एकूण 117 परिणाम
जून 20, 2019
नागठाणे - ‘गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे या दुर्गम भागातील गावाने बचतगटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ १०० रुपयांवर सुरू झालेल्या इथल्या बचत गटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे. रेवंडे हे...
मे 21, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील...
मे 16, 2019
मालाड - जिद्द असली की, मनुष्य कठीण वाटणारे ध्येयही साध्य करू शकतो. त्याचीच प्रचीती शेतकरी कुटुंबातील मारुती कांबळे यांनी नांगराऐवजी कुंचला हाती घेऊन चित्रकलेतील प्रगतीतून दिली आहे. कलाशिक्षक म्हणून काम करणाऱ्या कांबळे यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन नुकतेच फोर्ट परिसरातील आर्ट प्लाझा...
मे 10, 2019
पुणे -  रणरणत्या उन्हात, ओसाड पडलेल्या रानात, चारापाण्यावाचून तहानलेल्या, भुकेलेल्या जनावरांना आणि माणसांना दिलासा देण्याच्या भावनेतून शहरातील बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी युवराज ढमाले कॉर्पच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. माण तालुक्‍यातील १८ चारा छावण्यांवर...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
मे 07, 2019
सिल्लोड - दुष्काळी परिस्थितीशी शेतकरी सातत्याने तोंड देत असताना वर्गमित्र शेतकऱ्यांची पैशांसाठी होणारी दमछाक टाळण्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत वर्गमित्रांनी एकत्र येत बचत गट तयार केला. या बचत गटाच्या माध्यमातून शेती व्यवसाय करीत असलेल्या शेतकरी वर्गमित्रांना अल्प...
एप्रिल 24, 2019
उस्मानाबाद - खडकाळ माळरानावर जेसीबीच्या साह्याने चर मारून आंबा पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याची किमया सांगवी-काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी साधली आहे. विशेष म्हणजे तीन एकरांवरील सर्व आंतरपीक सेंद्रिय पद्धतीने केले असून ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय पाटील...
एप्रिल 22, 2019
पुणे -  रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षामध्ये (आयसीयू) मुलावर उपचार सुरू होते. शेतीत काबाडकष्ट करणारे त्याचे वडील रुग्णालयात मुलगा केव्हा बरा होईल, हा विचार करीत बसले होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या खुर्चीजवळच भरपूर नोटा पडलेल्या दिसल्या. क्षणभरही मन विचलित होऊ न देता त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ही...
एप्रिल 10, 2019
तुर्भे - उन्हामुळे अंगाची काहिली होत आहे. त्यामुळे नागरिकांची पावले आपसूकच थंडगार उसाचा रस पिण्यासाठी रसवंतीगृहाकडे वळत आहेत. तसा खिशाला परवडणारा आणि आरोग्यवर्धक असाच उसाचा रस आहे. १५ रुपयांना एक ग्लास घेतल्यानंतर कडक उन्हाने घामाघूम झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान तरळते; तर उसातून रस...
मार्च 21, 2019
औसा - ‘रुळलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा स्वतःची वेगळी वाट निर्माण करा, परिस्थितीमुळे हतबल होऊन बसण्यापेक्षा जगण्याचे पर्याय शोधा’ याप्रमाणे तपसे चिंचोली (ता. औसा) येथील शेतकरी रमेश बिराजदार यांनी ‘धनिया’त (कोथिंबीर) धन शोधून धनवान होण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश बिराजदार यांनी केलेल्या...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
मार्च 14, 2019
राजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी...
जानेवारी 31, 2019
टाकवे बुद्रुक - दोन विहीर खोदूनही त्यात पाण्याचा पाझर फुटला नाही, हातपंपाने धोका दिला त्यातून हंडाभर पाणी आले नाही. तरीही हताश न होता मुंबईत हमाली करणाऱ्या सासरा व जावयाने साडेतीन किलोमीटरहून पाणी आणून शिवार हिरवेगार फुलविले आहे. हे साडेतीन किलोमीटरचे अंतर म्हणजे धरणाचा काठ ते सह्याद्रीचा डोंगर...
जानेवारी 29, 2019
वडणगे - घरात प्राणी, पक्ष्यांना खाद्य, पाणी देत त्यांचे संगोपन करणारे अनेक जण आपण पाहतो. वाढत्या शहरीकरणामुळे  अजूनही पक्ष्यांच्या निवाऱ्याबरोबरच त्यांना खाद्य मिळणेही अवघड झाले आहे. शिवाजी पेठेतील सुरेश दिनकर सरनाईक - नागावकर या शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रातील ज्वारीचे पीक चक्क पक्ष्यांना...
जानेवारी 27, 2019
परळी वैजनाथ - शेतातला काडीकचरा शेतातच कुजवून रासायनिक खताची मात्रा केवळ वीस ते पंचवीस टक्‍क्‍यांवर आणत शेतीचा पोत सुधारला आणि शेतीच्या उत्पन्नात दीडपट वाढ केली. हा अभिनव प्रयोग परळी तालुक्‍यातील देशमुख टाकळी येथील प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख यांनी शेतात राबवून एक आदर्श निर्माण...
जानेवारी 25, 2019
पुनाळ - समाजासाठी काहीतरी करण्याची धडपड असूनही काही युवक केवळ दुर्दम्य इच्छाशक्तीअभावी मागे राहतात; पण वयाच्या ६७ व्या वर्षीही तरुणाईला लाजवेल अशा उत्साहाने एक ६७ वर्षांचा अवलिया अवयव दानाच्या जनजागृतीसाठी घराबाहेर पडला आहे. प्रमोद लक्ष्मण महाजन, असे त्यांचे नाव. १०० दिवसांच्या मोटारसायकल दौऱ्यात...
जानेवारी 15, 2019
भवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित आईवडिलांनी चारही मुलांना आश्रमशाळेत ठेवलं. दहावीपर्यंत त्यांचा संपर्कही झाला नाही. पण, जग बदलायचे आहे हा जो जो मंत्र आईवडिलांनी दिला. तो मनात साठवला...
जानेवारी 02, 2019
सोलापूर - आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन...
ऑक्टोबर 11, 2018
पुसेसावळी - सोशल मीडियाचा वापर करून अनेक समाजोपयोगी कार्य करता येतात, याचे मूर्तिमंत उदाहरण श्रीमंत महाराजा महादजी शिंदे सरकार प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी करून दाखवले. किडणीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रेठरे हरणाक्षमधील अक्षय शंकर शिंदे (वय २२) या युवकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लाख ११ हजार...