एकूण 20 परिणाम
मे 12, 2019
पुनाळ - उचित ध्येय व महत्त्वाकांक्षा असेल तर असाध्य गोष्टीही साध्य होतात. याचंच उदाहरण कळे (ता. पन्हाळा) येथील ऊसतोडणी मजुराच्या मुलीने खरं करून दाखवलं. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वबळाच्या जोरावर मिळवलेलं यश नक्कीच तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. अंकिता शंकर...
मार्च 11, 2019
बारामती - इस्माचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील दुष्काळग्रस्त व होतकरू विद्यार्थ्यांसाठी मोफत खानावळीची (मेस) सुरवात केली आहे. त्याचा फायदा मराठवाडा व दुष्काळी भागातील ४० विद्यार्थ्यांना पुढील दोन महिने होणार आहे.   रोहित पवार...
ऑक्टोबर 25, 2018
टेंभुर्णी - कर्करोगाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी माहोरा (ता. जाफराबाद) येथील सैन्यदलातील जवान गजानन काळे तब्बल १ हजार ४८० किलोमीटर अंतराची सायकल यात्रा काढणार आहेत. ओडिशातील बऱ्हाणपूर ते पुणे यादरम्यानच्या या सायकल यात्रेत ते नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत.  भारतीय सैन्यदलातील गजानन...
सप्टेंबर 12, 2018
पिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि प्रामाणिक स्वभाव सर्वांनाच आवडला. या तरुणासाठी मुलगी बघण्यात आली आणि गावानेच वऱ्हाडी बनून या दांपत्याला आशीर्वाद दिले. यासाठी दानशूरांनी मदत केली. दहीहंडी...
ऑगस्ट 26, 2018
वर्धा - प्रबळ इच्छाशक्‍ती, आत्मविश्‍वास व मेहनत करण्याची तयारी असेल तर वंचित घटकातील विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो. येथील मांग-गारोडी समाजातील नंदनी नाडे हिने हे दाखवून दिले. तिने डॉक्‍टरची पदवी प्राप्त केली आहे. मांग-गारोडी समाजात डॉक्‍टर होणारी ती भारतातील पहिलीच मुलगी आहे. नंदनीने शरद ...
जून 14, 2018
गंगापूर - प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कनकोरी (ता. गंगापूर) येथील कृष्णा रावसाहेब पवार या तरुणाने उद्योगभरारी घेतली आहे. त्यांच्या लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. वडिलांच्या दुर्धर आजारामुळे वडिलोपार्जित एक एकर जमीन विकावी लागली. त्यातच १९७५ मध्ये त्यांचे निधन झाले. आईने दु:ख गिळून...
फेब्रुवारी 10, 2018
वाई - धोम डावा कालव्यात तोल जाऊन पडल्याने पाण्यात वाहत जाणाऱ्या १८ वर्षांच्या युवतीस येथील सोनगीरवाडीतील अमोल सर्जेराव लोहार यांनी धाडसाने बाहेर काढून तिचे प्राण वाचविले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.    येथील गुलमोहर कॉलनीतील प्रतीक्षा महांगडे ही कपडे धुताना तोल जाऊन धोम डाव्या...
जानेवारी 02, 2018
देवराष्ट्रे - मनात जिद्द, परिश्रमाची तयारी असेल  तर संकटे रोखू शकत नाहीत. यश मिळतंच. कोणीही अडवू शकत नाही. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रेतील एका सामान्य गवंड्याच्या मुलाने नायझेरियात शासकीय रुग्णालयातील पद मिळवून ते सिद्ध केले आहे. तो सातासमुद्रापार गेला...
डिसेंबर 30, 2017
सावर्डे - मांडकी खुर्द ग्रामस्थांनी वणवामुक्त गावासाठी पुढाकार घेत असुर्डे, मांडकी बु, पालवण गावच्या सीमाभागात गावाभोवती दहा फूट भागाचा पट्टा जाळण्यात आला. यामुळे मांडकी खुर्द गावात अनवधानाने लागलेल्या आगीचे वणव्यात रूपांतर होणार नाही, तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या वणव्यामुळे मांडकी गावाच्या वनराई...
डिसेंबर 10, 2017
नाशिक - इंदूरहून बाराशे किलोमीटर अंतर सायकलवरून पार करत प्रदीपकुमार सेन शहरात दाखल झाला. रेल्वे अपघातात एक पाय गमावल्यानंतर त्याने स्वच्छ भारत, अपंग कल्याण, पर्यावरण संतुलन या विषयांवर जनजागृतीसाठी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला. कृत्रिम पायाच्या सहाय्याने सायकल चालविण्याच्या त्याच्या जिद्दीला...
नोव्हेंबर 20, 2017
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर गावच्या महिलांनी "मिळून साऱ्या जणी, सोडवू पाण्याची अाणीबाणी" चा नारा देत गावचा पाणी टंचाई प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील यादव अाळीतील काही महिलांनी हातात चक्क कुदळ व फावडे घेत ओढ्यावर बंधारा बांधला. अाणि अामचे प्रश्न सोडविण्यासाठी...
ऑक्टोबर 31, 2017
खामखेडा (नाशिक): कळवण तालुक्यातील अभोण्याच्या डोंगरावर पाच हजार झाडे सध्या टेकडी व पर्यावरणाची शोभा वाढवत आहेत. मात्र, हे सगळं शक्य झालंय एका अवलिया मुळे. गेली पंधरा वर्षे अव्याहतपणे झाडे लावून एकट्याने तब्बल सात एकर क्षेत्रावर पाच हजार झाड लावत ओसाड माळरानाच हिरव्यागार जंगलात रूपांतर सुरेश ...
ऑक्टोबर 13, 2017
कडेगाव - कडेगाव स्मार्ट सिटी’ या सोशल मीिडया ग्रुपच्या प्रबोधनातून शहरात लोकसहभागातून विकासकामे होत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वप्नील धर्मे व प्रसाद धर्मे यांनी स्वखर्चाने दत्तनगर चौक व श्रीराम चौक येथे वीस हजार रुपये किमतीचे शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवून आजी व आजोबांना अनोखी...
ऑगस्ट 30, 2017
सतरा वर्षांनंतर एम.ए.च्या वर्गमित्राची लातूरला भेट झाली. मीही त्याला सतरा वर्षांतील जीवनप्रवास सांगितला. हा प्रवास ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर आनंदभाव उमटले; पण मी त्याच्याबाबतीत विचारल्यानंतर त्याचा चेहरा पडला. सहजतेनेच आम्ही एम.ए.ला पाठ केलेली कवी अर्जुन डांगळे यांची कविता त्याच्या मुखातून बाहेर...
जुलै 30, 2017
करमाड - अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेला करमाड ते लाडसावंगीदरम्यानचे खड्डे एका वृद्धाने स्वखर्चातून बुजविले आहेत. रस्त्यावर करमाड गावाच्या हद्दीतच मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. शुक्रवारी (ता. २८) मुरूमखेडा (ता. औरंगाबाद) येथील तात्याबाबा यात्रोत्सवातून सायंकाळी परतणारे दहा ते पंधरा दुचाकीचालक भाविक...
जून 30, 2017
शांतिनिकेतनच्या कलाविश्‍व महाविद्यालयात मी शिक्षण घेतले. तर अभिनव कलाविद्यामंदिरमध्ये जी. डी. आर्ट पूर्ण केले. प्रसिद्ध चित्रकार डी. एस. माजगावकर हे माझे गुरू. शाळेत शिकत असताना पुस्तकापेक्षा चित्रात जास्त रमत होतो. "सकाळ'च्या वतीने घेण्यात येणाऱ्या बाल चित्रकला स्पर्धेत मी केंद्रात पहिला आलो आणि...
डिसेंबर 30, 2016
दापोलीचा सुपुत्र - किशोर वयात घेतलेला ध्यास पूर्णत्वास दापोली - हवाई दलात सामील होण्याचा ध्यास रोहन पवारने घेतला होता. किशोर वयातच रोहनने त्याचे सुभेदार असलेल्या आजोबांच्या छायाचित्रासोबत इंडियन एअरफोर्सच्या विमानाचे पोस्टर लावले होते. हा ध्यास आज त्याने पूर्ण केला. रोहन कोकणातील वायुदलातील पहिला...
डिसेंबर 30, 2016
कोल्हापूर - मुलाचं वय चौदा आणि बाबांचं बावन्न...दोघांनीही कोल्हापूर ते गणपतीपुळे असा सायकल प्रवास करायचं ठरवलं आणि एका दिवसात 155 किलोमीटरचा हा प्रवास त्यांनी पूर्ण केला. जय आणि त्याचे वडील सुनील सूर्यवंशी यांच्या जिद्दीची ही कथा. जयची बौद्धिक क्षमता थोडी कमी. अंगाने थोडासा जाड आणि अभ्यासात गती...
नोव्हेंबर 15, 2016
मराठी, बंजारा भाषेतील गीतांची रचना; चांगल्या संधीची प्रतीक्षा जळगाव - प्रतिकूल स्थितीमुळे लपून राहिलेल्या कलेची साधना केली तर ती केव्हातरी समोर येतेच. आणि त्यातून एखादा उदयोन्मुख कलावंत उदयास येतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. पाचशे वस्तीवरच्या तांड्यात जन्मलेल्या बंजारा समाजातील एका तरुणाच्या गीतांची...
नोव्हेंबर 04, 2016
पुणे - हातावरचे पोट भरण्यासाठी बिगारी काम करताना विजेच्या तारेला सुनीता पवार यांचे हात चिकटले. उपचारादरम्यान दोन्ही हात कोपरापासून काढावे लागले. हे संकट कमी की काय? नवऱ्याने त्यांना सोडले. नियतीपुढे हार न मानता आलेल्या संकटांबरोबर त्यांनी झुंज दिली. बघता-बघता हात गमावूनही घरकामाची...