एकूण 819 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
विद्यार्थ्यांना रोज मिळतात पाचशे ते एक हजार रुपये पुणे - पुणे विद्यापीठासह शहरातील महाविद्यालयांत ‘कमवा शिका’ योजनेचा पॉकेटमनी म्हणून अनेक विद्यार्थी लाभ घेतात. पण, विधानसभा निवडणुकीत विद्यार्थ्यांना पैसे कमविण्याची नामी संधी मिळाली आहे. प्रचार फेरी, कोपरा सभा, घरोघरी पत्रके वाटप करण्यासाठी त्यांना...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : लोणावळा - ‘मावळातील जनतेच्या प्रत्येक अडीअडचणींत मी सदैव तुमच्याबरोबर राहीन. लोणावळा येथील सर्वसामान्यांसाठी सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालय सुरू करण्यासाठी मी वचनबद्ध आहे,’’ अशी ग्वाही मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-एसआरपी-मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार...
ऑक्टोबर 15, 2019
  गेल्या निवडणुकीत 'शेतीला पाणी, हाताला काम' हे ब्रीद घेऊन आम्ही उतरलो. सिंचनासाठी 'न भूतो न भविष्य’ अशी कामे करून हे ब्रीद सत्यात उतरविले आहे. गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांच्या बळावर मतदारांचा कौल आपल्याच बाजूने राहील. आगामी काळातही गतिमान विकासातून जन्मभूमीचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे...
ऑक्टोबर 13, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त रविवारी (ता.13) लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेसाठी शनिवारी (ता.12) रात्रीपासूनच भाविकांचा ओघ शहरात सुरू झाला होता. दिवसभरात शहरातील सर्वच रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.   तुळजाभवानी मातेच्या अश्विनी यात्रेनिमित्त...
ऑक्टोबर 12, 2019
जळगाव ः एरंडोल मतदारसंघ हा अवर्षणप्रवण दुष्काळी भागात येतो. कपाशीव्यतिरिक्त या भागात महत्त्वाचे पीक दुसरे नाही. त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी बहुतांश कपाशीच पिकवितात. या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने उत्पादन कमी होते; परंतु ‘नार-पार’चे पाणी जिल्ह्यात वळविले, तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागेल....
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात...
ऑक्टोबर 09, 2019
जेजुरी : सनई- चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. या उत्सवाची सतरा तासानंतर सांगता झाली. उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू...
ऑक्टोबर 08, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः कुंकवाची उधळण, संबळाचा कडकडाट आणि "आई राजा- उदो उदो'च्या जयघोषात तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा मंगळवारी (ता. आठ) उत्साहात झाला. तुळजाभवानी मातेचा सीमोल्लघंन सोहळा शौर्याचे प्रतीक आहे. सोहळ्यापूर्वी सोमवारी (ता. सात) रात्रीपासून तुळजाभवानीमातेचे मंदिर प्रथेनुसार...
ऑक्टोबर 08, 2019
जोतिबा डोंगर - ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात व गुलाल-खोबरे, विविधरंगी फुले यांची उधळण करत आज सकाळी जोतिबा देवाचा पहिला पालखी सोहळा झाला. ‘चांगभलं’च्या गजरात मुख्य मंदिराभोवती पालखीच्या प्रदक्षिणा झाल्या.  या सोहळ्यासाठी आज राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते. आजपासून...
ऑक्टोबर 07, 2019
तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तुळजाभवानी मातेच्या नवरात्रात झालेल्या नऊ दिवसांच्या विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सोमवारी (ता. सात) घटोत्थापन झाले. तत्पूर्वी मंदिरातील होमकुंडावर अजाबळी अर्पण करण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात सकाळी नित्य अभिषेक झाले. यावेळी मुख्य भोपे पुजारी सचिन संभाजीराव पाटील यांनी...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते...
ऑक्टोबर 04, 2019
नाशिक - कारगिल व त्यानंतर झालेल्या युद्धांतील शहीद जवानांना मानवंदना देण्यासाठी दिल्लीतील अभिषेक गौतम या ३० वर्षीय तरुणाने चक्क पाठीवर टॅटूद्वारे ६०१ शहिदांची नावे काढली आहेत. या माध्यमातून शहिदांना अनोखी मानवंदना देण्याचा मानस त्याचा आहे.  त्याच्या या निश्‍चयामुळे वीरांना मानवंदना देणारे चालते-...
ऑक्टोबर 04, 2019
पुणे - ख्रिस्तांकडून आम्ही तुकोबांकडे आलो आहोत. आपण धर्माधर्मांत भिंती नको, तर पूल बांधूया, असे सांगताना आपण जय जगत का म्हणत नाही, निसर्गाकडे का पाहात नाही; निसर्ग आपल्याला विविधतेत एकता शिकवतो, तोच आपला खरा गुरू आहे, अशी भावना उस्मानाबाद येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा : पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंडाकडे भरघोस मदतीचा ओघ सुरूच आहे. विविध क्षेत्रांतील नागरिक, संस्थांनी धनादेश व रोख स्वरूपात "सकाळ'च्या सातारा व कऱ्हाड कार्यालयांत मदत दिली.  कल्याण गुडस गार्ड, सेंट्रल रेल्वे मुंबई यांच्यातर्फे 58 हजार रुपयांची रक्‍कम पूरग्रस्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक...
सप्टेंबर 30, 2019
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेच्या नित्यपूजेसाठी अनेक प्राचीन, तसेच वेगवेगळ्या पद्धतीच्या चांदीच्या वस्तू आहेत. भाविकांना या वस्तूंची सहसा माहिती होत नसली तरी वेगळेपण दर्शविणाऱ्या या वस्तू पूजेच्या तयारीचा थाट वाढवितात.  तुळजाभवानी मातेच्या मंदिरात वेगवेगळ्या प्रकारचे दागदागिने आहेत,...
सप्टेंबर 29, 2019
पुणे - गेल्या तीन दिवसांपासून घरातील चिखल बाहेर काढण्यासाठी नागरिक कष्ट घेत आहेत, पण अद्यापही त्यांना दिलासा मिळालेला नाही. जेवढे स्वच्छ करू, तेवढा चिखल निघत आहे. गाळामुळे घरात दुर्गंधी सुटत असल्याने आता रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना वाटत आहे. त्यातच वीज आणि पाणी नसल्याने हालामध्ये आणखी भर पडली...
सप्टेंबर 29, 2019
माझी जालंधरहून अमृतसरला वरिष्ठ पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली होती. म्हणजे मी आता मंडच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे आलो होतो. ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात मी नवा पदभार स्वीकारला. नव्या जिल्ह्यातल्या सगळ्या पोलिस ठाण्यांना भेटी देताना मी हरिकेमध्ये आलो आणि मंडबरोबरच्या माझ्या जुन्या ओळखीला उजाळा मिळाला...
सप्टेंबर 26, 2019
नांदेड : शेतीच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात चार जणांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश दीपक धोळकिया यांनी गुरूवारी (ता. २६) दुपारी ठोठावली आहे.  शेवडी बाजीराव (ता. लोहा) येथील ईरप्पा मल्लिकार्जुन पोटफोडे व त्याचे सावत्र भाऊ तुकाराम...
सप्टेंबर 23, 2019
जळगाव ः विधानसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा, आचारसंहितेचा भंग होत असल्यास तत्काळ कारवाई करा, नेमून दिलेले कार्य जबाबदारीने करा, निष्काळजीपणा केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज येथे झोनल अधिकाऱ्यांना...