एकूण 824 परिणाम
जून 18, 2019
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरातील सहा विधानसभा मतदारसंघावर दावा केला असताना काँग्रेसने मात्र ‘फिप्टी-फिप्टी’चा फॉर्म्युला समोर आणला आहे. शिवाजीनगर, कसबा, पुणे कॅंटोन्मेंट आणि पर्वती विधानसभा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी प्रदेश काँग्रेसकडे केली आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीत...
जून 18, 2019
सातारा - अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील कार्यकर्ते व पाठीराख्यांत अस्वस्थता पसरत आहे. विनाकारण ओढवला जाणारा हा वाद पक्षाच्या विधानसभेतील कामगिरीला मारक ठरू नये, यासाठी सर्वच नेत्यांनी सबुरीने व एकसंधतेने वागावे, अशी पक्षाच्या मतदारांची अपेक्षा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या...
जून 17, 2019
सातारा - नीरा-देवघरच्या पाण्यावरून जिल्ह्यात सुरू झालेला वाद आता राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये शिरला आहे. हा वाद थेट पक्षाध्यक्ष शरद पवारांपर्यंत पोचला. आजपर्यंत ज्या कारणांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून उदयनराजेंना विरोध केला जात होता, तेच कारण पुढे करून उदयनराजे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर...
जून 14, 2019
गडचांदूर : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला राजुरा विधानसभा मतदार संघात मिळालेल्या मताधिक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी भाजप नव्या चेहऱ्याची चाचपणी करीत असल्याची चर्चा आहे. सन 2014 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत दोन हजार मतांने भाजपचे ऍड. संजय धोटे निवडून आले होते. या...
जून 09, 2019
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना आरोग्य मंत्रीपद मिळणार असल्याचे समजते आहे. आरोग्य खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. याशिवाय शिवसेनेला आणखी दोन राज्य मंत्रीपदं देऊन...
जून 09, 2019
कवठेमहांकाळ - तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून येत्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत अजितराव घोरपडे यांना आमदार करण्यासाठी आत्तापासूनच कामाला लागा, असे आवाहन खासदार संजय पाटील यांनी केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वच आमदार भाजपचे असतील असा विश्वासही व्यक्त केला....
जून 09, 2019
मुंबई - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार असून, लवकरच त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनाच्या आठवडाभर आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याने आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत....
जून 07, 2019
पुणे - महापालिकेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला काही दिवसांचा अवधी असतानाच उमेदवारीवरून भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीने एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरू केल्या आहेत. धानोरी- कळसमधून (प्रभाग क्र. १) भाजपने राष्ट्रवादीच्या ऐश्‍वर्या जाधव यांना उमेदवारी दिली, तर राष्ट्रवादीकडून...
जून 03, 2019
जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार...
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 30, 2019
कोरेगाव - लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या कोरेगाव मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना आघाडी मिळाल्याचे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना, भाजप, मित्रपक्षांचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी या निवडणुकीत लक्षणीय मते घेतल्याचे आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. काही मोठी...
मे 30, 2019
इंदापूर - ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात पाणी व सुशिक्षित बेरोजगारी या दोन विषयांवर आपण येत्या पाच वर्षांत लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.   येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत सुळे यांनी ही माहिती...
मे 29, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत मिळविलेल्या यशानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बालेकिल्ल्याच्या बुरजांची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीकडून हाती घेतले जाणार आहे. संघटनात्मक बांधणीसोबतच गावागावांत जाऊन लोकांमध्ये पक्षाबाबत विश्‍वास निर्माण करण्याचे काम करावे लागणार आहे. अन्यथा राष्ट्रवादीच्या...
मे 28, 2019
मुंबई - लोकसभेतल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीत कमालीचा "गृहसंघर्ष' सुरू होण्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा निर्णय घेतला असून, उद्या यासाठीची महत्त्वाची बैठक पक्षाच्या नेत्यांनी बोलावली आहे. विधानसभेत सध्या कॉंग्रेस 42...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 27, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारासाठी झटलेल्या भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेल्यांनी संपर्क मोहिमेचे नियोजन केले आहे. सर्वसामान्य शेतकरी व जनतेसाठी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी...
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 24, 2019
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात झालेल्या लढतीत उदयनराजेंनी 1 लाख 26 हजार 528 मतांनी विजय मिळविला आहे. उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 तर नरेंद्र...
मे 24, 2019
भक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...
मे 24, 2019
भाजपवर शरसंधान साधूनही ऐन निवडणुकीतील युतीद्वारे जागा जिंकणे सत्ताधाऱ्यांना जमले. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सभा जिंकणाऱ्या नेतृत्वापासून मुद्द्यांचे राजकारण करण्यापर्यंत अनेक बाबतीत अपयश आले. वंचित आघाडीने मते मिळविली, ही आणखी जमेची बाजू आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह मुंबईशी...