एकूण 13 परिणाम
मार्च 01, 2019
काळ सरकतो, तसे जग बदलते. आसपास बदल झाले की माणूसही बदलतो. या बदलांचा आनंदाने स्वीकार केला पाहिजे. खुर्च्या ओढून आम्ही दोघी बसलो. दोन फिल्टर कॉफी-स्ट्रॉंग. आम्ही दोघी असताना पूर्वी द्यायची तशीच मी वेटरला ऑर्डर दिली. पण तिने "नको, नको, चहाच घेऊया' असे म्हणताच मला खूपच आश्‍चर्य वाटले. कॉलेजनंतर खूप...
जुलै 31, 2018
माणूस आठवणीत रमणारा प्राणी आहे म्हणतात. फुटबॉलचे सामने पाहताना मीही माझ्या शाळा-महाविद्यालयीन दिवसांच्या आठवणींत रमलो. रमणबाग शाळा आणि फुटबॉल यांचे नाते अतूट होते. रामभाऊ लेले हे क्रीडाप्रेमी शिक्षक क्रिकेट, फुटबॉल व हॉकीने शाळेचे वातावरण भारून टाकीत असत. ते स्वतः उत्तम कोच तर होतेच, पण...
जुलै 25, 2018
विशाल सकाळी आठ वाजता मुंबईला निघाला. अकरा वाजता फोन खणखणला. फोनवरील निरोप ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर काही सुचेचना. त्याक्षणी तरी फोन माझ्या हातून गळूनच पडला. थोड्या वेळाने भानावर आल्यावर मी आलेल्या नंबरवर परत फोन केला. यशवंत पाटील शांतपणे मला म्हणाले, ""हो ताई, मीच तुम्हाला फोन केला...
मे 10, 2018
"एकमेका साह्य करू, अवघे धरू सुपंथ' हे सुभाषित माहीत आहेच. वाड्यातून सोसायट्यांमध्ये आलो तरी ते सूत्र कायम आहे; पण आधाराबरोबरचा विश्‍वासही टिकवायला हवा. ऊन आता चांगलेच तापू लागले आहे. त्यामुळे पूर्वीच्या वाडे-चाळीतील अंगणातल्या "वाळवणां'ची आठवण झाली. एकत्र कुटुंब असेल तर कुटुंबातील साऱ्या जणी किंवा...
मे 09, 2018
आयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी "भास्कराचार्य प्रतिष्ठान' या गणित संशोधन...
एप्रिल 21, 2018
ई-मेल आणि एसएमएसच्या काळात पत्रभेटीकडे दुर्लक्ष होत आहे. निरोप कळला म्हणजे झाले, या पलीकडचे काही पत्र बोलत असते. हा पत्रसंवाद कोणालाही अनौपचारिकतेकडे नेतो, आनंद देतो, सहानुभव देतो. या सुंदर भूतलावरील आपले आगमन आणि निर्गमन या गोष्टी प्रत्येक सजीवाच्या आयुष्यात अटळ असतात. आपल्या आगमनाने सारे आप्त...
डिसेंबर 19, 2017
सातवीपासूनच कामे करून स्वतःचे खर्च भागवत होतो. अशीच एकाकडे छायाचित्रणाची कला शिकलो. पण कुठेच स्थिरता येत नव्हती. गुरूदेवांनी आशीर्वाद दिला आणि पुन्हा याच कलेवर लक्ष केंद्रित केले. एका कार्यक्रमाची छायाचित्रे काढून मी माझ्या स्टुडिओत परतलो. संगणकावर छायाचित्रे उतरवून घ्यायला सुरवात केली. तोच अचानक...
ऑगस्ट 10, 2017
श्रावणी सोमवार निमित्त नुकताच भिमाशंकरला जाण्याचा योग आला. श्रावणी सोमवारला विविध वाहनांमधून लाखो भावीक येथे गर्दी करताना दिसतात. साधारण 50 हजाराहून अधिक वाहने येथे येतात. लाख दोन लाख तर कधी त्याहून अधिक भाविक भेटी देताना दिसतात. 12 जोतिर्लिंगां पैकी एक असलेल्या भिमाशंकर देवस्थान हे अतीशय पौराणिक...
जुलै 08, 2017
आपल्या शिक्षकांविषयी विद्यार्थ्यांना आदर, प्रेम असतेच. विद्यार्थ्यांवर प्रेम करणाऱ्या एका क्रीडाशिक्षकाचा सत्कार करून त्यांच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली. "अरे! हा सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत नसून, शरद पवार या त्यांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते...
फेब्रुवारी 07, 2017
माझ्या नजरेतून  "मनाचे श्‍लोक' ऐकवणाऱ्या समर्थ रामदास स्वामींपाशी मन धाव घेते. दासनवमी जवळ आली की "नावरे मन आता' अशी भक्तांची मनःस्थिती होते आणि पावले अधीरपणे सज्जनगड गाठतात. दासनवमीच्या उत्सवात रंगतात.  फेब्रुवारी महिना सुरू झाला की आठवण होते ती सज्जनगडावर साजऱ्या होणाऱ्या दासनवमीच्या उत्सवाची!...
जानेवारी 19, 2017
सतत येता जाता, उठता बसता ॐ चा जप करणारे माझे वडील जळगावला रेल्वेत गुड्‌स क्‍लार्कची नोकरी करीत होते. अत्यंत साधी राहणी आणि भाजी- भाकरीचे जेवण. श्री शंकराचार्यांची स्तोत्रे गुणगुणत दर गुरुवारी सायंकाळी घरी व कार्यालयात श्रीदत्ताची आरती करीत. रोज दुपारी घरी जेवायला येताना कुणीतरी अतिथी बरोबर असे. आई...
डिसेंबर 17, 2016
काही महिन्यांपूर्वी विदर्भातल्या उमरेड- कराडला नावाच्या जंगलातला एक वाघ हरवल्याची बातमी कानावर आली. जय हे त्या वाघाचं नाव. तो चक्क जंगलामधून हरवला. अजूनही त्याचा पत्ता लागलेला नाही. समाजातली अनेक मुलं हरवतात, अचानक नाहीशी होतात. मोठी माणसंही अचानक नाहीशी होतात. काय होत असेल त्यांचं? कुठं जात असतील...
डिसेंबर 12, 2016
आस्थेवाईक नेता  अचानक वरिष्ठांचा आदेश आला, की दिल्ली हायकोर्टमधील कामासाठी मला तत्काळ विमानाने दिल्लीला जावे लागेल. मला काहीच सुचत नव्हते काय करावे ते! मी दिल्लीला गेले तर माझ्या आजारी मुलाकडे कोण पाहणार? त्याची काळजी कोण घेणार? एक ना अनेक अडचणी डोळ्यांसमोर आ वासून उभ्या राहिल्या. काही तरी मार्ग...