एकूण 13 परिणाम
मार्च 23, 2019
तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला. तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी,...
जून 26, 2018
रखरखीत उन्हाळा संपतो आणि चराचराला पावसाचे वेध लागतात. हवा बदलते. अधुनमधून वळवाच्या पावसाच्या सरी ओघळतात. भल्या पहाटे पासूनच पावशा पक्षी पेरते व्हा अशी शेतकऱ्याला साद घालू लागतो. शेतकरीही घाईगडबडीने पेरणीची तयारी करतो. बघता बघता झाडं, वेली, नव्या लाल पोपटी पर्णसंभाराने नटू लागतात. अवघा निसर्ग...
मे 14, 2018
कोणतीही गोष्ट देताना त्यामागे देणाऱ्याची आपुलकीची भावना असेल, तर घेणाऱ्यालाही समाधान वाटते, त्याचा स्वाद वेगळाच असतो. मध्यंतरी आम्ही दोघे नृसिंहवाडीला गेलो होतो. नृसिंहवाडी तशी आम्हाला नवीन नाही, पण बरेच वेळा जाऊनही नृसिंहवाडीत मुक्काम करता आला नव्हता. कधी मुलांच्या शाळा यांची कामाची गडबड. पण आता...
मार्च 30, 2018
लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते. कृषी पदवीधर आनंद बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाला. काही दिवसांतच अतिग्रामीण, दळणवळणचा अभाव, तेलुगू भाषेच्या प्रदेशांत नवीन शाखा उघडण्याकरिता आनंदची नियुक्ती झाली....
फेब्रुवारी 12, 2018
शून्य मशागत तंत्राने शेती होऊ शकते. ती आजच्या काळाची गरज आहे. प्रदूषण व अन्नाचा तुटवडा या दोन गंभीर प्रश्‍नांवर विचार करू लागल्यावर असे प्रयोग सुचू लागतात. आपली संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. ही कृतज्ञता मातृभूमीबद्दल जशी असायला हवी, तशी शेतकऱ्याबद्दलही असायला हवी. शेतकरी...
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे ऐकून होतो....
ऑक्टोबर 27, 2017
रेहकुरीची म्हातारी गेली. ‘अतिथी देवो भव’ हे सुभाषित माहीत नसलेल्या त्या म्हातारीचा शहरी अनोळखी पाहुण्यांच्या पोटात काही तरी जावे म्हणून केलेला आटापिटा आठवला. माळावर ती फुलली, तिथेच कोमेजली. एका दिवाळी अंकासाठी रेहकुरी अभयारण्याविषयी लिहायचे होते. रेहकुरीला काळविटांचे अभयारण्य आहे एवढे ऐकून होतो....
ऑक्टोबर 04, 2017
आई पंढरीची वारकरी, तर सासू पुरेपूर संसारी. एक पंढरीच्या काळ्याला भेटू पाहणारी, तर दुसरी काळ्या जमिनीत विठूचैतन्याला भेटणारी. दोघींच्याही सावळ्या गोवितात मी गोवत गेले. मनात आले आणि पंढरीत जाऊन रायाला भेटले. गाडीने जायाचे नि रायाला भेटून यायाचे, इतकें सोपे झाले. हे भेटणे सोपे, तितकेच जगणेही सोपे झाले...
सप्टेंबर 02, 2017
पश्‍चिम बंगालमध्ये भाद्रपदातील एकादशीला काही शेतकरी "कदंब उत्सव' साजरा करतात. या दिवशी कदंबाचे रोप लावून त्याची पूजा केली जाते. त्यानंतर सामूहिक नृत्य केले जाते. गाणी गाईली जातात. "तोच चंद्रमा नभात' हे अतुल्य काव्य प्रतिभेने रचलेले व लोकप्रिय झालेले गाणे, शांता शेळके यांना "काव्य...
ऑगस्ट 21, 2017
रोजगारासाठी लोक गाव सोडत आहेत. गावाबरोबर सुटतो त्यांचा आहार. खाण्याचा कस, चव आणि बहुविध वनस्पती. या रानभाज्या शहरात कुठे मिळणार? या सगळ्या बांधावरच्या भाज्यांच्या बलिदानावर आज शहरे उभी राहत आहेत. आमच्या शेताशेजारी मलन्नाचे शेत होते. त्याच्या व वडिलांच्या गप्पा व्हायच्या. वरण-आमटीमधील डाळींच्या...
जून 04, 2017
सध्या शेतकरी आंदोलन रस्ता आणि फेसबुक या दोन स्तरावर सुरू आहे. शेतकरी आपली ढेपाळलेली आर्थिक परिस्थिती सावरावी म्हणून रस्त्यावर उतरून लाल, पांढरा, हिरवा चिखल करताना दिसतोय. तो चिखल म्हणजे तुम्ही-आम्ही केलेली किंमत आहे शेतकऱ्याची. जिला त्यांनी फेसबुकवरून अधिकृतपणे स्पष्टता...
डिसेंबर 03, 2016
शिक्षण घेता घेता शेतीत धडपडणारा एक तरुण होतकरू शेतकरी मुंबईतील केईएम या पालिकेच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतो...त्याच्या उपचारांसाठी वडील दाही दिशांना धावाधाव करीत असतात...'सकाळ'मधून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतो. त्यावर तब्बल तीन महिन्यांनी तुम्हाला भेटण्यासाठी औरंगाबादहून...
ऑगस्ट 10, 2016
उपजीविकेसाठी कोणताही व्यवसाय स्वीकारावा; परंतु जीवन जगण्यासाठी "माणूस‘ मात्र अवश्‍य होता आलं पाहिजे! माणूस बनणं म्हणजे माणसानं माणसाशी माणसासारखं वागणं! साध्या भाषेत सांगायचं, तर इतरांनी आपल्याशी जसं वागावंसं वाटतं, तसंच आपण इतरांशी वागावं! माणूसपण जपण्याच्या प्रवासातील या काही छोट्या-मोठ्या बाबी...