एकूण 16 परिणाम
जुलै 21, 2019
'धागेदोरे़' चित्रपटातला एक भाग सगळ्यात आव्हानात्मक होता-कारण त्यातली नायिका सहाव्या मजल्यावरून पडते आणि तिचा मृत्यू होतो. ते सगळं चित्रीत करणं हे माझ्यासाठी खरंच आव्हान होतं, कारण माझ्याकडं तेवढं बजेट नव्हतं. बजेट असतं त्यांच्याकडं फाइट मास्टर, सीजी अशा बऱ्याच गोष्टी असतात. आमच्याकडं तसं नव्हतं....
जुलै 10, 2019
ज्ञानदेवांनी ज्ञानेश्‍वरीत म्हणजेच भावार्थदिपेकेच्या 18 व्या अध्यायात हे विचार फार ठामपणे मांडले आहेत. चंद्र तेथे चंद्रिका। शंभु तेथे अंबिका संत तेथे विवेका। असणे की (ज्ञानेश्‍वरी अध्याय 18 ओवी 1632 ) अशी ती सुंदर ओवी आहे. चंद्र आणि चांदणे, शंभु आणि अंबिका हे एकमेकांपासून विलग असु शकत नाहीत. तसेच...
जून 09, 2019
त्या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले... असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का? त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का? गोवा...डोळ्यांचं पारणं फेडणारं मोहक ठिकाण. या...
मार्च 09, 2019
मुलगी नाही मुलगाच आहे माझा...  आपल्या मुलीविषयी असं अभिमानाने सांगण्याची पद्धत आहे आजकाल. त्यातला अभिमान ही गोष्ट योग्यच, पण मुलगाच आहे असं का सांगायचं? तिच्या मुलगी असण्यात काय प्राॅब्लेम आहे?    पण आपल्यात भिनलेली पुरुषप्रधान संस्कृती असं डोकं वर काढते अनेकदा. परिस्थिती बदलतेय असं मान्य करुनही....
फेब्रुवारी 17, 2019
मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "...
फेब्रुवारी 10, 2019
"कुणी मला पागल म्हणतं, कुणी सायको; तर कुणी वेडी प्रेमिका. मी अनेक वेळा अधिकाऱ्यांनाही भेटले. त्यांना माझी कैफियत सांगितली; पण संतोषला भेटू देण्यासंदर्भात त्यांनी कायदेशीर अडचणी दाखवल्या. आज ना उद्या तो बाहेर येईल, मला भेटेल, या आशेनं मी त्याची वाट पाहत आहे...'' नवी मुंबईतल्या खारघरच्या सेक्‍टर - 36...
नोव्हेंबर 18, 2018
आपल्या दोन विद्यार्थ्यांच्या तोंडून एका शिक्षकानं एक व्यथा ऐकली...झेंडूच्या फुलांची आणि त्यांच्या विक्रीविषयीची व्यथा...या व्यथेनं त्या शिक्षकाला अस्वस्थ केलं. याच सकारात्मक अस्वस्थतेचा उपयोग त्या शिक्षकानं कसा केला आणि संबंधित घटकांना त्यांचा "रास्त लाभ' कसा मिळवून दिला, त्याविषयी... समाजात दोनच...
जुलै 29, 2018
श्रीमती बर्नेट म्हणाल्या : ‘‘अरे! तुम्ही त्यांना लहान मुलांच्या भेटवस्तू कुठं मिळतात म्हणून विचारलंत? सकाळी मला विचारायचं ना...’’ मी गप्प राहिलो. यावर श्रीमती बर्नेट म्हणाल्या ः ‘‘त्या आहेत किम कॅम्पबेल. कॅनडाच्या सध्याच्या पंतप्रधान. अनेक दशकांतल्या सर्वात लोकप्रिय पंतप्रधानांपैकी एक आहेत त्या...
जुलै 15, 2018
जेव्हा आपण "हा' क्षण विसरून "त्या' क्षणाच्या मागं धावतो तेव्हा काही बाबी अनपेक्षितरीत्या घडत असतात. हे असं राजकारणात, उद्योगधंद्यात, कलाक्षेत्रात जसं घडतं, तसंच ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही घडतं. माझं घर समुद्रकिनारी आहे. मी या क्षणी खिडकीतून समुद्राचं निरीक्षण करत आहे. पावसाळी वातावरण असल्यानं...
मे 20, 2018
आरोग्यक्षेत्रात व शिक्षणक्षेत्रात आपल्या देशापुढं महासंकट उभं आहे व जर भारतातली बालकं व युवक हे उच्च दर्जाच्या शिक्षणव्यवस्थेपासून व आरोग्यव्यवस्थेपासून वंचित राहिले तर उद्याच्या भारताचा पाया कमकुवत होईल व भविष्याकाळात महासंकटाची तीव्रता वाढेल. मात्र, या महासंकटाला आपण कसे सामोरे जात आहोत? "भारतीय...
एप्रिल 08, 2018
प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वार्थ, स्वतःच्या गटाबद्दल प्रेम, इतर गटांबद्दल तिरस्कार, जिंकण्याची ईर्ष्या या भावना असतात, तसंच प्रत्येक व्यक्तीमध्ये ममता, सहकार्य, सामंजस्य या भावनाही असतात. या दोन्ही प्रकारच्या भावना अगदी लहानपणापासून आपल्या मनात घर करतात. मात्र, जेव्हा जिवाला धोका निर्माण होतो, तेव्हा...
फेब्रुवारी 11, 2018
भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल. मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या...
एप्रिल 09, 2017
भारत देश महान व्हावा, असं जर आपल्याला  वाटत असेल, तर ‘नेता-नागरिक समान’ होणं अत्यावश्‍यक असून, आपल्या जीवनात राजकारणाच्या अतिरेकाचं जे आक्रमण झालेलं आहे, ते थांबवण्याची गरज आहे. आपल्या देशात राजकीय नेत्यांशिवाय उद्योजक, तंत्रज्ञ, कलाकार, इतिहासकार, अभ्यासक व आपण सर्व नागरिक हेही समाजाचे महत्त्वाचे...
मार्च 12, 2017
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारनं महिलाविरुद्ध कायदे करण्याचा सपाटा लावला, तर जागतिक महिला-राजकारणात भारत काय भूमिका घेणार? संयुक्त राष्ट्र मानवी हक्क परिषदेत भारत अमेरिकेवर प्रखर टीका करणार काय? पुन्हा निदर्शनं करण्याची वेळ अमेरिकेतल्या महिलांवर आली, तर आपल्या देशातल्या महिला त्यांच्याविषयी ‘सोशल...
फेब्रुवारी 26, 2017
जर आपल्याला आलिया भोगासी सादर व्हायचं असेल तर शिक्षणपद्धती, औद्योगिक व कृषी उत्पादन, संगणकक्षेत्र, पाणी व हवामान या क्षेत्रांना प्राधान्य देऊन त्यातलं मूलभूत संशोधन हे सध्या आहे त्यापेक्षा सुमारे हजार ते लाखपट वाढवावं लागेल. अन्यथा आपण केवळ बेरोजगारांच्या फौजा निर्माण करू व त्यांना केवळ सिनेमातली...
नोव्हेंबर 20, 2016
व्यक्तिगत व व्यावसायिक आयुष्यात ‘दुर्लक्ष-धोरण’ मी नेहमी वापरतो; अर्थात, कोणत्याही धोरणाचा विपर्यास केला, तर ते परिणामकारक होत नाही, याची जाणीव ठेवूनच! आणि दुर्लक्ष करणं म्हणजे सदोदित अन्याय सहन करणं असंही नव्हे. प्रत्येक प्रसंगात तारतम्य बाळगून वागलं पाहिजे. जेव्हा योग्य असेल तेव्हा न्याय व हक्क...