एकूण 231 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
औरंगाबाद - शहरातून इतर शहरांमध्ये जाण्यासाठी नवीन विमानसेवा सुरू होत आहे. येत्या काळात आणखी विमानसेवा सुरू होणार असल्याने, भविष्यात शहरातील पर्यटन आणि उद्योग व्यवसाय भरारी घेऊ शकतो. त्यामुळे अपेक्षा पल्लवित झाल्या आहेत.  चिकलठाणा विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व सुसज्ज असताना औरंगाबादहून नवीन...
ऑक्टोबर 12, 2019
रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर, यावल या तालुक्यांत जलसंधारण, सौरऊर्जा निर्मिती केंद्र, शाळांमध्ये ई-लर्निंग, युवकांना स्वयंरोजगार, महिला बचत गटांना बाजारपेठ तसेच युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करणे या बाबींवर भर देणार, तसेच असल्याची माहिती काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं...
ऑक्टोबर 06, 2019
कोळसा भरण्याचं काम किती कष्टदायक असतं, हे जेव्हा ते प्रत्यक्ष बघितलं तेव्हा लक्षात आलं. विदर्भातल्या सर्वांत कडक उन्हाचे दिवस आणि दुपारी साडेबारा वाजलेले. जिथं सावलीत माणसं भाजून निघतात, तिथं भर उन्हात एका ठिकाणी दगडी कोळसा भरला जात होता. तीस टन कोळसा एकूण तीस मजूर भरत होते. प्रत्येकाला फक्त शंभर...
सप्टेंबर 18, 2019
पाली : दोन खुर्च्या, मध्यम आकाराचा आरसा, केसांच्या प्रकारांची माहिती देणारी छायाचित्रे असे रायगड जिल्ह्यातील केसकर्तनालयाचे पारंपरिक स्वरूप झपाट्याने बदलत आहे. वातानुकूलित यंत्रणा, आधुनिक साहित्य आणि शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेल्या कामगारांनी सुसज्ज अशी "सलून' ठिकठिकाणी दिसत आहेत. गेल्या पाच...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 01, 2019
अवघ्या पंधरा दिवसांचं हे लेकरू मुंबईच्या त्या जीवघेण्या पावसात कसं राहिलं असेल? आणि ही इतर माणसंही पावसात कशी राहत असतील? रस्त्यावर राहणारी ही सगळी माणसं काही भिकारी नव्हेत, तर दिवसभर वेगवेगळ्या मजुरीची कामं- उद्योग ती करत असतात. या माणसांना डोक्यावर किमान छत्र कोण देणार? पुण्यात गेल्या महिन्यात...
ऑगस्ट 27, 2019
पुणे : "अधिकाऱ्यांना कर गोळा करण्याचे लक्ष्य निश्‍चितच आहे. परंतु कर वसुलीच्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी अधिकाऱ्यांनी व्यावसायिक- उद्योजकांना कोणताही त्रास देऊ नये, असे निर्देश दिले आहेत. तसेच, जीएसटी कमी करण्याबाबत निर्णय घेणे हे माझ्या हातात नसून, जीएसटी समिती यावर निर्णय घेत असते,'' असे केंद्रीय...
ऑगस्ट 26, 2019
वेंगुर्ले - फिशमिल जीएसटीच्या प्रभावाखाली आणल्याचा थेट परिणाम मच्छीमारांवर होत आहे. त्यामुळे आता याविरोधात मच्छीमारही संघर्षाच्या पवित्र्यात आहे. आज येथे झालेल्या अखिल भारतीय गाबित महासंघाच्या बैठकीत या प्रश्‍नासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा देण्यात आला.  मोठ्या प्रमाणात मासळी मिळाल्यास...
ऑगस्ट 25, 2019
दहशतवाद्यांचे काही गट नव्या सरकारला सशर्त पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चेला अनुकूल होते. आक्रमक दहशतवादी गटांनी हिंसाचार सुरूच ठेवण्याचं ठरवलं होतं. या सगळ्या घटना घडत असतानाच मला दहशतवादाच्या गडद छायेतल्या अमृतसर जिल्ह्यात एसएसपी म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले... कॉफी हाऊस मर्डर केसबद्दलच्या काही...
ऑगस्ट 22, 2019
येवला : पारंपरिक पद्धतीने कुंभार समाज काम करत आहेत.मात्र आता लोक नक्षीकाम,कोरीव काम तसेच सुबक मूर्ती तसेच वेगवेगळे मातीचे भांडयांची मागणी करत आहेत.त्यामुळे काळाबरोबर बदलण्यासाठी समाजाने पुढे येऊन अद्ययावत मातीकाम करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ममदापूर येथे सुमारे ५ कोटीचे तंत्रज्ञानयुक्त पहिले...
ऑगस्ट 08, 2019
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाबाहेर प्रवाशांसाठी आता ई-टॅक्‍सी सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने "मेरू कॅब' या कंपनीशी करार केला आहे. यासाठी स्थानकाबाहेर लवकरच पीक अप पॉईंट उभारण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतर्फे महत्वाच्या रेल्वेस्थानकाबाहेर प्रवाशांसाठी ई-टॅक्‍सीची...
जुलै 31, 2019
पिंपरी - सध्याच्या काळात नवनवीन वाहने बाजारात येताना दिसत असली तरी वास्तव काही वेगळेच आहे. वाहनउद्योगात मंदी सुरू असून, त्याचा फटका स्वाभाविकच लघुउद्योजकांना बसत आहे. गेल्या पाच महिन्यांत या मंदीमुळे उद्योगनगरीतील या व्यवसायाला तब्बल दीडशे ते दोनशे कोटींचा तोटा सहन करावा लागला आहे.  शहरातील...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स'. हा निर्धार आज...
जून 30, 2019
ठाणे : फेरीवाला हटाव मोहीम राबवताना वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला समजून त्यांचे स्टॉल तोडू नयेत, त्यांच्या व्यवसायाला संरक्षण द्यावे, या आमदार संजय केळकर यांच्या मागणीला नगरविकास विभागाने सकारात्मकता दर्शवून स्थानिक स्वराज्य संस्थांना तशा सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत.  ठाण्यात काही...
जून 29, 2019
रत्नागिरी - व्यवसाय करताना सामाजिक भान आणि जाणीव ठेवत रत्नागिरीच्या हॉटेल मत्स्यमने या पावसाळ्यात सिडबॉलच्या माध्यमातून औषधी आणि उपयुक्त झाडांची बी निसर्गात टाकण्याच्या उपक्रमासाठी हजारो सिडबॉल तयार केले आहेत. सिडबॉल निसर्गात टाकण्यासाठी मत्स्यम ग्राहकांबरोबरच विविध सामाजिक संघटना,...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला आहे. ते उच्च...
जून 18, 2019
कैरो : इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मोर्सी यांचे सोमवारी (ता. 17) न्यायालयातच निधन झाले. न्यायालयामध्ये न्यायाधिशांनी त्यांना त्यांची बाजू मांडायला सांगितल्यानंतर ते बेशुद्ध पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले. देशाच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,...
जून 17, 2019
वस्तू व सेवाकराच्या (जीएसटी) वार्षिक विवरणपत्राचा अगम्य किचकटपणा लक्षात घेता आणि करसल्लागारांना या काळात जी इतर कामे आहेत ते लक्षात घेता, हे विवरणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत वाढवून द्यायला हवी, तसेच छोट्या/मध्यम व्यापाऱ्यांना यात सूट द्यायलाच हवी. त्यासाठी व्यापारी संघटनांनी,...
जून 12, 2019
एकीकडे कौशल्यविकास योजना जोरदारपणे राबविण्याचे आवाहन पंतप्रधान करीत आहेत; तर दुसरीकडे कौशल्यविकासाचे व्यावसायिक अभ्यासक्रम बंद करण्याचा घाट का घातला जात आहे? सध्याच्या अभ्यासक्रमाचे सक्षमीकरण केले तर त्यामुळे एक चांगली व्यवसाय शिक्षण पद्धत देशात व राज्यात नावारूपास येऊ शकेल.  देशात व राज्यात...
मे 26, 2019
मालवण - समुद्रातून प्रवासी वाहतूक करण्यास कालपासून शासनाने बंदी आदेश लागू केलr आहे. त्यामुळे आज येथे हजारोंच्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. किल्ला दर्शनास आलेल्या हजारो पर्यटकांना सकाळपासूनच भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. पर्यटकांनी किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेकडे...