एकूण 22 परिणाम
जुलै 06, 2019
दुधेबावी - ‘ज्ञानोबा- माउली, माउली- तुकाराम’च्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज सायंकाळी बरड (ता. फलटण) येथे भाविकांनी वरुण राजाच्या साक्षीने उत्साहात स्वागत केले. पालखी सोहळा आज बरड येथे मुक्कामी असून, उद्या (शनिवारी) सकाळी साडेसहा वाजता नातेपुतेकडे मार्गस्थ होणार आहे. ...
जुलै 03, 2019
ते पळताहेत स्वच्छ, निर्मल व हरीत वारीसाठी बुद्धी दे आम्हास आता, लागू तव नाम पथा.. वेळ गेलीया निघून, काय पाहिशी दूरून... तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देई बारे.... असे फटकारे देत स्वच्छतेचा महिमा सांगून लोकसहभाग वाढविण्यासाठी संतश्रेष्ठ तुकडोजी महाराज यांनी समाजाला शाहणे करण्याचा प्रयत्न केला. तो...
जुलै 03, 2019
सोमेश्वरनगर - टाळ-मृदंगांच्या आणि विठ्ठलनामाच्या टिपेला पोचलेल्या गजरात नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांचा मानाचा नीरास्नान सोहळा मंगळवारी पार पडला. यानंतर पुणे जिल्ह्याचा निरोप घेत पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करता झाला. तत्पूर्वी, पिंपरे खुर्द ग्रामस्थांची...
जुलै 02, 2019
वाल्हे - संत सोपानदेव महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांमध्ये स्वागत स्वीकारीत मांडकी (ता. पुरंदर) येथे दुसऱ्या दिवसाच्या मुक्कामासाठी विसावला. टाळमृदंगात जयघोष आणि हजारो भाविकांची दर्शनासाठी उडालेली झुंबड यामुळे अवघी मांडकी दुमदुमली होती. आज सकाळी पांगारे येथून निघालेला पालखी सोहळा...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जून 26, 2019
पिंपरी - सनई- चौघड्याचे मंगल सूर कानी पडले. त्यानंतर भगव्या पताका नाचवत वैष्णव आले. टाळ-मृदंगाचा गजर करीत दिंडी मागून दिंडी येऊ लागली. २५ दिंड्यांनंतर जगद्‌गुरू तुकोबारायांच्या पादुका असलेला पालखी रथ आला. ‘पुंडलिका वरदेऽ हरी विठ्ठलऽ, श्री ज्ञानदेवऽ तुकारामऽ, पंढरीनाथ महाराज की जयऽऽ’चा गजर झाला....
जून 22, 2019
आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी येथे येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राने संयुक्तपणे नियोजन केले आहे. यंदा आषाढी वारीत चोवीस तास बाह्यरुग्ण आणि आंतररुग्णांसाठी आरोग्य सेवा देण्यात येणार आहे. शहरातील ग्रामीण...
जुलै 19, 2018
नीरा नरसिंहपूर - जगतगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरेच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. पुणे जिल्ह्यातील सराटीचा शेवटचा मुक्काम संपल्यानंतर पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजला लाखो वैष्णवांच्या साक्षीने मार्गस्थ झाली. पुणे जिल्ह्याच्या वतीने प्रशासनाने पालखी सोहळ्यास निरोप दिला....
जुलै 14, 2018
बारामती शहर - संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आज बारामतीनगरीत भक्तिमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी आज अवघी बारामती लोटली होती.  बारामती शहराच्या वेशीवर बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, हायटेक टेक्‍स्टाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,...
जुलै 14, 2018
गुळुंचे - माउलीऽ माउलीऽऽ नामाच्या जयघोषात आज संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले. त्यानंतर माउलींच्या पालखीने पुणे जिल्ह्याचा निरोप घेत सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचा आज लोणंद येथे मुक्काम असणार आहे.  वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुक्काम आटोपून सकाळी पालखी सोहळा...
जुलै 07, 2018
आळेफाटा ता. ७ : आळे (ता. जुन्नर) येथील श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्रणीत रेडा समाधी देवस्थानच्या आळे ते पंढरपूर पायीवारी पालखी सोहळ्याचे, नुकतेच शुक्रवारी (ता.६) सायंकाळी भक्तिभावपूर्ण वातावरणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.  आळे येथील श्री ज्ञानेश्वर महाराज वेदप्राणित रेडा समाधी देवस्थानच्या वतीने...
जुलै 07, 2018
पुणे, : 'साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल'... 'सकाळ' आणि 'फिनोलेक्‍स केबल्स'तर्फे हाती घेण्यात आलेल्या 'साथ चल' उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. 'माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला' हे 'सकाळ'चे आवाहन...
जुलै 07, 2018
देहू - टाळ-मृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकरा वाजता देहूतील इनामदारवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी केली. या वेळी हरिनामाचा गजर केला.  सोहळ्याचा...
जुलै 07, 2018
पुणे  - ‘साथ चल, साथ चल, साथ चल..., माता-पिता के लियें तू साथ चल’... ‘सकाळ’ आणि ‘फिनोलेक्‍स केबल्स’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘साथ चल’ उपक्रमाच्या या शीर्षकगीताला स्वरसाज आणि आवाज दिला तो प्रसिद्ध संगीतकार- गायक हर्षित अभिराज यांनी. ‘माता-पित्यांसाठी दोन पावलं वारीत चाला’ हे ‘सकाळ’चे आवाहन...
जुलै 06, 2018
कोल्हापूर - ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाऽऽऽ, हरी ओम विठ्ठलाऽऽऽ’, ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’च्या अखंड गजरात आता जिल्ह्यातून पंढरपूर पायी वारीला प्रारंभ होणार आहे. गावागावांतून वारकरी दिंड्या-पताकांसह कानडाऊ विठ्ठलाच्या दर्शनासाठी बाहेर पडणार असून, उद्या (ता. ६)...
जून 30, 2017
नीरा नरसिंहपूर - संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना तब्बल तीन वर्षांनंतर गुरुवारी नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. मागील तीन वर्षे दुष्काळामुळे नदीत पाणी नसल्याने टॅंकरच्या पाण्याने पादुकांना स्नान घालण्यात येत होते. नीरा स्नानानंतर पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पुणे...
जून 22, 2017
उरुळी कांचन - संत तुकाराम महाराजांच्या पालखीने लोणी काळभोर येथील ग्रामस्थांचा निरोप घेऊन सकाळी सातच्या सुमारास पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. थेऊर फाटा, कुंजीरवाडी व सोरतापवाडी येथील भाविकांची सेवा स्वीकारत पालखी उरुळी कांचन हद्दीत आली. त्या वेळी भैरवनाथ सेवा समितीचे अध्यक्ष राजाराम कांचन,...
जून 20, 2017
पुणे - पालखी सोहळा पुढे गेल्यानंतर रस्त्यावर प्लॅस्टिक पिशव्या आणि थर्माकोलचा कचरा राहतो. याचा ग्रामस्थांना त्रास होऊ नये आणि वारी प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलमुक्त व्हावी म्हणून पुण्यातील काही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जमा केलेल्या या कचऱ्यापासून इंधन निर्मिती केली जाणार असून ही पर्यावरणपूरक...
जून 19, 2017
पिंपरी - मुखाने विठू नामाचा अखंड गजर आणि भगव्या पताका खांद्यावर घेऊन वैष्णवांचा मेळा संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासमवेत भक्तिमय वातावरणात रविवारी पहाटे पुण्याकडे मार्गस्थ झाला. श्री संत गवरशेठ लिंगायत वाणी पालखी आणि श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या पालख्यांनाही पिंपरी-चिंचवडकरांनी निरोप दिला....
जून 15, 2017
देहू - येथील श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा शुक्रवारी (ता. १६) दुपारी आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे, दिंडीतील विणेकरी आणि संस्थानने दिलेल्या पासधारकांनाच भजनी मंडपात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, पालखी सोहळा प्रमुख...