एकूण 151 परिणाम
जून 11, 2019
आळंदी - आळंदीतील दर्शनबारीचे आरक्षण कायम ठेवून त्याच जागेवर ती उभारावी, या नागरिकांच्या मागणीवर आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यापुढे सुनावणी झाली. याबाबत निर्णयाचा आदेश उद्या (ता. ११) काढण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या दर्शनबारीबाबतच्या निकालाची उत्कंठा कायम आहे. ...
जून 07, 2019
अकोला - क्रिकेट सट्ट्याची देशभरातील ‘लिंक’ अकोल्यातून असल्याचा छडा लावण्यात अकोला पोलिसांना यश आले. सट्ट्याचे मुख्य लाइनवर रेट देणाऱ्याचे काम अकोल्यातून होत असल्याची माहिती या कारवाईतून उघड झाली. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी (ता. ६) दुपारी हा छापा टाकला. यामध्ये एक लाख ३५...
मे 22, 2019
पुणे : जयदत्त क्षीरसागर हे घरगुती वादातून राष्ट्रवादी काँग्रेस सोडत असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर हे पक्ष सोडून शिवसेनेत जाणार असल्याबाबत अजित पवार म्हणाले, की जयदत्त यांची नाराजी मागील एक वर्षापासून होती. जयदत्त यांचा घरातील वाद...
मे 12, 2019
मुंबई : एसटी महामंडळातील "एंटरप्राईझ रिसोर्स प्लॅनिंग' (ईआरपी) प्रकल्प राबविण्यासाठी रोल्टा इंडिया कंपनीला 2017 मध्ये कंत्राट देण्यात आले. हा प्रकल्प राबविण्यासाठी एक वर्षापूर्वी कार्यादेश देण्यात आला; परंतु अद्याप काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची या कंपनीवर एवढी कृपादृष्टी का...
मे 09, 2019
औरंगाबाद - दरवर्षी शिक्षण विभागाद्वारे मे महिन्याच्या अखेरीस अनधिकृत शाळांची यादी जाहीर केले जाते. त्यानंतर या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले जाते; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अशा शाळांवर ना कारवाई होते, ना शाळेकडून दंड वसूल केला जातो. त्यामुळे अशा शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या...
मे 07, 2019
मुंबई - वाढते वायुप्रदूषण आणि बांधकामांमुळे पसरणारे धूलिकण यामुळे जगभरात दम्याचे रुग्ण वाढत आहेत. जगात दम्यामुळे होणारे निम्मे मृत्यू भारतात होतात. दम्यामुळे भारतात गेल्या तीन वर्षांत दरवर्षी सरासरी दोन लाख 54 हजार जणांचा मृत्यू झाला. चुकीचे उपचार हे त्यामागील एक मुख्य कारण आहे. स्टिरॉईडचे प्रमाण...
मे 06, 2019
मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी...
मे 05, 2019
भूम (जि. उस्मानाबाद) : चारा-पाणी टंचाई, वाढत्या तापमानामुळे येथील दुग्धोत्पादन घटल्याने खवा उत्पादन निम्म्यावर आले आहे. एकेकाळी दरररोज 15 टन खवा उत्पादन करणाऱ्या या तालुक्‍यात सध्या 10 टन उत्पादन होत आहे. सध्या यात्रा, उत्सवाचे दिवस असून, मागणीप्रमाणे खवा पुरवठा करणे अवघड झाले आहे. भूम तालुक्‍यात...
एप्रिल 25, 2019
औरंगाबाद : कथा चोरून त्यावर चित्रपटाची निर्मिती केल्याच्या आरोपात न्यायालयामार्फत 'प्रोसेस इश्यू' झालेले चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरोधात दाखल गुन्हा न्यायालयाने रद्द केला.  शहरातील कथा लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दिकी यांनी १९८३ मध्ये 'श्रीमती' या नावाने एक चित्रपट कथा...
एप्रिल 24, 2019
मिरा रोड - आज सीबीआय, रिझर्व्ह बॅंक, सर्वोच्च न्यायालय आदी घटनात्मक संस्थांवर हल्ला झाला आणि आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर पर्यायाने लोकशाही व्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न होत आहे; मात्र संविधानाचा अवमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी...
एप्रिल 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील सभांना आजपासून (मंगळवार) सुरवात होत असताना, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता भाजपला नवा धक्का देणार असे ट्विट केले आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील पहिली सभा, अजूनही हरिसल च्या धक्क्यातून न सवरलेल्या भाजप ला नवा...
एप्रिल 17, 2019
प्रश्न: वंचित बहुजन आघाडीच का?  अॅड. प्रकाश आंबेडकर: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी आपल्या सत्ताकाळात बहुजनांना वंचित ठेवले. सध्याचे नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वातील भाजप सरकारही हेच करीत आहे. त्यामुळे आजही वंचित राहिलेला बहुजन समाज आज जागरूक झाला आहे. त्यांच्या आकांक्षा आहेत. त्यामुळे...
एप्रिल 17, 2019
प्रश्न - वंचित बहुजन आघाडीच का?   आंबेडकर - देशातील ४० टक्के मतदार आणि आजवर मोठ्या प्रमाणात वंचित राहिलेला बहुजन समाज जागृत झाला आहे. त्यांच्या आशा-आकांक्षा आहेत. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची ही लढाई आहे. हा वंचितांचा समूह प्रत्येक सभेनंतर आमच्याशी जे बोलत होता, वचनबद्धता सांगत...
एप्रिल 16, 2019
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीविरोधात प्रचारसभांचा धडाका सुरु केला असून, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाजपची अवस्था म्हणजे 'साहब मनसे के थप्पड से नाही लेकिन राजसाहब के व्हिडिओसे डर लागता है, असे ट्विट केले आहे. भाजप ची अवस्था म्हणजे" सहाब मनसे के थप्पड से नाहि...
एप्रिल 14, 2019
नागपूर : काटोल विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आयोगाने केलेली प्रक्रिया बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक आयोगाची अधिसूचना रद्द ठरविली आहे. या प्रकरणात न्यायालयाने आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढून काटोलची पोटनिवडणूक घ्यायची असेल, तर संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी...
एप्रिल 11, 2019
मुंबई - एसटी महामंडळाचा तोटा पाच वर्षांत तिप्पट झाला आहे. एसटीचा तोटा २०१४-१५ मधील ३९१ कोटींवरून २०१८-१९ मध्ये ९६५ कोटी रुपयांवर गेला आहे. एसटीच्या प्रवाशांची संख्या काही वर्षांत १९ लाखांनी घटली, त्यामुळे तिकिटांच्या दरात १८ टक्के वाढ करूनही महामंडळ तोट्यातून बाहेर पडलेले नाही. संयुक्त तपासणी भरारी...
एप्रिल 05, 2019
औरंगाबाद - आरटीईअंतर्गत अर्ज नोंदणी प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण झाली आहे. आता पालकांचे लक्ष लकी ड्रॉकडे लागले आहे. आजवर जिल्हास्तरावर होणारा लकी ड्रॉ यंदा राज्यस्तरावर होणार आहे. त्यानंतर प्रवेश निश्‍चितीचा मेसेज पालकांना मोबाईलवर जाईल, अशी माहिती शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.  बालकांच्या...
एप्रिल 04, 2019
जाहीर सभा, पक्षाचे व्यासपीठ, सभांमध्ये राहुल गांधी यांची आदर्शवादी वाक्‍ये टाळ्या घेऊन गेली; पण राजकीय व्यवहार्यता आणि अपरिहार्यतेने त्यांच्या वाक्‍यांना मुरड घालत ऐनवेळी पक्षात येणाऱ्यांना, सातत्याने घराणेशाहीने उमेदवारी करणाऱ्यांच्या घरातच पुन्हा उमेदवारी देणे गांधींना भाग पडल्याचे चित्र आहे. ‘...
एप्रिल 02, 2019
सोलापूर - कोणताही गाजावाजा न करता, पक्षाच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. त्यांनी एकूण तीन अर्ज दाखल केले आहेत.  दरम्यान, रणजितसिंहांसह आठ उमेदवारांनी 11 अर्ज दाखल केले...
मार्च 28, 2019
नवी मुंबई  - शिवसेना आणि भाजपच्या राजकीय खेळींमुळे घायाळ झालेल्या महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसने अखेर मागील अनेक वर्षांतील वैर संपवून कॉंग्रेसला जवळ केले आहे. वाशीतील एका खासगी हॉटेलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली बैठक...