एकूण 58 परिणाम
जून 15, 2019
मुंबई -  शांतता आणि नागरिकांच्या हक्कांबाबत दावा करणाऱ्या सत्ताधारी राजकीय नेत्यांनी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणी तपास यंत्रणांना सहकार्य करावे, असे खडे बोल न्यायालयाने शुक्रवारी सुनावले. तसेच दाभोलकर आणि पानसरे हत्याकांडातील काही समान धागेदोरे तपास...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या खटल्यांतील फरारी आरोपींना समाजातूनच आर्थिक पाठबळ पुरवले जात आहे. त्यामुळे तपासयंत्रणांनी त्यांचा गांभीर्याने शोध घ्यायला हवा, अशी स्पष्ट सूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सीबीआय आणि सीआयडीला केली.  दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येच्या...
डिसेंबर 07, 2018
मुंबई : गुजरात मधील सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी मुंबई विशेष सीबीआय  न्यायालय 21 डिसेंबरला निकाल देण्याची शक्यता आहे. 2005 मध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसर बी यांची बनावट चकमकीत गुजरात पोलिसांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सोहराबुद्दीनचा साथीदार तुलसीराम प्रजापतीची देखील...
सप्टेंबर 11, 2018
मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमकप्रकरणी दोषमुक्त ठरलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. या दोषमुक्तीला आव्हान देणारे सोहराबुद्दीनच्या भावाचे अपील खंडपीठाने फेटाळले आहे. सीबीआय न्यायालयाने राजस्थानमधील आयपीएस अधिकारी दिनेश एम. एन., गुजरातमधील आयपीएस अधिकारी डी....
ऑगस्ट 26, 2018
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी गौरी लंकेश हत्याप्रकरणाचा संबंध असून, लंकेश प्रकरणातील 3 आरोपींनी दाभोलकर यांच्या हत्येसाठी रेकी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच दाभोलकर प्रकरणातील संशयित मारेकरी सचिन अंदुरेचा साथीदार शरद कळसकर यालाही तपासासाठी सीबीआय कोठडीची आवश्यकता असून,...
ऑगस्ट 24, 2018
पटणाः बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी पॅरोल वाढवून मिळण्यासाठी केलेली याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली असून, त्यांना 30 ऑगस्ट पर्यंत कारागृहात परतण्यास सांगितले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यावर काही महिन्यांपासून मुंबई येथील एशियन हार्ट...
ऑगस्ट 22, 2018
उल्हासनगर : न्यायालयाची दिशाभूल करून आणि जामीन मिळवून फरार झालेल्या उल्हासनगरातील मोस्ट वॉन्टेड बुकी अनिल जयसिंघानी याला पकडण्यात मुंबई पोलिस फेल झाले आहेत. याबाबत उच्च न्यायालय आक्रमक झाले असून या बुकीला 17 सप्टेंबर पर्यंत पकडले नाही तर तपास सीबीआय कडे सोपवला जाईल. असे न्यायालयाने...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  ज्येष्ठ विचारवंत...
जुलै 18, 2018
मुंबई - पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्तींना जाहीरपणे विचार व्यक्त करण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे सीबीआय आणि राज्य सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास निष्पक्षपणे करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला. या दोन्ही प्रकरणांत अद्याप तपास यंत्रणांनी...
जून 29, 2018
मुंबई - कर्नाटकमध्ये पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याकांडामधील आरोपीला कर्नाटक पोलिसांकडून अटक केली जाते, मग डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना सीआयडी आणि सीबीआय का अटक करू शकत नाही, असा थेट सवाल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला. तपासाबाबत आता गृह...
एप्रिल 26, 2018
मुंबई - आध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या इच्छापत्राची मूळ प्रत स्पेनमधील न्यायालयातून भारतात आणण्यासाठी कोणती कार्यवाही केली, याबाबत तपशील देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुणे पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे तपास विभागाला (ईओडब्ल्यू) दिले. ओशो यांचे अनुयायी योगेश ठक्कर यांनी दाखल...
एप्रिल 20, 2018
मुंबई - कथुआ आणि उन्नावमधील बलात्काराच्या घटनांची गंभीर दखल गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयानेही घेतली. देशात गुन्हेगारी आणि बलात्काराच्या घटना वाढत आहेत. मुक्त-उदारमतवादी विचारांच्या व्यक्ती येथे सुरक्षित नसल्याची देशाची घातक प्रतिमा जगभरात निर्माण होत आहे, असे खडे बोल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य...
एप्रिल 12, 2018
मुंबई - कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीत (पीएफ) गैरप्रकार केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी यांना बुधवारी (ता. 11) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला. "सीबीआय'ने हिरानंदानी यांच्या विरोधात दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवले.  हिरानंदानी समूहाच्या...
एप्रिल 10, 2018
मुंबई - कमला मिलमध्ये लागलेल्या आगीत मृत आणि जखमी झालेल्या पीडितांना आणि वारसांना नुकसानभरपाई देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश आज दिले.  कमला मिलमध्ये मागील वर्षी लागलेल्या आगीत चौदा जणांचा मृत्यू झाला होता. आगीत जखमी झालेल्या एकाच कुटुंबातील सात जणांनी...
फेब्रुवारी 13, 2018
मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यातील साक्षीदारांना सीबीआयने कशाप्रकारे संरक्षण दिले आहे, संरक्षण देऊनही ते फितूर का होतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला. सोहराबुद्दीनची हत्या बनावट चकमकीत करण्यात आली, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर सोमवारी (ता. 12) न्या. रेवती मोहिते-ढेरे...
जानेवारी 20, 2018
मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका केली आहे. सोहराबुद्दीन चमकमकीच्या खटल्यामध्ये अमित शहा प्रमुख आरोपी...
जानेवारी 19, 2018
मुंबई : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यामधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बॉम्बे लॉयर्स असोसिएशन या वकिलांच्या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात आज याचिका केली आहे.  सोहराबुद्दीन चमकमकीच्या खटल्यामध्ये अमित शहा प्रमुख आरोपी होते...
जानेवारी 16, 2018
मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीच्या खटल्यात बड्या पोलिस अधिकाऱ्यांना दोषमुक्त करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अपील करणार नाही, असे सीबीआयच्या वतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आले. दोषमुक्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये गुजरातचे तत्कालीन पोलिस...
जानेवारी 14, 2018
नागपूर - सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात बंड पुकरल्याने न्यायालयीन प्रक्रियेत केंद्र सरकार हस्तक्षेप करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांनी आक्षेप घेतलेल्यांमध्ये नागपूरमध्ये मृत पावलेल्या सीबीआयचे विशेष न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. प्रकरणाची निष्पक्ष...
जानेवारी 13, 2018
मुंबई - कमला मिलमधील अग्नितांडवाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्याच्या मागणीसाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा आज केली. पुढील आठवड्यात ही याचिका दाखल केली जाईल.  विखे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार...