डिसेंबर 03, 2019
बीड - राज्याच्या माजी ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी केलेली फेसबुक पोस्ट आणि त्यानंतर त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपचा उडालेला उल्लेख याचा माध्यमे आणि राजकीय विश्लेषकांकडून परिस्थितीनुरूप वेगवेगळा अर्थ काढला जात आहे; परंतु ही फेसबुक पोस्ट म्हणजे केवळ...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 26, 2019
बारामती शहर : ''तुम्ही राजकारणातून संन्यास घ्यायचा की, नाही ते बारामतीकरांना ठरवू द्या...तुम्ही बारामतीकरांसाठी जे केलयं त्याची प्रत्येक बारामतीकराला जाणीव आहे, त्यामुळे हा निर्णय तरी, आम्हाला घेऊ द्या, अशी भावनिक साद अजित पवार यांना सोशल मिडीयातून बारामतीतील अनेक जण घालू लागले आहेत...
नोव्हेंबर 25, 2019
अजितदादांना 'क्लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास मात्र उडणार, हे नक्की...
नोव्हेंबर 23, 2019
नाशिक- माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही आमदारांनी भाजपला पाठिंबा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात शनिवारी सकाळी मोठा भुकंप झाला खरा परंतू त्या भुकंपाचा धक्का नाशिककरांना कमी बसला त्याला कारण म्हणजे राज्यात जे घडले त्याच्या एक दिवस आधी महापालिकेची...
नोव्हेंबर 23, 2019
"आता काहीही बोलायचं नाही, माझ्या सोयीने भूमिका मांडीन" असं वक्तव्य अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलंय. त्यामुळे अजित पवार आपल्या मनातील भावना स्पष्ट करणार आहेत. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर अजित पवार यांच्याकडून अत्यंत महत्त्वाचं...
नोव्हेंबर 23, 2019
नगर : पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपला साथ दिली. त्यामुळेच भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. उपमहापौरपदाची संधीही भाजपलाच मिळाली. भाजपच्या मालन ढोणे उपमहापौर झाल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आदेश डावलून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या स्थानिक...
नोव्हेंबर 23, 2019
सांगली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. सांगलीतील आमदार, माजी आमदार आणि प्रमुख नेते दादांना विचारत होते, "दादा राज्यात कसं होणार?"
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
त्या साऱ्यांना दादा सांगत होते, "आपलं सरकार येणार."
आपलं जमणार, दादांच्या या वाक्यावर...
नोव्हेंबर 03, 2019
गोवत्स होऊ या!
माणसाच्या जीवनात पौर्णिमा-अमावास्या जशा अवतरतात तशीच एकादशीही अवतरते किंवा ती तशी अवतरली पाहिजे. अवतार आणि अवतरणं यांचा ईश्वरी संकेताशीच संबंध असतो. अष्टमी हा योगगर्भ आहे आणि एकादशी ही या योगगर्भाचं अवतरणं आहे. दिवाळीनंतरची अष्टमी आणि त्यानंतर येणारी प्रबोधिनी एकादशी हा माणसाच्या...
ऑक्टोबर 24, 2019
बदनापूर (जिल्हा जालना) - बदनापूर-अंबड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांनी दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार बबलू चौधरी यांचा 18 हजार 612 मतांनी पराभव केला.
या मतदार संघात बबलू चौधरी सलग तिसऱ्यांदा पराभूत झाले...
ऑक्टोबर 24, 2019
पुणे : भारतीय जनता पक्ष प्रत्येकच निवडणूक निकराची लढाई असल्याप्रमाणे लढते आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरतात. यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मोदींनी एकूण नऊ सभा घेतल्या. यामध्ये जळगाव, सातारा, परळी, मुंबई (...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 03, 2019
सातारा : लोकसभा पोटनिवडणुकीतील सामना आता पक्का झाला आहे. मतदार तेच असले तरी, उमेदवारांसाठी मते मागणारे बदलणार आहेत. अनेकांना पाच महिन्यांपूर्वी घेतलेल्या भूमिकेच्या उलट भूमिका घ्यावी लागणार आहे. विकास व प्रतिमा या दोन महत्त्वाच्या मुद्यावर ही निवडणूक लढली जाईल, असे संकेत सुरवातीच्या प्रचारातून येऊ...
सप्टेंबर 14, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहायचे की अन्य पर्यायांचा विचार करायचा याचा आमदार संध्यादेवी कुपेकर यांचा फैसला रविवारी (ता. १५) मुंबईत होणार आहे. पक्षाध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी श्रीमती कुपेकर यांना भेटीची वेळ दिली आहे. या भेटीतच हा निर्णय होणार आहे. ...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मार्च 12, 2019
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर...
फेब्रुवारी 24, 2019
पुलवामातला दहशतवादी हल्ला मुंबईवरच्या हल्ल्यानंतरचा सर्वांत खतरनाक हल्ला आहे. इतका भयानक हल्ला झाल्यानंतर देशवासीयांच्या भावना लक्षात घेता प्रत्युत्तर दिलं जाईलच. सरकारला काही कृती करावीच लागेल. ती पाकला धक्का देणारी करावी लागेल. यासाठी लष्करी नेतृत्व योग्य वेळ आणि स्थळ निवडेलही. मात्र, पाकपुरस्कृत...
फेब्रुवारी 03, 2019
प्रियंका गांधी सन 1999 मध्ये सोनियांच्या प्रचारासाठी बेल्लारीत फिरत होत्या तेव्हा त्यांना "सक्रिय राजकारणात येणार का' असं विचारण्यात आलं असता "त्यासाठी दीर्घ काळ वाट पाहावी लागेल' असं उत्तर त्यांनी दिलं होतं. प्रियंकांना राजकारणात आणण्याची इच्छा असणाऱ्यांची प्रतीक्षा आता 20 वर्षांनी संपली आहे....
जानेवारी 17, 2019
सकाळी मुलांना शाळेत सोडून घरी येताना गाडीत रेडिओ लावला त्यावर पु.ल.च्या आयुष्यावरच्या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु होती, त्यात बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. का कुणास ठाऊक पण पु.ल.चा अंतूबर्वा आठवला. पु.ल.चं लिखाण आणि त्याहून वाचन हे इतकं प्रभावी होतं की त्यांच्या कथेतील पात्रं आयुष्यभर स्मरणात राहायचे...
जानेवारी 06, 2019
अमेरिकी सैन्य सीरियातून माघारी घेण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अफगाणिस्तानातलंही सैन्य कमी केलं जाणार असल्याचं सूतोवाच त्यांनी याच वेळी केलं. जगाला धक्के देण्याची ट्रम्पशैली आता परिचित होत चालली आहे. ही सैन्यमाघार त्या शैलीला अनुसरूनच झाली. अमेरिकेची पारंपरिक भूमिका...