एकूण 29 परिणाम
नोव्हेंबर 19, 2019
मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी राज्य सरकारने माजी ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या नेतृत्वाखाली विधिज्ञांची नेमणूक केली आहे. राज्य सरकारची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.  - 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सर्वोच्च न्यायालयात...
नोव्हेंबर 18, 2019
मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण मंगळपासून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर सुनावणी होणारंय. आधीच्या सरकारनं हायकोर्टात वकिलांची फौज उभी केल्यानं मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब झालं मात्र सध्या सरकारच अस्तित्वात नाही त्यामुळे मराठा आरक्षणाची बाजू सुप्रीम कोर्टात कोण...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आज पुन्हा एकदा खीळ बसली आहे. पुढील आदेश येईपर्यंत सामाजिक-आर्थिक मागास गटातून (एसईबीसी) कोणतीही नियुक्ती करण्यास आज मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली. तसेच एसईबीसी कोट्यासाठी खुल्या प्रवर्गात केलेल्या पाच वर्षांपूर्वीच्या नियुक्‍त्या...
सप्टेंबर 10, 2019
नागपूर 9 : वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठीच्या दहा टक्के जागा वाढीनंतर खुल्या प्रवर्गातील जागांमध्ये कपात झाल्याचा दावा करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी 10 टक्के आणि मराठा आरक्षणासाठी 12 टक्के...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जून 30, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैद्य ठरवल्यानंतर मुंबई येथे आज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानत आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी सर्वोत्तम...
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधीमंडळात...
जून 27, 2019
कोल्हापूर - लाखो कागदपत्रांची छाननी, त्यातून शोधलेले पुरावे व यासाठी चार - पाच महिने रात्र दिवस केलेल्या कामाचे आज चीज झाले, अशी प्रतिक्रिया राज्य मागासवर्ग आयोगाचे विधी सल्लागार व कोल्हापुरचे सुपुत्र निवृत्त प्रमुख जिल्हा न्यायाधीश के. डी. पाटील यांनी व्यक्त केली. आम्ही दिलेल्या अहवालानुसार मराठा...
जून 27, 2019
कोल्हापूर - मराठा आरक्षणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे कोल्हापूरकरांनी जोरदार स्वागत केले. न्यायालयाचा निर्णय जाहीर होतात मराठा समाजासह इतर समाजातील बांधव ऐतिहासिक दसरा चौकात जल्लोष केला. पण आरक्षणाच्या टक्केवारीबाबतच्या निर्णयावर बैठक घेऊन पुढील दिशा निश्चित करण्याचे जाहीर करण्यात...
जून 27, 2019
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला.  मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13...
जून 27, 2019
आर्थिक-सामाजिक मागास प्रवर्गामध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने 2014 मध्ये घेतला. या निर्णयाला विरोध करणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्या जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये आरक्षण मंजूर झाल्याच्या विरोधात न्यायालयात...
मे 26, 2019
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत नव्या अध्यादेशामुळे वैद्यकीय प्रवेशात अडथळा आलेल्या विद्यार्थिनीला तत्काळ दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेबाबत खुलासा करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात सामाजिक-आर्थिक मागास प्रवर्गातील...
मे 10, 2019
नागपूर - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास अवैध ठरवणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्णयास आव्हान देणारी राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे या प्रवेशांसाठी यंदा मराठा आरक्षण लागू होणार नाही. या निर्णयाने...
एप्रिल 17, 2019
नागपूर - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या मेडिकलच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसंदर्भातील याचिका मुंबई उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्यास मुख्य न्यायमूर्तींनी पुन्हा एकदा नकार दिला.  मराठा आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत...
मार्च 07, 2019
मुंबई - मराठा समाजातील मतदार लोकसंख्येमध्ये अधिक असल्याने राजकीय क्षेत्रात या समाजाचे नेते अधिक आहेत; मात्र तरीही हा समाज सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास राहिला. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी त्यांना विशेष सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, असा मुद्दा आज राज्य सरकारच्या वतीने मुंबई...
मार्च 02, 2019
मुंबई - घटनेच्या 102व्या दुरुस्तीने राष्ट्रपतींना सर्वाधिकार दिले असले तरी राज्य सरकारचे विशेषाधिकार काढून घेतले असे होत नाही, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील विजय थोरात यांनी शुक्रवारी न्यायालयात केला. मराठ्यांना ओबीसी वर्गात समाविष्ट करून त्यांच्या सध्याच्या आरक्षणात ढवळाढवळ...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई  - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडे कोणताही कायदेशीर आधार असलेला अहवाल नाही. केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून तसेच राजकीय हेतूने बेकायदा हे आरक्षण मंजूर केले आहे, असा थेट आरोप आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकादारांच्या वतीने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.  राज्य सरकारने राज्य...
जानेवारी 31, 2019
मुंबई : मराठा आरक्षण अहवाल याचिकादारांना देण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते व प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले होते.  मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम...
जानेवारी 28, 2019
मुंबई : मागासवर्ग आयोगाने मराठा आयोगाबाबत सादर केलेला अहवाल तातडीने याचिकाकर्ते आणि प्रतिवाद्यांना द्यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर अंतिम सुनावणी 6 फेब्रुवारीला होणार आहे. 'राज्य मागासवर्ग आयोगाचा...
डिसेंबर 20, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित असताना इतर मागास प्रवर्गाच्या (ओबीसी) आरक्षणाला विरोध करणारी जनहित याचिका बुधवारी (ता. 19) मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा न तपासता दिलेले आरक्षण रद्द करावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.  औरंगाबाद येथील प्रा...