एकूण 70 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
पुणे - इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ चॅंपियन स्पर्धेसाठी ज्यूदो खेळप्रकारात कोथरूड येथील पुणे अंधशाळा मुलींची मध्ये शिक्षण घेणाऱ्या सोनाली अर्जुन वाजगे व रेणुका नारायण साळवे यांची निवड झाली. जन्मत:च आलेले अंधत्व, घरातील हलाखीची आर्थिक परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर...
सप्टेंबर 07, 2019
मसूर ः दारूमुळे उद्‌ध्वस्त होत असलेले संसार सावरण्याचा वसा शहापूर (ता. कऱ्हाड) येथील संदीप बाबर यांनी घेतला असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे दोघांनी दारू सोडली असून, या दोघांचा सपत्नीक नुकताच संदीप बाबर यांच्यासह शहापूर गावाने सत्कार केला.  शहापूरच्या संदीप...
सप्टेंबर 02, 2019
कोल्हापूर - गावाला जायचे तर पक्का रस्ता नाही, या रस्त्यावर एस. टी.ची चाकेही कधी फिरलेली नाहीत. शिक्षण घ्यायचे तर पायपीट नित्याची, त्याची पर्वा न करता बाबूराव बमू घुरके याने शिक्षणाची पायरी सोडली नाही. कमवा व शिका योजनेत सहभागी होऊन भूगोल विषयात पदवी मिळवली. पुढे तो नेट परीक्षाही उत्तीर्ण झाला....
ऑगस्ट 02, 2019
जळगाव - रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते; परंतु नियमित रक्‍तदान करणाऱ्यांची संख्या तशी कमीच आहे. त्यातही महिला रक्तदात्या अगदी नगण्यच आहेत. मात्र, याला अपवाद ठरलीय एक जागरूक महिला. गरीब, गरजू रुग्णाला उपयुक्त ठरेल म्हणून दर तीन महिन्यांनी रक्तदान करणाऱ्या सुश्‍मिता भालेराव या रक्तदानाला...
जुलै 08, 2019
पुणे -  दुष्काळाच्या कायम छायेत असलेल्या बीड जिल्ह्यातील शिवणी गावातील रखरखत्या झळा कमी करण्याचा प्रयत्न पुण्याच्या दोन पहिलवानांनी केला आहे. शैक्षणिक साहित्यापासून वंचित असलेल्या या गावातील पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च पंकज हारपुडे आणि अक्षय शिंदे या दोन मल्लांनी...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
मार्च 29, 2019
नाशिक - गच्चीवरची बाग विषयात काम करणारे संदीप चव्हाण यांनी किचन वेस्ट, पालापाचोळा वापरून भाजीपाला पिकवण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी नुकतेच ३० नर्सरी बॅग्ज वापरून ५० किलो हळदीचे उत्पादन घेतले. हे त्यांच्या उत्पादनाचे तिसरे वर्ष आहे. जावयाची शेती क्षेत्रातील आवड लक्षात घेऊन श्री....
मार्च 24, 2019
चिपळूण - येथील गद्रे हायस्कूलच्या विद्यार्थिनी अनुष्का संदीप भागवत व वैष्णवी अनंत मोरे यांनी पाणी बचतीवर केलेल्या प्रयोगाची निवड लक्‍झेंबर्ग विद्यापीठाने (जर्मनी) आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. मंगळवारी (ता. १९) आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर करण्यासाठी...
मार्च 20, 2019
केळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग सामाजिक उपक्रमांसाठी करून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे.   सध्याच्या काळात लग्न म्हटले की वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा ओघाने येतो. त्यात उद्योगपती,...
मार्च 13, 2019
पिंपरी - पत्नीच्या तिच्या मित्रांबरोबरील सततच्या चॅटिंगमुळे पतीने अखेर न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला, तर दुसरीकडे पत्नीनेही पती छळ करीत असल्याचे निवेदन महिला तक्रार निवारण कक्षाकडे दिले. मात्र, पोलिसांनी त्या दोघांचेही समुपदेशन करत विस्कटू पाहणारा त्यांचा संसार सावरला. आता त्यांनी नव्याने संसार...
जानेवारी 31, 2019
ऐतवडे खुर्द - एकाच जागेवर कुणाशी काही न बोलता थांबला होता. लोक प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत होते. तो कोणाला प्रतिसादही देत नव्हता. अखेर तो बोलता झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार संपर्क साधून संबंधितांना बोलावण्यात आले. त्याच्या नातेवाईकांना सांगून त्याचे सातारा येथील केंद्रात पुनर्वसन करण्यात आले...
जानेवारी 24, 2019
पिंपळवंडी - येथील ७५ वर्षांच्या हिराबाई दत्तात्रेय शिंदे यांनी शनिवारी (ता. १९) एका दिवसात हरिश्‍चंद्र गड सर केला. दिवसभरात त्यांनी आपला नातू निखिल प्रमोद बारभाई याच्यासह कोकणकडा, मंदिर व राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच तारामती शिखर सर केले. आपला नातू अनेक वेळा गड-किल्ले फिरायला जातो. आपणही हरिश्‍...
डिसेंबर 04, 2018
नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 26, 2018
बनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या वैजापूरच्या शीतल...
नोव्हेंबर 23, 2018
सांगवडेवाडी - गावात तलाव असणे म्हणजे गावची शान समजली जाते. अशाच वसगडे (ता. करवीर) येथील गाव तलावाचे रूप पालटले ते विवेकानंद कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहकार्यातून. येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटिंग सुरू असून रोज सुमारे पाचशे पर्यटक भेट देतात. या तलावाजवळ छायाचित्र काढतात. सूर्य...
ऑगस्ट 20, 2018
शिक्रापूर - पिंपळे-खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यामुळे ग्रामस्थांनी मार्गदर्शक शिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना मोटार भेट दिली. बाईंनीही तीन विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे भेट दिली.  पिंपळे-खालसा शाळेतील १९७१...
ऑगस्ट 03, 2018
निरगुडसर - उपचाराअभावी सहा महिन्यांपासून अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय ६५) या महिलेला उपचारांसाठी ग्रामस्थांची लोकवर्गणीतून मदत केली. त्यामुळे ही महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. निरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्‍चर होऊन त्या अंथरुणात पडून...
जुलै 31, 2018
पारगाव -  कळंब (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत पुणे- नाशिक महामार्गावर शुक्रवार (ता. 27) भरदुपारी एसटीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील वैभव वासुदेव रामकर (रा. कळंब) हा अवसरी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ हॉटेल चालवणारा तरुण व आकाश अशोक जाधव (रा. गेवराई, जि. बीड) अभियांत्रिकी...
जुलै 31, 2018
मंचर - एकलहरे (ता. आंबेगाव) येथे एक ते सहा वयोगटातील मुलांना सेंद्रिय शेतीद्वारे स्वच्छ व ताजा भाजीपाला मिळावा म्हणून नऊ शेतकऱ्यांनी लोकसहभागातून अंगणवाडी परसबाग प्रकल्प कार्यान्वित केला आहे. त्यामध्ये शेवगा, पालक, आळू, फ्लावर, कोबी,  वांगी, कढीपत्ता, राजमा, भोपळा, तूर, मेथी ,कोथिंबीर आदी पिके...
जुलै 28, 2018
पिंपरी - जन्मतःच कोणी गुन्हेगार नसते, परिस्थिती माणसाला गुन्हेगार बनवते. मात्र, त्यांचे मन परिवर्तन झाल्यास तेही सुखी आयुष्य जगू शकतात. या विश्‍वासाने निगडीतील भूलतज्ज्ञ डॉ. संदीप बाहेती हे महाराष्ट्रातील विविध कारागृहात जाऊन प्रबोधन करत आहेत.  डॉ. बाहेती "आकाश भरारी' या पसायदानावरील...