एकूण 455 परिणाम
जून 23, 2019
बेळगाव - शहरातील मूर्तिकारांकडे यावेळी शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी वाढली आहे. शहर आणि ग्रामीण भागातील मूर्तिकारांकडे आतापर्यंत 25 हजाराहून अधिक "श्री'मूर्तींची नोंदणी झाली आहे. परंतु, अधिक प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही. त्यामुळे शाडूच्या "श्री'मूर्तींना मागणी असली, तरी मूर्ती बनविण्यावर मर्यादा...
जून 22, 2019
परभणी : ऐन आषाढी वारीच्या दिवसातच तांत्रिक कारणे समोर करून रेल्वे प्रशासनाने पंढरपूरकडे जाणारी पॅसेंजर रेल्वेगाडी बंद करण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला होता. परंतू हा प्रकार सकाळ ने उजेडात आणाताच रेल्वे प्रशासनास ही गाडी परत सुरु करावी लागली. विठ्ठलानेच परत रेल्वे प्रशासनास ही सदबुध्दी दिल्याची...
जून 16, 2019
चिपळूण - लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अनियमित पाणीपुरवठा होत असल्यामुळे उद्योजकांमध्ये संतापाची भावना आहे. औद्योगिक वसाहतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणीपुरवठ्याची जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार तिची दुरुस्ती करावी लागते. मुबलक पाणी न मिळाल्याने कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे....
जून 16, 2019
इचलकरंजी - येथील इंदिरानगरमधील अंगणवाडीतील मुलांना वाटलेल्या पोषण आहारामध्ये अळ्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. संतप्त पालकांनी अंगणवाडीत धाव घेत याबाबतचा जाब विचारला. अनेक मुलांनी खिचडी खाल्ल्यामुळे पालक धास्तावले होते. शहरात शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाने विविध ठिकाणी अंगणवाड्या...
जून 14, 2019
कोल्हापूर - एकदा सरकारी नोकरी लागली म्हणजे पुढे ३५ वर्षे काही धोका नाही, हा सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समज खोटा ठरू शकेल, अशा स्वरूपाच्या हालचाली शासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे वय ५० ते ५५ वर्षे पूर्ण झाले आहे, किंवा ज्यांची सेवा ३० वर्षे झाली आहे, त्यांच्या कामाचे...
जून 07, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेला ७० टक्के कोटा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या वर्षी हा कोटा काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. पर्यायाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या हक्कावर...
जून 05, 2019
मुंबई -  राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्यातील विविध विभागांकडून आदिवासी आरक्षणाचा फायदा घेऊन सेवेत आलेल्या मात्र मुदतीत जात प्रमाणपत्राची वैधता सादर न करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची माहिती गोळा केली असून त्यांची संख्या सुमारे 12 हजारपेक्षा अधिक असण्याची शक्‍यता राज्य सरकारच्या...
मे 23, 2019
सांगली -  सांगली मतदारसंघात भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील २१ हजार ६८४ मतांनी आघाडीवर आहेत. पाटील यांना 69,340 तर  विशाल पाटील (स्वाभीमानी शेतकरी संघटना) यांना 47,656 मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना 40625 मते मिळाली आहेत.  दरम्यान दुसऱ्या फेरीत संजयकाका...
मे 12, 2019
मुंबई - कावीळ झालेली असतानाही निवडणूक कामासाठी उपस्थित राहिलेल्या प्रीती दुर्वे (वय ३१) या सांस्कृतिक खात्यातील महिला कर्मचाऱ्याचा शनिवारी (ता. ११) मृत्यू झाला. प्रीती या मूळच्या नागपूरमधील रहिवासी होत्या. त्यांना दीड वर्षाची दोन जुळी मुले आहेत. इच्छा नसतानाही तब्बल १,८०० कर्मचाऱ्यांना निवडणूक...
मे 11, 2019
मतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...
मे 10, 2019
मुंबई - उन्हाळी सुटीची सुरुवात झाल्यानंतर राज्यभरात रक्ताचा तुटवडा सुरू झाला आहे. राज्यात रक्ताचा ५० हजार युनिटस्‌; तर मुंबईत आठ ते १० हजार युनिटस्‌ इतका तुटवडा आहे. त्यामुळे सामाजिक संस्था आणि रक्तपेढ्यांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरे घ्यावीत, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे....
मे 08, 2019
इगतपुरी शहर - खैरवाडी (ता. इगतपुरी) गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना चक्क विहिरीत उतरून पाणी भरावे लागत असल्याचे वृत्त मंगळवारी (ता. ७) ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यांनी ग्रामपंचायतीमार्फत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा खैरवाडीत पाण्याचा टॅंकर पाठविल्याने येथील...
एप्रिल 28, 2019
सावंतवाडी - जिल्ह्यात दलित बांधवावर होणारे अन्याय, अत्याचारांना वाचा फोडण्यासोबतच आजही काही ठिकाण दलित वस्तीवर न पोहचलेल्या रस्त्याचा प्रश्‍न येणाऱ्या काळात उचलून धरण्यात येणार असल्याचा इशारा भारतीय दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतम कांबळे यांनी दिला आहे. येथील पर्णकुटी विश्रामगृहावर...
एप्रिल 22, 2019
अकोला : जीएमसीच्या कनिष्ठ व वरिष्ठ डॉक्टरांचे चार महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याने सुमारे 91 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. 22) एक दिवसीय संपाचे हत्यार उपसून सर्वाेपचार रुग्णालय प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.    डिसेंबर ते एप्रिल 2019 या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने शासकीय...
एप्रिल 22, 2019
मतदान सज्जता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 6 लाख 59 हजार 757 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज असून जिल्ह्यात एकूण 916 मतदान केंद्रांवर 5030 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. तसेच 2015 बॅलेट युनिट, 1020 कौंटिग युनिट व 1049 व्ही. व्ही. पॅट मशिन्स...
एप्रिल 20, 2019
इस्लामपूर - दैनिक सकाळ इस्लामपूर शहर कार्यालय, इस्लामपूर जायंट्स परिवार तसेच स्थानिक प्रशासन यांच्यावतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मतदान जागृती अभियान 'स्वीप' अंतर्गत 'वॉक फॉर व्होट' उपक्रमाला येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जायंट्स इस्लामपूर परिवारातील सहेली, संस्कृती, मेट्रो,...
एप्रिल 16, 2019
कडगाव - चार महिन्यांपासून विश्रांती घेतलेली लालपरी ‘भटवाडी-मुंबई’ पुन्हा धावू लागल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली पाटगाव-मुंबई व नंतरच्या काळात नामांतर होऊन धावू लागलेली भटवाडी-मुंबई. ही बस प्रवाशांच्या कमतरतेमुळे व आर्थिक तोटा होत असल्याने बंद करावी लागली होती...
एप्रिल 11, 2019
मुंबई - एसटी महामंडळाचा तोटा पाच वर्षांत तिप्पट झाला आहे. एसटीचा तोटा २०१४-१५ मधील ३९१ कोटींवरून २०१८-१९ मध्ये ९६५ कोटी रुपयांवर गेला आहे. एसटीच्या प्रवाशांची संख्या काही वर्षांत १९ लाखांनी घटली, त्यामुळे तिकिटांच्या दरात १८ टक्के वाढ करूनही महामंडळ तोट्यातून बाहेर पडलेले नाही. संयुक्त तपासणी भरारी...
एप्रिल 10, 2019
खामगाव : नगर पालिकेसमोर सुरू असलेल्या ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक किशोर उर्फ काका रुपारेल यांच्या बेमुदत उपोषणाची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी सांगता करण्यात आली. नगर पालिका प्रशासनाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिल्याने काका यांनी चिमुकल्या मुलीच्या हस्ते आपले उपोषण...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर -  कोणी शक्तिप्रदर्शन करीत, कोणी साधेपणाने, कोण घोड्यावरून, कोण ट्रॅक्‍टरवरून, तर कोण शितोंडी घेऊन कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज अखेरच्या दिवशी ४८ उमेदवारांचे ६८ अर्ज दाखल केले आहेत. यात कोल्हापूरमधील २५ उमेदवारांनी...