एकूण 20 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँक बंद...
जुलै 13, 2019
मुंबई : हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मेहुल चोक्‍सीने आता अँटिग्वामध्ये आलेल्या वादळाची सबब पुढे केली आहे. वादळ आल्यामुळे HB माझे कायद्यासंबंधित कागदपत्रे कुरिअर करु शकलो नाही, असा दावा त्याने मुंबई उच्च न्यायालयात केला.  पंजाब नॅशनल बॅकेतील गैरव्यवहार प्रकरणात चोक्‍सी...
मे 23, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएच्या आघाडीचे सरकार येण्याची चिन्हे निर्माण झाल्याने शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजी दिसून येते आहे. बाजारात गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या बाजारभांडवलात आज तब्बल 2.87 लाख कोटी रुपयांची भर पडली आहे....
मे 20, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांवर अक्षरशः पैसाच पाऊस पडला आहे. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील...
मार्च 19, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन महिन्यांचा तुरुंगवास टळला आहे....
जून 30, 2018
बंगळूरु : बँकांचे  सुमारे 9 हजार कोटी रुपये बुडवून परदेशात फरारी झालेल्या विजय मल्ल्याचे खाजगी विमान अखेर विकण्यात आले आहे. तीनदा लिलाव अयशस्वी झाल्यानंतर अखेर चौथ्या वेळेस जेटची विक्री करण्यास यश मिळाले.  बंगळूरमध्ये कर्नाटक न्यायालयाने नेमलेल्या सरकारी अधिकाऱ्याने एअरबस एअरबस ए 31 9 -133 सीचा...
मे 18, 2018
मुंबई : कर्नाटकातील राजकीय घडामोडींचा फटका गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराला बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २३८ अंशांची घसरण होऊन ३५ हजार १४९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ५८ अंशांची घट होऊन १० हजार ६८२ अंशांवर बंद झाला. कर्नाटकमध्ये बी. एस....
मे 17, 2018
नवी दिल्ली - सहारा समूहाने ‘सेबी’- सहारा रिफंड खात्यात ७५० कोटी रुपये जमा न केल्याने समूहाच्या ॲम्बी व्हॅली मालमत्तेची लिलाव प्रकिया सुरूच राहील, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले.  सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश रंजन गोगोई आणि ए. के. सिक्री यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. ॲम्बी...
मार्च 23, 2018
नवी दिल्ली - अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदरात वाढ केल्याचा फटका शेअर बाजाराला गुरुवारी बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १२९ अंशांची घसरण होऊन ३३ हजार ६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४० अंशांच्या घसरणीसह १० हजार ११४ अंशावर बंद झाला. ...
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई - चालक भागीदारांना दिलेल्या परताव्यामध्ये नियमभंग केल्याचा आरोपावरून प्राप्तिकर विभागाने उबर कंपनीला बजावलेल्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे.  प्राप्तिकर विभागाने उबर कंपनीला सुमारे १०९ कोटी रुपये जमा करण्याची नोटीस बजावली आहे. कंपनीने त्यांच्या चालक भागीदारांना दोन...
फेब्रुवारी 21, 2018
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्या समोरील अडचणीत वाढच होत चालली आहे.  डीएसकेंचा पुण्यातील राहत्या बंगल्याचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून लिलाव करण्यात येणार आहे.  सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून डीएसकेंच्या पुण्यातील सेनापती बापट मार्गावरील राहत्या बंगल्याचा पुढील महिन्यात 8 मार्चला...
फेब्रुवारी 16, 2018
मुंबई : डी. एस. कुलकर्णी (डीएके) यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाकडून दोनदा दिलासा मिळाल्यांनतर डीएकेंनी मुंबई उच्च न्यायलयाची फसवणूक केल्याचे सिद्ध आहे. याची उच्च न्यायालयाने दखल घेत आता संताप व्यक्त केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना यापुढे एकही संधी...
डिसेंबर 19, 2017
मुंबई -  केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी वैधतेची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारसह कॅगलाही नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.  सरकारकडून विविध प्रकारच्या उत्पादनांवर सर्वसाधारण सेवा कर (जीएसटी) व अन्य करही लावले जातात, त्यामुळे अन्य सरकारी...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - सहारा समूहाच्या आलिशान अँबी व्हॅलीच्या लिलावामध्ये केवळ दोनच इच्छुक असल्याचे चित्र आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अँबी व्हॅलीचा लिलाव होणार असून, या मालमत्तेची राखीव किंमत ३७,३९२ कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. अद्याप कोणत्याही लिलावधारकाने बोलीसाठी अधिकृत नोंदणी केली नसल्याची माहिती...
जुलै 26, 2017
सर्वोच्च न्यायालयाचा ‘सहारा’ला आदेश नवी दिल्ली - सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना येत्या सात सप्टेंबरपर्यंत रु. १५०० कोटी सेबी-सहारा रिफंड खात्यात जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले. दरम्यान, रॉय यांना यापूर्वीच मंजूर झालेल्या ‘पॅरोल’ची मुदत सर्वोच्च न्यायालयाने १० ऑक्‍टोबरपर्यंत...
जुलै 07, 2017
लंडन: मी गेल्या पंचवीस वर्षांपासून ब्रिटनमध्ये राहतो, असा अजब दावा मद्यसम्राट विजय मल्ल्या याने केला. ब्रिटनच्या वेस्टमिन्सटर न्यायालयात प्रत्यार्पणासंदर्भातील खटल्याच्या सुनावणीसाठी मल्ल्या हजर झाला होता. सुनावणी संपवून बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी घेरले असता मल्ल्याने हा अजब दावा केला. याबाबत...
जुलै 06, 2017
मुंबई: मालमत्तेच्या वाढलेल्या किंमती आणि नोटाबंदीनंतर ग्राहकांनी पाठ फिरवल्याने मुंबई महानगर प्रदेशात तब्बल 1 लाख 38 हजार घरे विक्रीविना पडून असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात रेरा कायद्याची अंमलबजावणी झाल्यामुळे शिल्लक घरांची विक्री करताना विकसकांची दमछाक होण्याची शक्‍यता आहे. बांधकाम...
एप्रिल 21, 2017
घर, जागा, शेअर्स, फंड, बॅंका या सर्वांमध्ये सामाईक समस्या कोणती येत असेल तर ती म्हणजे, या "नॉमिनी'चे करायचे काय? नॉमिनी झालेली व्यक्तीच संबंधित मिळकतीची एकमेव मालक होते का?, इतर कायदेशीर वारसांनादेखील अशा मिळकतींमध्ये हक्क नसतो?, घर-जागा आणि कंपन्या, बॅंका यांना "नॉमिनी'बद्दलचा वेगवेगळा कायदा लागू...
मार्च 30, 2017
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बीएस-III वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑटो कंपन्यांकडून मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. होंडा मोटारसायकल अँड स्कूटर आणि हीरो मोटोकॉर्पकडून दुचाकी वाहनांवर मोठी सवलत जाहीर करण्यात आली आहे. बीएस-III प्रकारातील स्कूटरवर हीरो...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई: ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या (ओएनजीसी) नफ्यावर लाभांश वितरणामुळे (रॉयल्टी पेमेंट) परिणाम होणार आहे. कंपनीला दोन राज्यांना लाभांशाचे वितरण करावयाचे असल्याने निव्वळ नफ्याला रु.1600 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. ओएनजीसीने यापूर्वीच रु.2500 कोटींचे लाभांश वितरण केले आहे. ओएनजीसी आणि ऑइल...