एकूण 458 परिणाम
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 13, 2019
मुंबई - ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय खेळी करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांची कोंडी केली आहे. नीरा-देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी रोखण्याचे आदेश राज्य सरकारने आज जारी केले.  "...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 08, 2019
बारामती शहर - येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय रुग्णालय यांच्या उभारणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात १२० कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये आज ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी...
जून 07, 2019
पंढरपूर - निरा देवधर धरणाचे बारामती इंदापूर तालुक्यासाठी दिलेले नियमबाह्य पाणी बंद करून ते लाभ क्षेत्रातील सांगोला माळशिरस फलटण भोर पंढरपूर या दुष्काळी भागासाठी द्यावे या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील शेतकर्यांच्या वतीने फाशी आंदोलन करण्यात आले. निरा देवधर धरणातून निरा डाव्या कालव्यातून बारामतीला...
जून 02, 2019
मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट केलेल्या अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. निधी चौधरी यांनी 17 मेला महात्मा गांधीविषयी वादग्रस्त ट्विट केले होते...
जून 02, 2019
चिपळूण - पेढे, परशुराम विषयी तोडगा काढण्याचे काम सुरू असून लवकरच त्यास यश मिळेल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यानी शरद पवार यांना दिले.पेढे परशुराम येथील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची...
जून 01, 2019
कर्जत (जि. नगर) : पालकमंत्रीसाहेब, तुम्ही कर्जत-जामखेडची चिंता सोडा. ती जबाबदारी माझी आहे. तुमच्या विकासाच्या झंझावाताची पाहिजे तेवढी प्रसिद्धी झाली नाही. मात्र, इतिहास घडवू, सर्वच कामे बोलून होत नाहीत. आजोबा बाळासाहेब विखे पाटलांसारखा गप्प बसून काम दाखवू, असे सांगून डाॅ. सुजय विखे यांनी कर्जत-...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 24, 2019
पिंपरी - निकालाची अतीव उत्कंठा लागलेल्या मावळ मतदारसंघाचा बार फुसका निघाला. पहिल्या फेरीपासून आघाडीवर राहिलेल्या शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी सातव्या फेरीनंतर विजय निश्‍चित केला आणि शहरात उत्साहाला उधाण आले. त्यांच्या थेरगाव येथील निवासस्थानाकडे कार्यकर्त्यांची रीघ लागली. नेते मंडळी भेटीस येऊ...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना...
मे 23, 2019
पुणे - मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार पार्थ पवार हे पराभवाच्या छायेत असून, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय वर्चस्वाला हा मोठा धक्का मानला जात आहे. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे हे पवार यांच्यापेक्षा एक लाख 71 हजार मतांनी...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे....
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 16, 2019
मुंबई -  ‘‘सातारा, सोलापूर, बीड, नगर जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रात १९७२ पेक्षा गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. मी या जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर विस्ताराने मांडलेल्या समस्यांकडे राज्याचे प्रमुख म्हणून आपण लक्ष घालावे व संपूर्ण दुष्काळी भागासाठी सर्वंकष निर्णय घ्यावेत,’’ अशी मागणी करणारे पत्र...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 12, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ममता बॅनर्जींना रोखणार काय किंवा ममता भाजपला पाय रोवण्यापासून रोखणार काय याचीच चर्चा आहे. यात डावे आणि कॉंग्रेस वळचणीला पडल्यात जमा आहेत. हा मोठा बदल लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पश्‍चिम बंगालच्या राजकारणात स्पष्टपणे दिसतो आहे. या निवडणुकीची दिशा पाहता पश्‍...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...