाली आहे. तर अनेक भागात उडीद, मुगाची काढणी सुरू आहे. सोयाबीन पीक काढणीस आले...
सप्टेंबर 30, 2019
जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्‍यात यंदाच्या खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी व महसूल विभागाने सर्वेक्षण केल्यास नुकसानाचा खरा अंदाज पुढे येईल. संत्रा व मोसंबी या फळांचीदेखील बुरशीजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात गळण होत आहे. अंबिया बरोबर मृग बहराचे मोठ्या...
सप्टेंबर 29, 2019
पारशिवनी (जि नागपूर ) : फळबागेचे सुयोग्य व्यवस्थापन आणि मेहनतीच्या बळावर, जिद्द आणि चिकाटी ठेवून काम करत असताना कृषी सहायक आर. जी. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळेच आपल्याला हा कृषी क्षेत्राचा गौरव करणारा उद्यानपंडित पुरस्कार मिळाला असल्याचे चंद्रकला चक्रवर्ती यांनी सांगितले.  नुकताच महाराष्ट्र...