एकूण 1522 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर : फेसबुक फ्रेंड्‌ने चॅटिंग करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीवर बलात्कार केला. सध्या ती चार महिन्यांची गर्भवती आहे. युवकाने लग्नास नकार दिल्यामुळे युवतीने हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. संतोष गणेश नागरीकर (रा. घाटंजी, यवतमाळ) असे आरोपीचे नाव...
ऑक्टोबर 15, 2019
खोची - पेठवडगाव येथील आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू अभिज्ञा अशोक पाटील हिची (दोहा) कतारमध्ये होणाऱ्या चौदाव्या एशियन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा 1 ते 13 नोव्हेंबरदरम्यान होणार आहेत.  नुकत्याच दिल्ली येथे डॉ. करण सिंग शूटिंग रेंजमध्ये ट्रायल सहा आणि सात नेमबाजी स्पर्धा झाल्या...
ऑक्टोबर 15, 2019
रत्नागिरी - राजापूर पोलिस ठाण्यात चालक पदावर कार्यरत असलेल्या तरूण पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी कुवारबाव येथे ही घटना घडली. या प्रकारामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसले तरी एका नाजूक विषयातील प्रचंड ताणामुळे त्याने टोकाचा निर्णय घेतल्याचा...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि...
ऑक्टोबर 13, 2019
पुणे-  हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या कुटुंबातील सदस्यांना शोधण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागांतर्गत ‘मनुष्य शोध पथक’ स्थापन केले आहे. या पथकाने एका महिन्यात बेपत्ता झालेल्या ५६६ जणांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप पोचविले. शहरातून आठ ते दहा वर्षांमध्ये बेपत्ता...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर : हैदराबाद येथील बिस्कीट कंपनीतून कामगारानेच सात लाखांची रोख चोरली. रेल्वेतून पळून जात असताना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून सुमारे सहा लाखांची रोख आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेमुळे "कानून के हात बहोत लंबे होते है', ही...
ऑक्टोबर 12, 2019
सांगली - टूरिस्ट लॉजमध्ये वृषाली अर्जुन सूर्यवंशी (वय २०, पंचशीलनगर) या तरुणीचा खून करून पसार झालेला संशयित अविनाश लक्ष्मण हात्तेकर (वय २५, रा. जुना बुधगाव रस्ता, पंचशीलनगर) याला एलसीबीच्या पथकाने कोल्हापूर रेल्वे स्थानकावर अटक केली. हात्तेकर याने खुनाची कबुली दिली आहे. प्राथमिक तपासात वृषालीचा...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : वडगाव शेरी - ‘लोहगाव आणि इतर ठिकाणी घरांचे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना धमकावून हप्ते वसूल करण्याचा प्रकार विरोधकांकडून जोरात सुरू आहे. गरिबांना लुटणाऱ्यांची गय करणार नाही,’’ असे मत आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.  वडगाव शेरी मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप...
ऑक्टोबर 10, 2019
पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात घाटाच्या अलिकडे नगरच्या बाजुने पाठीमागून कार धडकल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. यातील एका जखमीचा रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार...
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : देवी विसर्जन करून घरी परतत असताना वाहन उलटून झालेल्या अपघातात चालकासह तीन देवीभक्‍तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा युवक गंभीर जखमी असून जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री विहीरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुडकेश्‍वरमधील खरबी...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद  (जि.औरंगाबाद) ः पगाराचा फरक व वार्षिक वेतनवाढ सातव्या वेतन आयोगाप्रमाणे लागू करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाकडून चार हजार रुपयांची लाच घेताना येथील नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपतच्या पथकाने पकडले. वरिष्ठ लिपिक सर्जेराव रामराव गव्हाणे, लिपिक अशोक बाबूराव वाणी अशी...
ऑक्टोबर 09, 2019
नागपूर : देवी विसर्जन करून घरी परतत असताना पिकअप बोलेरो वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे वाहन उलटून झालेल्या अपघातात चालकासह तीन देवीभक्‍तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहा युवक गंभीर जखमी असून जीवनमृत्यूशी संघर्ष करीत आहेत. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री विहीरगावजवळील सूर्योदय कॉलेजसमोर झाला....
ऑक्टोबर 07, 2019
Vidhan Sabha 2019 पुणे :  आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शस्त्र वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली त्यानुसार, रविवारी पानशेत येथे एक बंदूक व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या घटनेत रामा बबन मरगळे, (वय 24 वर्षे, रा....
ऑक्टोबर 07, 2019
पुणे - मतांसाठी मतदारांना कोणी पैशांचे आमिष दाखवीत असाल तर सावधान. कारण प्रत्येक उमेदवाराकडून होणाऱ्या खर्चावर निवडणूक यंत्रणेची करडी नजर आहे. निवडणूक विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांनी संबंधित यंत्रणेला तशा सूचना दिल्या आहेत.  जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्चाबाबत आयोजित विभाग...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : जिल्ह्यातील मागील निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी पाहता, शहरी भागातील मतदार संघात मतदान कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवून गतवेळी कमी मतदान झालेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना...
ऑक्टोबर 06, 2019
नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30,...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे -  राज्यातील अपघातांची वाढती संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस दलाकडून आधुनिक ‘इंटरसेप्टर व्हेइकल’ खरेदी केली आहेत. लेझर तंत्रज्ञानावरील स्पीडगन, ई-चलन यंत्रणा, मद्यापींवरील कारवाईसाठी ब्रेथ ॲनलायजर यांसारख्या अनेक सुविधा या वाहनात असणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० ऑक्‍टोबरपर्यंत ९६ ‘...
ऑक्टोबर 05, 2019
नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील आरोपींवर गेल्या 14 वर्षांमध्ये एक इंच देखील खटला पुढे सरकला नाही. यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली. अनेकदा आदेश देऊनदेखील या प्रकरणातील खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये काही न काही कारणास्तव...
ऑक्टोबर 04, 2019
सिंधुुदुर्गनगरी - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी 30 उमेदवारांनी 51 अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले. सर्वाधिक उमेदवार सावंतवाडी मतदारसंघात आहेत. कणकवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांनी एबी फॉर्मसह अधिकृत उमेदवार दिल्याने तेथील लढत लक्षवेधी ठरली...