एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
सौरभ हा आक्रमक फलंदाज होता, त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या दहा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातही तो काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकेल. विसावे शतक संपत आलेले असताना, भारतीय क्रिकेट एका मोठ्या सावटाखाली आले होते. ‘मॅच फिक्‍सिंग’च्या आरोपामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिगंत कीर्ती मिळवणाऱ्या भारतीय...
मार्च 23, 2019
भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीवर नजर टाकली तर पक्षाने फार मोठे फेरबदल केलेले नाहीत. लालकृष्ण अडवानी यांच्या बाबतीत अपवाद म्हणावा लागेल; पण तोही अनपेक्षित नव्हता. संपूर्ण भारतवर्षांचेच नव्हे, तर अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी अखेर भारतीय...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 05, 2019
शिमग्याच्या सणास अद्याप दोन आठवडे बाकी असतानाच देशात "राजकीय धुळवड' सुरू झाली आहे. खरे तर लोकसभा निवडणुका जेमतेम दीड महिन्यावर आल्यामुळे अशी धुळवड अपेक्षितच असली, तरीही आताची धुळवड ही देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरून सुरू होणे मात्र कोणालाच रुचणारे नाही. पुलवामा येथे "जैशे महंमद' या...
डिसेंबर 11, 2018
विरोधी आघाडीचे मोठे आव्हान भाजपपुढे उभे राहण्याची चिन्हे दिसत असून भाजपला आपल्या रणनीतीत बदल करावा लागेल. सध्या अवघा मोदीविरोधक मेळवावा या सूत्राने सुरू असलेल्या प्रयत्नांना पर्यायी कार्यक्रमाचीही जोड द्यावी लागेल. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच्या संसदेच्या पूर्ण अधिवेशनाच्या...
डिसेंबर 08, 2018
महाराष्ट्र राज्याची स्थापना १९६०ची. गेल्या ५८ वर्षांत विविध व्यवहारक्षेत्रांमध्ये मराठीचा वापर अनिवार्य करायला हवा होता. ते न करता आपण अमराठी शाळांमध्ये मराठी अनिवार्य करावं का, करायचं तर कुठल्या टप्प्यावर करावं, याचा खल करतो, ही गोष्ट आपल्या भाषाधोरणाची सद्यःस्थिती व्यक्त करायला पुरेशी आहे. इतर...
नोव्हेंबर 27, 2018
माझ्या तमाऽऽम मावळ्यांनो, सरदारांनो, दरकदारांनो... आणि माता-भगिनीन्नो, आपल्या कृपाशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जोरावरच आम्ही श्रीराम मंदिराचे शिवधनुष्य खांद्यावर पेलिले आहे. (टाळ्या आणि कुचकट हशा!) पाठीवरल्या भात्यात मुबलक बाण आहेत!! (हिप हिप हुर्रेची ओरड) भारताच्या सर्व प्रश्‍नांवर...
नोव्हेंबर 12, 2018
कर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर मापदंड होऊ शकत नाही. त्यावरून केवळ राजकीय हवेचा रोख कोणत्या दिशेला आहे याचे आकलन होऊ शकते. वर्तमान राजवटीचे सहनायक व सत्तापक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनीही...
नोव्हेंबर 03, 2018
राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र असे काही नसते, असे म्हटले जाते. हे अगदी सर्वांच्या बाबतीत सर्व काळ खरे नसते. मात्र, भारतीय राजकारणात त्याचा प्रत्यय अधूनमधून येतो आणि प्रादेशिक अस्मितेवर आधारित राजकारण करणाऱ्यांच्या बाबतीत तर बऱ्याचदा येतो. तीन दशकांहून अधिक काळ कॉंग्रेसचे कट्टर वैरी असलेले...
ऑगस्ट 17, 2018
अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने सार्वजनिक आणि संसदीय जीवनातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. वाजपेयी यांनी देशाची सेवा अखंडपणे केली. देशहिताच्या प्रश्‍नांच्या आड पक्षभेद येता कामा नये, असा त्यांचा दृष्टिकोन असे. संसदीय राजकारणात स्वत:च्या विचारांचा पाठपुरावा करतानादेखील...
ऑगस्ट 13, 2018
राजकारणात दरवेळीच "ठंडा कर के खाओ' किंवा "कुंपण-बैठक-नीती' मदतीला येते असे नाही. कधी कधी ही युक्ती अंगाशी येते. हाच प्रकार राज्यसभेच्या उपसभापतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाहण्यास मिळाला. विरोधी पक्षांनी थोडी चतुराई आणि चपळाई दाखवली असती, तर ही निवडणूक चुरशीची होऊ शकली असती. सत्तापक्षालादेखील...
जून 21, 2018
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!' ही घोषणा आणि भावी शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेला "स्वबळावर लढणार आणि जिंकणार!' हा नारा, यात नवे काहीच नसले, तरी त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी "संपर्क से...
जून 12, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात देशातील विविध विचारसरणीच्या, विविध समाजगटांत जनाधार असलेल्या शक्ती एकत्र आणण्याची पवारांची व्यूहरचना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील हा संदेश अगदी स्पष्ट आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून विरोधकांचा नेता कोण,’ असा प्रश्‍न...
मे 01, 2018
‘राष्ट्रवादी काँग्रेस’ने महाराष्ट्र या बालेकिल्ल्यात खांदेपालट केला असून पक्षसंघटनेत नव्याने जान फुंकण्याच्या दृष्टीने आणि राज्याच्या विविध भागांत पक्षाचा विस्तार व्हावा, यादृष्टीने ही निवड करण्यात आली आहे. निवडणुकांच्या ऐन हंगामात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील ‘राष्ट्रवादी काँग्रेस’...
मार्च 07, 2018
के. चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतला आहे, तो प्रादेशिक पक्षांच्या एकत्रित आघाडीचा. प्रादेशिक पक्षांचे महत्त्व आणि त्यांनी गोंजारलेल्या अस्मिता यांना त्यात मुख्य स्थान राहील; पण अशी आघाडी साकारण्यात अडचणी आहेत. दे शात आजवर विरोधकांना एकत्र आणण्याचे अनेक ‘प्रयोग’ झाले. १९६७ मध्ये डॉ. राममनोहर लोहिया...
फेब्रुवारी 06, 2018
वर्चस्ववादी राजकारण आणि निवडणूक काळात दिलेली वारेमाप आश्‍वासने, यामुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणीत भर पडते आहे. रालोआतील घटक पक्ष त्या कारणांमुळेच अधिक आक्रमक होताना दिसताहेत. ती न दशकांनंतर संपूर्ण बहुमत मिळवून सत्ता संपादन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षांनी घेतलेल्या आक्रमक...
डिसेंबर 20, 2017
गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ता राखण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असले, तरी याच निकालांनी आत्मविश्‍वास दिला तो कॉंग्रेस, तसेच अन्य विरोधी पक्षांना. देशाच्या राजकारणात मोदी यांच्या नेतृत्वाखालील अश्‍वमेधाचा घोडा वेगाने दौडत असतानाही, विरोधकांसाठीचा राजकीय अवकाश शिल्लक आहे, याचे भान विरोधकांना आले...
ऑगस्ट 29, 2017
पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर रविवारी "राष्ट्रीय जनता दला'चे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या मेळाव्याने भारतीय राजकारणात पुनश्‍च एकवार "महागठबंधना'चा नवा फड उभा राहिला आहे! या फडातील पात्रे तीच होती; मात्र नितीशकुमार यांनी अलीकडेच विरोधी पक्षांशी काडीमोड...