एकूण 710 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा सर्वच उमेदवार प्रयत्न करीत असून, आज रविवारी सर्वच मतदारसंघात रॅली, पदयात्रा, भेटीगाठीवर भर देत उमेदवारांनी प्रचाराचा धुराळा उडविला. नोकरदारांची सुटी असल्याने उमेदवारांनी प्रत्येकापर्यंत पोहोचून निवडून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे...
ऑक्टोबर 13, 2019
दुकानदाराला यायला वेळ होतोय, हे लक्षात आल्यावर त्या आजी स्वत:ची ताकद लावून ते कपड्यानं भरलेलं मोठं पार्सल खाली टाकत होत्या. घामाघूम झालेल्या आजींनी पदराला आपला घाम पुसला. परत पदर कमरेला खोवत त्या दोन्ही हातांनी गाडा ढकलत होत्या. पलीकडे असलेल्या त्या आजींचंही सामान उतरून झालं होतं. मी दुकानदाराला...
ऑक्टोबर 10, 2019
वाई ः शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या दुर्गा दौड कार्यक्रमाची येथे विजयादशमीला मोठ्या उत्साहात व हजारो धारकऱ्यांच्या उपस्थितीत सांगता झाली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता.  प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सव काळात...
ऑक्टोबर 09, 2019
जेजुरी : सनई- चौघड्याचा मंगलमय सूर, फटाक्‍यांची आतषबाजी, शोभेच्या दारूचा लख्ख उजेड व भंडाऱ्याची उधळण, अशा जल्लोषपूर्ण वातावरणात जेजुरीत मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजता खंडोबाच्या दोन्ही पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला. या उत्सवाची सतरा तासानंतर सांगता झाली. उत्सव मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सुरू...
ऑक्टोबर 08, 2019
उस्मानाबाद ः उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात 11 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या मुदतीत सोमवारी (ता. सात) एकूण अकरा जणांनी उमेदवारी मागे घेतली. दरम्यान, युती व आघाडीत सरळ दुरंगी लढत होत असली तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारीमुळे प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना...
ऑक्टोबर 06, 2019
तिसरीमध्ये असताना डॉक्‍टरांनी ऊर्मिला यांना सांगितलं होतं, ‘या मुलीला पुढं शिकवू नका, शाळेत पाठवू नका, तिच्या डोक्‍यावर ताण देऊ नका’; पण डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्याला धुडकावून ऊर्मिला यांनी मानसीला इंजिनिअर तर बनवलंच; पण आयुष्यातल्या आत्मविश्वासाच्या सगळ्या परीक्षा तिच्याकडून पास करून घेतल्या....
ऑक्टोबर 05, 2019
धुळे ः विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटच्या दिवशी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत दिग्गजांसह इतर इच्छुकांनी दावेदारी दाखल केली. मुदतीअखेर जिल्ह्यातील पाच जागांसाठी तब्बल 70 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, उद्या (ता. 5) सकाळी अकरापासून उमेदवारी अर्जांची...
ऑक्टोबर 04, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने दिल्ली, मुंबईसह अनेक व्हीव्हीआयपी शहरात दाखल होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच पाचही मतदारसंघातील भाजप उमेदवार नामांकन अर्ज दाखल करणार आहे. संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली...
ऑक्टोबर 02, 2019
वणी : 'सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते', मंत्रघोष व 'अंबे माता की जय','सप्तश्रृंगी माते की जय' चा जयघोषातात मोठ्या आनंदमय व भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाच्या चौथ्या माळेस वणी गडावर भाविकांची गर्दी उसळली आहे.  गुलाबी रंगाचा शालू व आभूषणांनी...
ऑक्टोबर 02, 2019
दहिवडी : "आमचं ठरलंय'मधून उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रभाकर देशमुख यांच्या निवासस्थानी ठिय्या दिला. काहीही झाले तरी तुम्हाला निवडणूक लढवावीच लागेल, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. सर्वांच्या मतांचा सन्मान करून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही श्री. देशमुख...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
सप्टेंबर 30, 2019
पुणे - शेतकरी दुष्काळातून सावरण्याचा प्रयत्न करीत असताना खरीप हंगामात पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन कोलमडले. उशिरा पाऊस झाला असला तरी हाती काहीतरी येईल म्हणून शेतकऱ्यांनी पिकांच्या पेरण्या व भातलागवडी केल्या. त्यानंतर पिकेही चांगली आली होती. या पिकांतून चांगले...
सप्टेंबर 30, 2019
नाशिक : त्र्यंबकेश्वर मार्गे इगतपुरी डेपोकडे रवाना होणारी बस क्रमांक ( एमएच ४० एन. ८८२६ ) मुंबई-नाशिक महामार्गाने जात असताना सकाळी दहा वाजता घोटी येथील हॉटेल किनारासमोर अज्ञात पाच इसमांनी बसचालक दिलीप शिवराम पवार ( वय ३८ ) यास मुंबईकडे जात असणारी इनोव्हा क्रमांक ( एमएच सीएम. ९३९९ ) मधील इसमांनी...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने हिरानंदानी-फोर्टिस हॉस्पिटलतर्फे वाशी येथे रविवारी (ता.२९) आयोजित केलेल्या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी अडीच किलोमीटर अंतर चालून तरुणांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी ‘दिल से चलो, दिल के लिए’ हा संदेश दिला.        ...
सप्टेंबर 29, 2019
मी पारूआजीला म्हणालो : ‘‘तुमचा नवरा तुम्हाला मदत करत नाही का? काही काम करत नाही का?’’ त्यावर पारूआजी म्हणाली : ‘‘तो काम करत नाही, कुटुंबाला पोसत नाही, याचं मला काहीही वाटत नाही; पण तो बाकी बायकांच्या नवऱ्यांसारखं मला दारू पिऊन मारत नाही, घरी असलेला मालटाल बाहेर विकत नाही, चोरी करून हातामध्ये बेड्या...
सप्टेंबर 28, 2019
पुणे : एनडीआरएफच्या पथकास आज सकाळी जांभुळवाडी येथे एक मृतदेह आढळला. गणेश शिंदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोलेवाडी येथे नाल्यामध्ये बुडालेल्या व्हॅगनर कारमधील तिघांपैकी हा मृतदेह असण्याची शक्यता जवानांनी व्यक्त केली आहे. पुण्यात झालेल्या मुसळाधार पावसामुळे ओढ्यांना पुर आल्याने रस्ते जलमय झाले होते...
सप्टेंबर 26, 2019
बारामती (पुणे): नाझरे जलाशयातून कऱ्हा नदीत 85 हजार क्‍युसेक पाणी सोडल्याने आज (गुरुवार) बारामती शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. खंडोबानगर, पतंगशानगर, अप्पासाहेब पवार मार्ग, दातेंचे गणेश मंदिर यांसह नदीच्या कडेला असलेल्या सखल भागात पाणी वेगाने घुसले. शहरातील कसबा, खंडोबानगर तसेच रिंग रोडवरील...
सप्टेंबर 24, 2019
जळगाव ः शासनाच्या महसूल प्रशासनाकडून तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला आहे. परीक्षेच्या निवड यादीमध्ये गुणवत्तेनुसार नावे न आल्याने 50 ते 60 उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. निकालाच्या यादीत घोळ झाल्याचे सांगून नवीन यादी लावण्यात यावी, अशी मागणी केली.  तलाठी...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती होणार का? तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना युवकांना मात्र शिक्षणाच्या संधी आणि रोजगाराची चिंता आहे, त्यावरच राजकीय पक्षांनी भर दिला पाहिजे, असे या युवकांना वाटते. या निवडणुकीत हेच मुद्दे लक्षात घेऊन...