एकूण 164 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
पिंपरी : पंकजा मुंडे यांच्या चिंचवडमधील सभेतील गोंधळाचे आता भाजप कनेक्शन समोर आले आहे. भाजपचे स्वीकृत सदस्य संदीप गाडे यांची बहीण सुनीता फुले घोषणाबाजी करत होत्या. यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  वाकड पोलिसांनी 3 महिला आणि 3 पुरुष अशा सहा जणांना ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती...
सप्टेंबर 14, 2019
‘मोरया मोरया’चा अखंड जयघोष पिंपरी - भंडारा - फुलांची मुक्तहस्ते उधळण... ढोल-ताशांच्या गजर... ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घालत चिंचवडमधील ३६ सार्वजनिक मंडळांसह अनेक घरगुती गणेशमूर्तींचे गुरुवारी (ता. १३) मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. लाडक्‍या गणरायाला निरोप...
सप्टेंबर 09, 2019
पिंपरी - सकाळ माध्यम समूह आयोजित ‘माय फ्रेंड श्रीगणेशा’ या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत (ड्रॉ) ‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयात काढण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. चिंचवडगावातील सुप्रिया सुधाकर खासनीस यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच आळंदी रोड, दिघी येथील शांताबाई...
ऑगस्ट 04, 2019
पिंपरी (पुणे) : गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीला पूर आला आहे. नदीकाठी असलेल्या नागरिकांना पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. शहर आणि...
ऑगस्ट 04, 2019
गोपाल आणि नीता खाडे या शिक्षकजोडप्याचे उपक्रम मी जाणून घेतले. प्रत्येक शिक्षकानं या जोडप्यासारखं वेगळेपण टिकवून ठेवलं तर आणि ते मुलांमध्ये उतरवलं तर गरिबीतून वर येणारा इथला प्रत्येक विद्यार्थी आत्मविश्वासानं उभा राहील आणि जिल्हा परिषदेच्या शाळांना लागलेला गाफीलपणाचा डागही पुसला जाईल. पावसाअभावी...
जुलै 30, 2019
लोणी काळभोर : जिल्हा पोलिस दलातील दोन हजारांहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना जून महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पोलिस मुख्यालयातील एका पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस अधीक्षक संदीप पाटील व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र लिहून...
जुलै 16, 2019
पुणे : पुण्यासह पिंपरी चिंचवड, चाकण भागातील उद्योजक त्रस्त झाले आहेत.  सध्या येणाऱ्या अडचणी तातडीने न सोडविल्यास पुण्यातील कंपन्या चीनमध्ये शांघाय येथे स्थलांतरीत करण्याचा इशारा जर्मन कंपन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जर्मन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
एप्रिल 21, 2019
पिंपरी (पुणे) : डोक्यात दगड घालून त्यानंतर मृतदेह जाळून टाकत एका तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना पिंपरीतील एच.ए. मैदान येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. एचए मैदानामध्ये एक मृतदेह जाळून टाकण्यात आल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना एक मृतदेह जळत असल्याचे...
मार्च 16, 2019
पिंपरी, (पुणे) थोबाडीत मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून संगणक अभियंता तरुणावर धारदार शस्त्राने वार करत जिवे मारण्याची घटना डिलक्स चौक, पिंपरी येथे गुरुवारी रात्री घडली. मंजीत प्रसाद (रा. काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोहन संभाजी देवकते (वय २५, रा. चंदननगर, पुणे) यांनी याबाबत...
मार्च 13, 2019
पिंपरी - पत्नीच्या तिच्या मित्रांबरोबरील सततच्या चॅटिंगमुळे पतीने अखेर न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला, तर दुसरीकडे पत्नीनेही पती छळ करीत असल्याचे निवेदन महिला तक्रार निवारण कक्षाकडे दिले. मात्र, पोलिसांनी त्या दोघांचेही समुपदेशन करत विस्कटू पाहणारा त्यांचा संसार सावरला. आता त्यांनी नव्याने संसार...
मार्च 12, 2019
पिंपरी (पुणे) : एका मुलाने अनेकांची फसवणूक करून तो पळून गेला. मात्र देणेकऱ्यांनी त्याच्या आईला आणि अपंग मावशीला पैशासाठी त्रास दिला. या त्रासाला कंटाळून दोन सख्ख्या बहिणींनी विष प्राशन केले. त्यापैकी एकीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर आपल्यावर कारवाई होऊ नये म्हणून देणेकऱ्यांनी चक्क...
मार्च 11, 2019
पिंपरी (पुणे) - घराजवळ खेळत असताना साप चावल्याने एका चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरीगाव येथे रविवारी रात्री घडली. कृष्णा अपूर्व नाईक-राठोड (वय ४, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा रविवारी सायंकाळी आपल्या...
फेब्रुवारी 23, 2019
पिंपरी - महापालिकेच्या स्थायी समितीपदी भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र लांडगे, शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि आरती चोंधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर व मयूर कलाटे, शिवसेनेचे राहुल कलाटे आणि अपक्ष झामाबाई बारणे यांची शुक्रवारी सर्वसाधारण सभेत निवड झाली. स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, त्यापैकी...
फेब्रुवारी 21, 2019
पिंपरी, (पुणे) : "पुलवामामध्ये अतिरेक्‍यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. त्यामुळे आम्ही भारतीय खचून गेलेलो नाही. आमच्या विवाहप्रसंगी जमलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींसमोर जाहीर करतो की आमचं पहिलं अपत्य आम्ही सैन्यात पाठविणार आहोत'', अशी ग्वाही विवाहासाठी उपस्थित असलेल्यासमोर नवदांपत्याने...
फेब्रुवारी 20, 2019
पिंपरी (पुणे) : बांधकाम सुरू असलेल्या महादेव मंदिराचा दगडी सभामंडप कोसळून झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाले. तर चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी पिंपळे गुरव परिसरामध्ये घडली चिदंम्मा मनसोप्पा पुजारी (वय ३०, गोपी चाळ, खडकी) आणि मनतोष संजीत दास (वय २९, रा. पश्चिम बंगाल) अशी मयत...
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सात सहायक निरीक्षक आणि एका उपनिरीक्षकाची प्रशासकीय कारणास्तव पुणे पोलिस आयुक्तालयात बदली करण्यात आली. १४ फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले.  सहायक निरीक्षक नकुल सिध्दप्पा न्यामणे, अलका दामोदर सरग, गणेश जयसिंग धामणे, नीलेश दत्ता...
फेब्रुवारी 13, 2019
पिंपरी (पुणे) - पिंपरी चिंचवड महापालिकेतील अभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यासह दोघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी पिंपरी येथे घडली. राहुल कलाटे (वय ३५, रा. वाकड) आणि विनोद मोरे (वय २८, रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल...
फेब्रुवारी 08, 2019
पिंपरी (पुणे) - तब्बल दहा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेला सराईत गुन्हेगार मनोज वीटकर याला 'एमपीडीए'खाली एक वर्षाकरता पिंपरी पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. मनोज म्हसुकांत विटकर (वय २७,  रा. नेहरूनगर पिंपरी) असे स्थानबद्ध केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. सहायक निरीक्षक अन्सार शेख यांनी...
जानेवारी 21, 2019
पिंपरी, (पुणे) : पतीने पत्नीला अश्लील एसएमएस पाठविला. यामुळे संतापलेल्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ही घटना पिंपरी येथे घडली. याबाबत ३५ वर्षीय विवाहितेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा...