एकूण 33 परिणाम
जून 06, 2019
आपल्या माणसाचं तरी काय वेगळं असतं? अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीला थोडी मायाममता पुरेशी असते. टीटभर बागपण मणभर समाधान देऊ शकते. "रक्तामध्ये ओढ मातीची, मनास मातीचे ताजेपण मातीतूनी आले वरती, मातीचे मम अवघे जीवन' असं कवयित्री इंदिरा संत म्हणतात. माझं लहानपण कृष्णाकाठी ऐसपैस वाड्यात गेलं...
मे 03, 2019
बालपणी आंब्याची गडद माया अंगावर घेतलेली. इतक्‍या वर्षांनंतरही मनात तो आंबा हिरवा ठिपका होऊन राहिलेला. वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक लागले, की अभ्यासाबरोबर सर्वांत आधी आठवायचे ते आजोळ. चाळकवाडी गाव आपल्याला हाका मारतेय असे वाटायचे. दरवर्षी सुटीत आई व आम्ही भावंडे दोन महिने गावालाच मुक्काम. घरापासून...
एप्रिल 23, 2019
स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीचे कार्यक्षेत्र असते. हक्काचे व मानाचे. ती तिच्या भांड्याकुंड्यातच रमलेली असते. लग्नानंतर माझ्या सासूबाईंनी मोठ्या विश्‍वासाने माझ्या हाती सोपविलेल्या कढईने मला जीव लावला. छान छान परतून भाज्या, खमंग पिठले, तऱ्हतऱ्हेचे तळलेले पदार्थ करण्यात या बाईसाहेब एकदम पटाईत. रवा,...
मार्च 23, 2019
तो शेतकरी होता. तो लष्कराच्या डेपोत कामगार होता. तो वारकरी होता. त्याच्या प्रामाणिकपणात मला विठ्ठल पावला. तळेगाव (देहूरोड) येथे बदली झाली होती. लष्कराचा तळेगाव डेपो खूपच मोठा आहे. लष्करातील भंगार वस्तू येथे गोळा करून त्याचा जाहीर लिलाव केला जातो. एके दिवशी एक मजूर डोक्‍यावर आडवी टोपी, दाढीचे खुंट...
मार्च 08, 2019
   कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत विविध आघाड्यांवर तथा विविध क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या महिलांना समाजामध्ये 'सुपर वुमन' म्हणुन संबोधले जाते. कोकणपट्यात अशाच एका सुपरवुमनशी गाठ पडलेल्या आणि आपल्या दिव्य परंपरा जोपासत स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या या भगिनीचे गुण...
फेब्रुवारी 27, 2019
आत्मविश्‍वास देणाऱ्या मराठीचा मला अभिमान आहे. भाषेतील गंमत मला जगण्याचा आनंद देते. "माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा।' या कुसुमाग्रजांच्या शब्दांत मराठीविषयी अभिमान व्यक्त करतो आपण. कधी कधी प्रश्‍न पडतो, मला या भाषेने काय दिले? माझे मन मला कौल देते, की मराठी भाषेने मला जगायला शिकविले, आत्मविश्...
फेब्रुवारी 05, 2019
जीवनातील साथीदार जातो, तेव्हा इतरांनी सांत्वन करूनही मनाची समजूत घातली जात नाही. अहो, ऐकलंत का? तुम्ही अंतराळात गेल्यावर डॉ. शेखर, वंदना, सुलभाबेन, शीलूताई आल्या होत्या. डॉ. शेखर काय म्हणाले, माहीत आहे? "भाभी, मी डॉक्‍टर आहे. मी असंख्य रुग्ण पाहिले आहेत. कित्येक मृत्यू पाहिले आहेत. रुग्णाच्या वेदना...
जानेवारी 31, 2019
मधुमेहाच्या रुग्णांना कायम उपेक्षा व टिकाच सहन करावी लागते. गेली वीस वर्षे या मधुमेहापायी मी इतके उपदेश आणि सल्ले ऐकले आहेत की वाटते, आपण मधुमेहींची एक संघटना करून काही ठराव करावेतच. पहिला ठराव, ज्यांना मधुमेह नाही त्यांनी आम्हाला अजिबात उपदेशाचे डोस पाजू नयेत किंवा फुकटचाही सल्ला देऊ नये. उदा. एक...
जानेवारी 08, 2019
आपल्या मरणाची बातमी आपणच ऐकली तर? होते असे कधी कधी. कुणाच्या तरी ऐकण्यात चूक होते आणि आपले मरण फोनवर ऐकू येते. आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो जाला सोहळा अनुपम्य। आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने।। असे संत तुकाराम महाराजानी म्हटले आहे. मरण हे अटळ आहे. माझी पन्नाशी उलटली, पण उमर...
डिसेंबर 26, 2018
अध्यात्म आणि विज्ञान यांत अनेकजण गोंधळ करतात. आमचे भाग्य एवढेच की मी आणि माझी भावंडे वारकरी संप्रदायाचा लौकिक असणाऱ्या घरात जन्मलो. आमच्या आई-वडिलांनी व बाबाआजोबांनी (आईचे वडिल) आम्हाला संतुलीत विचार करण्याची सवय लावली. आजोबांना आम्ही "बाबा' म्हणत असे. पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज...
नोव्हेंबर 17, 2018
कोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे पालखी मार्गावरचे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावापासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर शिंदेवाडी हे भाटघर धरण क्षेत्रातील समृद्ध गाव. अशा गावात...
ऑक्टोबर 04, 2018
जगण्याचा कंटाळा असा त्यांना नसतोच, त्या सतत सेवेत रमलेल्या असतात. नव्वदीत असूनही माझ्या मैत्रिणीचे हात कधीही स्वस्थ बसत नाहीत. नलिनीआक्का फडणीस म्हणजे हसरा चेहरा नि गोड बोलणे. आक्कांनी समर्थ रामदासांच्या म्हणण्याप्रमाणे संसार करावा नेटका तर केलाच, पण बरोबर परमार्थही साधला. पूर्वी हिंदीच्या...
ऑगस्ट 29, 2018
इच्छा प्रबळ होती. महिनाभर घर-कार्यालय सांभाळून सराव केला आणि वय विसरून ढोल वाजवलाच. गणपतीची मिरवणूक बघायला जायचे तेव्हा तेव्हा ढोल-ताशांच्या तालावर पाय ठेका धरायचे, ढोल वाजवण्यासाठी हात शिवशिवायचे. ती शिस्तबद्ध लयीत वाजवणारी, जोशपूर्ण पथके पाहून आपणही ढोल वाजवावा असे वाटायचे. घरच्यांची परवानगी...
जुलै 17, 2018
भारतीय संस्कृतीत सत्संगाला महत्त्व देण्यात आले आहे. मलाही दोन संतांचा सहवास लाभला. आपण थोर संतांची चरित्र वाचतो व त्यांच्या शिकवणी आचरणात आणायचा प्रयत्न करतो. सध्या समाजात भोंदू बाबांचा सुळसुळाट झाल्याने खरा संत कोण हे ठरवणंही अवघड होत चाललं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला दोन...
जून 21, 2018
आयुष्यात असे काही प्रसंग येतात, की त्यावेळेला नियम पाळावेत की माणुसकी, असा पेच समोर असतो. अशावेळी विवेकबुद्धीला जागून कायदा न मोडताही नियमांना मुरड घालता येते आणि माणुसकीही सांभाळता येते. "अहिंसा एक्‍स्प्रेस'च्या एसी कोचवर कंडक्‍टर होतो. साधारणपणे कल्याण जाईपर्यंत सर्व तपासणी पूर्ण करून मी नुकताच...
एप्रिल 05, 2018
शस्त्र नव्हे, मनातला विश्‍वास महत्त्वाचा. गुंड मनाने दुबळे असतात म्हणून शस्त्र बाळगतात. नम्रपणा व आत्मविश्‍वास हीच सज्जनांची ताकद असते. पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट. सकाळी दहा वाजले असावेत. नगरचे पोलिस निरीक्षक अभय परमार यांचा ‘सरहद’च्या क्रमांकावर दूरध्वनी आला. मी फोन घेतल्यावर ते म्हणाले, ‘‘कुठे...
मार्च 12, 2018
आजचा दिवस हा माझ्यासाठी नेहमीप्रमाणे धावपळीचा होता. ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये चार शस्त्रक्रिया आज यादीत होत्या. नेहमीप्रमाणे सर्व रुग्णांची शस्त्रक्रियेआधीची तपासणी केली. यादीत पहिली असलेल्या महिलेला तपासले व शस्त्रक्रियेसाठी ‘ऑपरेशन थिएटर’मध्ये घेण्यास सांगितले. त्या महिलेची दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढून...
फेब्रुवारी 09, 2018
गाव सुटले; पण गावाच्या आठवणी सुटत नाहीत. त्या बिलगून असतात मनाच्या अस्तराला. थोडा निवांतपणा असला की अस्तर हलते आणि आठवणी चमकू लागतात. माझे बालपण वाई तालुक्‍यातील ओझर्डे गावात गेले. गाव तसे छोटेसे. त्या काळी पाच हजार लोकवस्तीचे असेल. तेथील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती. त्यामुळे सर्वांचा दिवस...
फेब्रुवारी 07, 2018
अफवा पसरवून एखाद्याला नामोहरम करणे सहज शक्‍य असते. लढण्याच्या अन्य मार्गांपेक्षा अफवेच्या वाटने जाणे तुलनेने सोपेही असते. पण तेच अस्त्र आपल्यावरही उलटू शकते, या बूमरॅंग सत्याचा विसर पडू देऊ नये. दाबून ठेवलेली वाफ जशी विध्वंसक असते ना, तशीच अफवाही विध्वंसक असते. अफवेची वाफ काय करील, हे सांगता येत...
नोव्हेंबर 22, 2017
बाळासाहेब ठाकरे यांचा नुकताच पाचवा स्मृतिदिन झाला. त्या निमित्ताने माझ्या त्यांच्याबद्दलच्या दोन आठवणी मला शेअर कराव्याशा वाटल्या. या आठवणी माझ्या शालेय काळातल्या म्हणजे १९७१-७२ मधल्या आहेत. आम्ही तेव्हा मालाडला गोविंदनगरच्या चाळीत राहत होतो. त्या चाळीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहाने साजरे...