एकूण 74 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
दिवाळीच्या तोंडावर होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची फटाकेबाजी आज संपत आहे. त्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीतील सुरवातीचे आपटबार, बाहेरून येणाऱ्या सुभेदारांच्या स्वागतासाठी लावलेल्या लडी, भाजपने प्रसिद्धितंत्राच्या माध्यमातून केलेली स्मार्ट रोषणाई, विरोधकांच्या तंबूतील...
ऑक्टोबर 16, 2019
सौरभ हा आक्रमक फलंदाज होता, त्यामुळे ‘बीसीसीआय’च्या दहा महिन्यांच्या अध्यक्षपदाच्या काळातही तो काही चांगल्या गोष्टी घडवून आणू शकेल. विसावे शतक संपत आलेले असताना, भारतीय क्रिकेट एका मोठ्या सावटाखाली आले होते. ‘मॅच फिक्‍सिंग’च्या आरोपामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दिगंत कीर्ती मिळवणाऱ्या भारतीय...
ऑक्टोबर 15, 2019
जनतेला भेडसावणाऱ्या राज्यातील प्रश्‍नांऐवजी अन्य मुद्द्यांवरच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भर असल्याने ‘निवडणूक महाराष्ट्रात असली, तरी प्रचारात मात्र महाराष्ट्र नाही!’ असेच चित्र निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मतदानापूर्वीच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र...
ऑक्टोबर 09, 2019
भाजप-शिवसेना युती आणि दोन्ही काँग्रेसच्या आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या माघारीच्या प्रक्रियेत प्रयत्नपूर्वक बंडखोरांना शांत करण्यात यश मिळविले असले, तरी अजूनही अनेकांनी शस्त्रे म्यान केलेली नाहीत. बऱ्याच जागांवर बंडाळी कायम आहे. तिचा परिणाम मतविभाजनाच्या रूपाने प्रत्यक्ष निकालावर होईल.  महाराष्ट्र...
ऑक्टोबर 08, 2019
जपानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच विविध क्षेत्रांत प्रगती करण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर आपल्या उद्योजकांनाही जपानमध्ये किंवा जपानशी संबंध जोडून आपला उत्कर्ष साधता येईल. सध्याच्या मंदीच्या, नोकरी मिळणे दुर्लभ झालेल्या परिस्थितीत या संधीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न तरुणांनी...
सप्टेंबर 21, 2019
विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजप सुरक्षित आहे. अशा वेळी जुळवून घ्यायचे की दोन हात करायचे, एवढेच शिवसेनेच्या हाती आहे. तेव्हा जागा पदरात पाडून घेण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करतील; पण तुटेस्तोवर न ताणता नंतर सोडून देतील. शिवसेनेच्या अन्‌ ठाकरे घराण्याच्या भविष्यासाठी तेच हिताचे आहे. ‘मी...
सप्टेंबर 12, 2019
राज्याच्या राजकीय रंगमंचावर सध्या दिसते आहे, तसे अविश्‍वासाचे, अनिश्‍चिततेचे चित्र यापूर्वी कधीही उभे राहिले नव्हते. सत्ताधारी गोटातच नव्हे, तर विरोधकांच्या बाबतीतही हेच चित्र आहे, त्यामुळे खरी कसोटी मतदारांचीच लागणार आहे. अवघा महाराष्ट्र आज जना-मनात वसलेल्या गणरायांना मोठ्या धुमधडाक्‍यात निरोप देत...
ऑगस्ट 12, 2019
सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी देऊन, आपण मूलभूत पुनर्रचनेच्या आव्हानाला लगेच भिडायला तयार नाही, हेच काँग्रेसने दाखवून दिले आहे. सध्याची पडझड रोखणे, हा त्यामागचा एक प्रमुख हेतू असल्याचे दिसते. इतिहासाची पुनरावृत्ती होते, असे म्हणतात. पण, काँग्रेसला त्या अनुभवातून अशा...
ऑगस्ट 12, 2019
नुकत्याच जाहीर झालेल्या ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा डौलाने फडकता राहिला, ह्याचा आनंद होणे स्वाभाविकच आहे. पण मराठी कलावंतांचा राष्ट्रीय पातळीवरचा दबदबा, ही आता काही नवी बातमी राहिलेली नाही. किंबहुना, तो परिपाठच आहे की काय, असे सहर्ष वाटत राहावे, अशी परिस्थिती दिसते आहे....
ऑगस्ट 06, 2019
‘तोंडी तलाक’विरोधी कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर असे दिसते, की मुस्लिम महिलेला न्याय देण्यापेक्षा तिच्या पतीला शिक्षा देण्यावर भर दिला आहे. खरे म्हणजे, वेगळा कायदा न करता कौटुंबिक हिंसाचारविरोधी कायद्यात तोंडी तलाकचा समावेश करून समान नागरी कायद्याकडे पुढचे पाऊल टाकता आले असते. पण, सरकारने ती संधी...
जुलै 27, 2019
सध्या गरज आहे ती समाजातला सद्‌भाव आणि विवेक टिकून राहण्याची. त्यात विचारवंतांचा वाटा महत्त्वाचा असेलच; पण त्यांना व्यक्त होण्याचे निर्भय वातावरण समाजात असावे लागते. किंबहुना ‘वैचारिक संस्कृती’च तयार व्हावी लागते. ‘समाजातील घडामोडींची मीमांसा करून ‘निके सत्त्व’ जनसामान्यांपुढे ठेवणे आणि सत्ताधीश...
जुलै 26, 2019
शिक्षकांनी खूण केली अन्‌ मैदानावर जमलेल्या मुलांनी क्षणाचाही विलंब न लावता सूर धरला. हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन मन में है विश्‍वास, पुरा है विश्‍वास हम चलेंगे साथ साथ एक दिन होगी शांति चारों ओर एक दिन.... निळ्या गणवेशातील मुलं नि डोक्‍याला निळा रुमाल बांधलेल्या मुली मन लावून गात...
जुलै 26, 2019
विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.  कर्नाटकातील नाट्याच्या प्रयोगाचा एक अंक संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन...
जून 28, 2019
सुरवातीस मराठा संघटना, नंतर राज्य सरकार आणि आता न्यायव्यवस्था, अशा तीन टप्प्यांतून "मराठा आरक्षणा'च्या सहमतीची प्रक्रिया घडून आली. गेल्या सात दशकांत प्रथमच न्यायव्यवस्थेने मराठ्यांचे आरक्षण स्वीकारले असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या...
जून 05, 2019
साठ-सत्तर वर्षांपूर्वी पुण्यात जिल्ह्यातून व राज्याच्या दुष्काळी भागातून आलेल्या हमालांचे जीवन अतिशय हलाखीचे असे. दुकानाच्या ओट्यावर किंवा मालवाहतुकीच्या बैलगाडीत पसरलेली पथारी. काबाडकष्ट करत मावळणारा दिवस. दुकानाच्या मालकाची व त्याच्या कुटुंबाची करावी लागणारी कामे. शंभर किलोपेक्षाही जास्त वजनाची...
जून 04, 2019
वाढते तापमान व पाण्याचा तीव्र तुटवडा, अशा विदारक स्थितीमुळे विदर्भातील हजारो संत्राबागा शेवटचे आचके देत आहेत. चांगला पाऊस होईपर्यंत, म्हणजे जवळपास येता महिनाभर तरी या संत्राबागा वाचवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मे महिना संपला, जून सुरूही झाला; पण तापमान अजून कमी झालेले नाही. नाही...
मे 31, 2019
ओडिशाचे पाचव्यांदा मुख्यमंत्री झालेले नवीन पटनाईक ना कधी मोदी यांच्यासमवेत गेले, ना मोदीविरोधी गटाशी त्यांनी जवळीक केली. ‘आपले राज्य बरे’ म्हणत त्यांनी ओडिशावरच लक्ष केंद्रित केले आणि त्याचेच फळ त्यांना मिळाले. ओडिशा या देशाच्या पूर्वेकडील ऐतिहासिक व नितांतसुंदर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नवीन...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 25, 2019
सतराव्या लोकसभेसाठी मतदानाचे सात टप्पे हे जणू परीक्षेचे सात वेगवेगळे पेपर होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षे मन लावून अभ्यास केलाच; पण परीक्षेवेळीही प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेचा गृहपाठही रात्र-रात्र जागून केला. कोणत्या टप्प्यावर प्रचारात काय बोलायचे, कोणते मुद्दे...
एप्रिल 29, 2019
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी देशभरात 11 एप्रिलपासून सुरू झालेल्या घमासान संघर्षाच्या अंतिम आणि कळीच्या टप्प्यास आज, सोमवारी देशभरातील 72 मतदारसंघांत होत असलेल्या मतदानापासून सुरवात होत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्र यांच्यासाठी आजच्या या चौथ्या टप्प्यातील मतदानापासून पुढच्या तीन...