एकूण 31 परिणाम
मार्च 23, 2019
रहिमतपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगर परिषदेचा देशात ३८, राज्यात ३४ व जिल्ह्यात पाचवा क्रमांक आला आहे.  केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या उपक्रमामध्ये रहिमतपूर नगरपरिषदेने एकूण पाच हजार गुणांपैकी तीन हजार ४४० गुण प्राप्त केले. संपूर्ण देशामध्ये पश्‍...
मार्च 07, 2019
शिरूर - पत्नी आणि मुलाबाळांचा त्याचा संसार. आचारी म्हणून काम करून कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह चाललेला. पण या सुखी संसाराला दृष्ट लागावी तसे झाले. कर्ता माणूसच हृदयविकाराने गेला आणि अवघे कुटुंब उघड्यावर आले. पण गाव एक झाला आणि त्यांनी ‘या कुटुंबाची जबाबदारी आता गावाची’, असा निर्धार करून तब्बल ११ लाख...
फेब्रुवारी 21, 2019
पाली (जिल्हा रायगड) : सुधागड तालुक्यातील पाली परिसरात असलेल्या हजरत शहा शरफुद्दीन बाबा दर्ग्यात पाच पिरांच्या हुरूसात (उत्सव) हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले. यावेळी झालेल्या कव्वाली कार्यक्रमात जमा रक्कम हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.  दर्ग्यात झालेल्या कार्यक्रमात सर्व,...
ऑक्टोबर 15, 2018
कोरेगाव - तो तसा जन्मतः पूर्ण अंध. पण, जात्याच हुशार. अंधाऱ्या आयुष्यात पांढऱ्या काठीच्या साथीने त्याने वाटचाल केली. ‘डीएड’ पर्यंत शिक्षण घेतले. तरीही नोकरी नव्हती म्हणून तो रडत बसला नाही. चार वर्षे खेड्यापाड्यात फिरून शाळांना खडू विकून त्याने आपल्या चरितार्थासाठी कुटुंबाला मदत केली. नोकरीही लागली...
ऑगस्ट 31, 2018
औरंगाबाद - शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्‍वच वेगळे असते. दोन  वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्‍यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा तब्बल चार हजार कचरावेचकांना एकत्रित आणण्याचे काम स्वतः कचरावेचक असणाऱ्या आशाताई डोके यांनी केले आहे.  आशाताई शिक्षित नसल्यामुळे त्यांनी मातीकामही...
ऑगस्ट 19, 2018
रत्नागिरी - जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा फोटो व्हिडिओ व्यावसायिकांची संघटनेने सामाजिक बांधिलकी जपली. पावस येथे 1995 मध्ये स्थापन झालेल्या अनसूया आनंदी महिला वृद्धाश्रमासाठी संघटनेने इलेक्ट्रिक कुकर भेट म्हणून दिला. यामुळे सर्व महिलांच्या चेहेर्‍यावर हास्य उमटले. तसेच दोन...
मे 19, 2018
खटाव - गणेशवाडी (ता. खटाव) या जेमतेम ४०० लोकसंख्या असलेल्या गावाने एकजुटीच्या जोरावर पाण्यासाठी देत असलेल्या लढ्याने लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या गावात ग्रामस्थांच्या श्रमदानातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे सुरू आहेत. अगदी रात्रीचा दिवस करून श्रमदान सुरू आहे. टंचाई काळात प्रशासनाकडे टॅंकरची...
मे 15, 2018
सुधागड तालुक्‍यातील खांडसई गावाला मार्चअखेरीसच तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागते; मात्र या वर्षी खांडसई आणि कासारवाडी येथील ओढ्यावर सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे सरपंच उमेश यादव व उपसरपंच नथुराम चोरघे यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांच्या सहभागातून नुकतेच बंधारे बांधण्यात आले. यामुळे येथील पाणी प्रश्न...
एप्रिल 12, 2018
फुलसावंगी (जि. यवतमाळ) - येथून जवळच असलेले चिल्ली (ईजारा ता. महागाव) हे दोन हजारांवर लोकसंख्या असलेले एक छोटसं गाव. तेथील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय शेती व मजुरी. बोटावर मोजण्याइतकेच लोकं सरकारी नोकरीत. सर्व समाजाचे व जातीधर्माचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. सर्व सण एकत्रच साजरे करतात. याच...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान...
एप्रिल 04, 2018
औरंगाबाद - येथील घाटी रुग्णालयात रोज शेकडो गरजू रुग्ण येतात. त्यांच्यासोबत असलेल्या नातलगांना बऱ्याचदा उपाशीपोटी झोपावे लागते. प्रसंगी ॲडमिट नसलेल्या रुग्णांनाही पैशाअभावी दिवसभर उपाशी राहावे लागते. त्यांच्या सोयीसाठी सकल जैन समाज, भगवान महावीर जन्मकल्याणक समिती आणि जैन ॲलर्ट ग्रुपतर्फे आता वर्षभर...
मार्च 07, 2018
सोलापूर - सुमारे दहा लाख लोकसंख्येच्या सोलापूरला चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो. शहरालगतचा हिप्परगा तलाव पाण्यापेक्षा गाळानेच भरलेला. अंदाजे 1866 ते 1871 मध्ये बांधलेल्या तलावातील गाळ काढल्यास शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा होईल, हे ध्यानात घेऊन चार वर्षांपासून भक्ती जाधव तरुणीने...
फेब्रुवारी 27, 2018
कोल्हापूर - ‘होळी लहान करू- पोळी दान करू’ ही चळवळ आता अधिक व्यापक झाली आहे. यंदाही पर्यावरणपूरक होळीवर भर दिला जाणार आहे. विविध संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्याशिवाय शाळाशाळांतील हरित सेनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही केवळ पोळीदानच नव्हे, तर शेणी संकलित करून ग्रामपंचायतीकडे...
फेब्रुवारी 10, 2018
नागपूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी वारंवार होत असताना, तिच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. राजकीय संघटना प्रत्यक्षात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किती कामे करतात, याबद्दल सांगता येणे कठीण आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील सविता राऊळकर या शिक्षिका आपल्या उपक्रमातून शाळेतील हिंदी...
जानेवारी 28, 2018
जामखेड : स्वतः कोल्हाटी समाजात जन्मल्यानंतर उपेक्षेचे चटके सोसत उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर समाजप्रती असलेले दायित्व व्यक्त करण्यासाठी आणि अन्य उपेक्षितांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यासह समाजाच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्यसाठी त्याने पुढाकार घेतला. त्याच्या मदतीला हात पुढे येत गेले,...
जानेवारी 21, 2018
औरंगाबाद -आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठविणाऱ्या निष्ठुर मुलांच्या कहाण्या ऐकून माणुसकी संपत चालल्याची चर्चा आपण करतोय. अशा काळात रस्त्यावर ओंगळवाण्या अवस्थेत बेवारस फिरणाऱ्या भारतीयांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचे काम करतोय एक जिगरबाज युवक. योगेश मालखरे असे त्याचे नाव. त्याचे हे कार्य पाहिले की "...
डिसेंबर 29, 2017
पुणे - ‘‘आम्ही पत्र्याच्या छोट्या खोलीत राहायचो. कचरा घ्यायच्या निमित्ताने सोसायटीतील फ्लॅटमध्ये जात असे. तेव्हा वाटायचं, आपलंही इतकचं छान, सुंदर अन्‌ देखण घरं असावं. कधी कधी तर स्वप्नही पडायचं. लक्ष्मीताईंच्या घरचे काम सुरू असताना माझेही घर असे बनवाल का? असे विचारले. पैसे ठरले, आणि बघता बघता हे...
डिसेंबर 28, 2017
सोमेश्वरनगर (जि. पुणे) - ‘‘जन्म झाला तेव्हा शेकायचीपण सोय नव्हती. फाटकी कपडे घालून खर्डा-भाकरी खात शिकलो. दहावीच्या परीक्षेला शिक्षकांनीच कपडे घेऊन दिली. आईसोबत भांगलायला, ऊस तोडायला जायचो. तरीही जिद्दीनं शिकत होतो; कारण आईला फाटक्‍या लुगड्यात बघू शकत नव्हतो. परिस्थितीच्या बरगड्या लवकरात लवकर...
नोव्हेंबर 07, 2017
जोगेश्वरी -  देवी विसर्जनावेळी जोगेश्‍वरीतील लोकमान्य टिळक विसर्जन तलावाजवळ विजेचा धक्का बसून विकी पवार (वय २२) या तरुणाचा मृत्यू झाला होता. घरातील कमावत्या मुलाचे निधन झाल्याने पवार कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे जोगेश्‍वरीतील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन केलेल्या वडापाव...
नोव्हेंबर 03, 2017
महाड : नेत्रदानाविषयी जनजागृती करत महाडमधील तीन युवकांनी कन्याकुमारी ते महाड असा 1 हजार 540 किमीचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. आज 2 नोब्हेंबरला दुपारी महाडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. युथ हाँस्टेल, विविध शाळेतील विध्यार्थ्यानी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन...