एकूण 652 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचं म्हणजे नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे मात्र, अनुभवाच्या कमतरतेमुळे आफ्रिकाचा संघ त्यांच्या नावारुपाला साजेशी कामगिरी आतापर्यंत करु शकलेला नाही....
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 13, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त रविवारी (ता.13) लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेसाठी शनिवारी (ता.12) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ शहरात सुरू झाला होता. दिवसभरात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.   तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबईच्या विधानसभेच्या 36 मतदार संघांमध्ये शिवसेना भाजप महायुती विरुद्ध कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस महाआघाडी यांच्यात थेट लढत होतेय. यंदाची निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. दरम्यान या 36 मतदारसंघातील काही अश्या जागा आहेत जिथे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. कोणत्या आहेत...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - शिवाजीनगर-खडकी परिसरातील अनेक नेत्यांनी गुरुवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना त्याचा फायदा होणार आहे. माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद...
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात...
ऑक्टोबर 08, 2019
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले असून आपल्या २४ स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. यात नाशिकच्या राजू देसले यांचा समावेश आहे.  भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यात १६ उमेदवार उभे केले आहेत. यात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापुर, धुळे, नगर,...
ऑक्टोबर 04, 2019
कोल्हापूर - जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात आजअखेर एकूण 222 जणांकडून 299 नामनिर्देशनपत्र दाखल केली आहेत. आजअखेर एकूण दाखल झालेली नामनिर्देशनपत्रे अशी : चंदगड - 37 उमेदवार, 46 नामनिर्देशनपत्र. राधानगरी- 22 उमेदवार, 37 नामनिर्देशनपत्र. कागल - 18 उमेदवार, 30 नामनिर्देशनपत्र. कोल्हापूर (दक्षिण) -17...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक - कारगिल व त्यानंतर झालेल्या युद्धांतील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी दिल्लीतील अभिषेक गौतम या ३० वर्षीय तरुणाने चक्क पाठीवर टॅटूद्वारे ६०१ शहिदांची नावे काढली आहेत. या माध्यमातून शहिदांना अनोखी मानवंदना देण्याचा मानस त्याचा आहे.  त्याच्या या निश्‍चयामुळे वीरांना मानवंदना देणारे चालते-...
ऑक्टोबर 03, 2019
कोल्हापूर - दुष्ठ शक्तीचा नाशकरून प्रजेला सुख शांती देण्यासाठी त्र्यंबोली देवीने कोल्हासूर राक्षसाचा वध केला याच धार्मिक कृतीच्या स्मृती जागवणारी कोहाळ पंचमी यात्रा आज त्र्यंबोली देवी टेकडीवर भरली. हजारो भाविकांच्या साक्षीने गौरी गुरव या बालिकेकडून कोहाळ रूपी कोल्हासूराच वध झाला आणि अवघ्या क्षणात...
ऑक्टोबर 03, 2019
मिरज - सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.  पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी आणि प्रचंड घोषणाबाजीमुळे शहरातील सराफ कट्टा, मंगळवार पेठ मार्केट परिसर दणाणून गेला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून...
ऑक्टोबर 02, 2019
तुम्ही गांधीला मानता का? हा टकल्या तुम्हाला आदर्श वाटतो? फाळणी करून देशाची वाट लावणारा हा पुळचट थेरडा आणि तुम्ही याला चांगला म्हणता? वगैरे वगैरे. 'गांधी'. जणू हा शब्दच हेटाळणीसाठी बनलाय. तो द्वेषासाठी हक्काचा.  आणि चेष्टेसाठी समानार्थी वाटावा, इतपत.  खरं तर भारत देशाच्या उभारणीच्या समुद्र मंथनातला...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...
सप्टेंबर 29, 2019
मुंबई - मुंबईवर ‘२६/११’ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात असून, तो यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिला. संपूर्ण भारतीय बनावटीची अद्ययावत ‘आयएनएस खांदेरी’ ही पाणबुडी...
सप्टेंबर 29, 2019
सांगली : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी बुद्धांवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी मोदी यांनी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले आहे.  नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या सांगलीतील श्री दुर्गामाता दौडीमध्ये भिडे हे सहभागी झाले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...
सप्टेंबर 28, 2019
स्वर म्हातारा इतुका न अवघे नव्वदीचे वयमान.... भारतरत्न लता मंगेशकर.... भारतीय  संगीताशी एकरूप झालेलं नाव.... आता तर, अगदी आवाजाचं परिमाण झालेलं नाव म्हटलं तरी चालेल... म्हणजे एखाद्या गोड गळ्याच्या गायिकेला अगदी लताजींसारखाच आवाज आहे असं म्हटलं की तिलाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटावं. अख्ख्या मंगेशकर...
सप्टेंबर 24, 2019
अंगणांना कुंपणे घालण्याचे उद्योग वाढीस लागलेले असतानाच्या काळात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यासारख्या एका साहित्य-संस्कृतीच्या राजदूताची नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होणे, ही अवघ्या महाराष्ट्रासाठी सांस्कृतिक सुवार्ता आहे. पर्यावरणाला साहित्याच्या केंद्री आणणारे...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा, आचारसंहितेचा भंग होत असल्यास तत्काळ कारवाई करा, नेमून दिलेले कार्य जबाबदारीने करा, निष्काळजीपणा केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे झोनल अधिकाऱ्यांना...