एकूण 562 परिणाम
जून 16, 2019
पुणे : भरदिवसा एका नागरिकांवर वार करुन तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचा ऐवज लूटणाऱ्या पाच जणांना येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. याबरोबरच त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारी येरवडा क्षेत्रीय कार्यालयाजवळ ही घटना घडली होती.  आकाश संजय सकपाळ(वय 20,रा.येरवडा), ...
जून 15, 2019
पुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील (आयआयटी) प्रवेशासाठी घेतलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कार्तिकेय गुप्ता याने देशात प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ३७२ पैकी ३४६ गुण मिळविले आहेत.  जेईई ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देशातील...
जून 14, 2019
पुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल कारची निर्मिती केली आहे. शेतकरी शिक्षण मंडळाच्या नऱ्हे येथील भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्‍ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ही कमाल केली आहे...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 12, 2019
लोणी काळभोर (पुणे) : सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाच्या चार अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हाअंतर्गत करण्यात आल्या असून, वालचंदनगर पोलिस ठाण्यात अधिकारी म्हणून दिलीप पवार यांची तर भिगवण पोलिस ठाण्याचे अधिकारी म्हणून जीवन माने यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पोलिस अधीक्षक संदीप पाटील...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या एक्स्पोचे मुख्य...
जून 09, 2019
पुणे : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाला आळा घातला नाही तर प्रत्येकासाठी ही धोक्‍याची सूचना आहे. प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन पुणे येथील आयआयटीमएम सफरचे संचालक व शास्त्रज्ञ डॉ. गुफ्रान बेग यांनी केले.  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा स्थापना दिन व जागतिक पर्यावरण...
जून 08, 2019
पुणे - दहावी, बारावी झाली. आता शिक्षणाची पुढची दिशा कोणती?... असा प्रश्‍न पडला असेल, तर त्याचं उत्तर ‘सकाळ’ने दिलं आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी म्हणून ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ आजपासून सुरू झाला आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे पुढील दोन दिवस (ता. ८ व ९) विद्यार्थी आणि...
जून 07, 2019
दौंड : राज्य राखीव पोलिस दलाकडून व्यावसायिक मानकांनुसार शिस्त, उत्तम संचलन, कवायत आणि कोणतीही परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य अपेक्षित आहे. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर नेहमी उत्तम व अचूक प्रशिक्षण घेत स्वतःचे सामर्थ्य वाढवावे, असे आवाहन राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी केले. नानवीज (...
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक...
जून 07, 2019
पुणे - ऑनलाइन व्यवस्थेमुळे नाटकांच्या तिकीट बुकिंगची सोय झाली असली, तरी त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. मात्र, आता पुण्यातील रसिकांना नाटकांची तिकिटे घरपोच मिळणार आहेत. त्यासाठी ही नवी व्यवस्था निर्माण झाली  आहे. नाटकाला जायचे असेल, तर नाट्यगृहांमध्ये जाऊन किंवा ऑनलाइन तिकीट बुकिंग करावे लागते....
जून 06, 2019
पुणे - ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’चे आयोजन केले आहे. यामध्ये नामांकित शिक्षण संस्था सहभागी होणार आहेत. तसेच, विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर सेमिनारही आयोजित केले आहे. या एक्‍स्पोचे मुख्य प्रायोजक युनिक ॲकॅडमी, उप-प्रायोजक मराठवाडा मित्रमंडळ आणि झील...
जून 06, 2019
पुणे - लोकन्यायालयात खटला दाखल नसताना कर्जदाराला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे बनावट शिक्के मारून नोटीस पाठविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी कोटक महिंद्रा बॅंक आणि कर्ज वसूल करणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक राजेश...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
जून 05, 2019
पुणे - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने घेतलेल्या ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेद्वारे तुम्हाला राज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा नामांकित महाविद्यालयात प्रवेश हवा असेल, तर तुमचे पर्सेंटाइल हे किमान ९९च्या पुढे असणे अपेक्षित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी...
जून 03, 2019
पुणे : येरवडा येथील गांधीनगर येथे संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था यांच्या वतीने सार्वजनिक इफ्तार पार्टिचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. प्रसंगी येरवडा भागातील साममाजिक कार्यकर्ते डेनियल लांडगे, अजहर शेख, शादाब तंबोळी, अरमान...
जून 03, 2019
पुणे - वाहतूक पोलिसांच्या कारवाईची तीव्रता वाढत असतानाच, आता ‘नो पार्किंग’मध्ये लावलेली दुचाकी-चारचाकी वाहने उचलल्यानंतर (टोईंग) त्यावर पुन्हा १८ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जाणार आहे. येत्या दहा जूनपासून प्रथमच अंमलबजावणी होणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या या निर्णयामुळे पुणेकरांचे कंबरडे...
मे 31, 2019
पुणे - ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’तील (एनडीए) खेतरपाल संचलन मैदानावर लष्कराच्या बॅंडच्या तालावर गुरुवारी सकाळी बरोबर पावणेसात वाजता कडक पांढऱ्या शुभ्र गणवेशात दमदार पावलांचा आवाज घुमू लागला. ही होती देशातील प्रत्येक नागरिकाच्या रोमारोमांत राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या ‘एनडीए’च्या १३६व्या तुकडीच्या...
मे 30, 2019
पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता.२) ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ आयोजित केले आहे. हा एक्‍स्पो विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी शैक्षणिक पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात नामांकित शैक्षणिक संस्थांकडून सर्व शैक्षणिक पर्याय  व अभ्यासक्रमांची...
मे 30, 2019
पुणे : वडगाव बुद्रुक भागातील सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे चार महिन्यांपूर्वी थाटात उद्‌घाटन झाले. परंतु, येथे टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील ठराविक विभाग स्थलांतरित करण्यात आले असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  पालकमंत्री, स्थानिक आमदार, नगरसेवक व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सिंहगड...