एकूण 66 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या शालेय रेकॉर्डमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीची दुरुस्ती आता कधीही करता येणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या पूर्णपीठाने दिला आहे. या निर्णयामुळे आता शाळा सोडलेले विद्यार्थीही आपल्या शालेय प्रमाणपत्रावर झालेली चूक दुरुस्त करू...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांसदर्भात कनिष्ठ न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केल्याची माहिती पोलिस उपायुक्त (वाहतूक) चिन्मय पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. तसेच, नागरिकांनी 16 ऑक्‍टोबर ते 28 ऑक्‍टोबरच्या काळामध्ये सोशल मीडिया आणि ई-मेलद्वारे एकूण 282 तक्रारी केल्याची...
नोव्हेंबर 08, 2019
नागपूर : उच्चदाब वीजवाहिनींजवळील किती अवैध इमारती पाडल्या? असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेला केला. मात्र, न्यायालयामध्ये उपस्थित सहायक आयुक्तांना त्याचे उत्तर देता आले नाही. त्यावरून उच्च न्यायालयाने महापालिकेला कठोर शब्दांत खडसावले. तसेच, पुढील सुनावणीमध्ये...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर : अधिकारक्षेत्राच्या वादात रस्त्याचे काम रखडल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने भूपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्रालयाला दणका दिला आहे. न्यायालयाने रस्त्याच्या कामात उशीर होत असल्याने सुमोटो ऍक्‍शन घेत याचिका दाखल करून घेतली असून भूपृष्ठ वाहतूक व दळणवळण मंत्रालयाला तब्बल 25 कोटींचा...
नोव्हेंबर 05, 2019
नागपूर  : अंबाझरी तलावातील प्रदूषित पाण्याच्या प्रकरणात सर्व प्रतिवाद्यांना उत्तर सादर करण्याची शेवटची संधी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिली आहे. तसेच, उत्तर समाधानकारक नसल्यास 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशीदेखील तंबी उच्च न्यायालयाने दिली. अंबाझरी तलावातील शेकडो माशांच्या...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : राज्यातील पोलिसांवर 2017 मध्ये 456 गुन्हे दाखल झाल्याचे राष्ट्रीय गुन्हे अहवाल विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून उघड झाले आहे. देशातील कोणत्याही राज्याच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. यातील कोणत्याही गुन्ह्यांत वर्षभरात कोणालाही अटक झालेली नसल्याचेही समोर आले आहे. 2017 मध्ये दाखल झालेल्या...
नोव्हेंबर 03, 2019
सातारा  जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय सोलापूर आणि शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने अकूलज येथील विजयसिंह मोहिते क्रीडा संकूल येथे राज्यस्तरीय आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुले आणि मुली तसेच 17...
नोव्हेंबर 02, 2019
औरंगाबाद : दीड वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी सर्वत्र खोदून ठेवलेल्या औरंगाबाद-जळगाव महामार्गावर सत्तरेक बळी गेल्यानंतर आणि जगभर नाचक्की झाल्यावर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जाग आली आहे. आठ दिवसांत हा रस्ता दुरुस्त करा, नसता कारवाईला सामोरे जा, असा आदेशच सार्वजनिक बांधकाम...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई, ता. ३१ : विजय सिंह या तरुणाचा कोठडीत मृत्यू झाल्याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी मंगळवारी रात्री प्रेमी युगुलावर गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे. या युगुलाने विजय सिंहला बेदम मारहाण केली होती, असे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.  दशरथ देवेंद्र आणि...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर : भारतीय वारसा जोपासण्यात संग्रहालय संस्कृतीचे मौलिक योगदान आहे. या समृद्धीचे दर्शन घ्यायचे असल्यास प्रत्यक्ष तेथे जाण्यावाचून पर्याय नसतो. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने हीच बाब ओळखून चालते-फिरते संग्रहालय स्थापन केले. तब्बल 28 हजार 340 किलोमीटरचा प्रवास करून संग्रहालय...
नोव्हेंबर 01, 2019
नागपूर ः दिल्ली विद्यापीठातील बडतर्फ प्रा. जी. एन. साईबाबा यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आवश्‍यक असलेले सर्व उपचार मेडिकल आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होऊ शकतात असा अहवाल दिला आहे. दरम्यान, येथे त्यांच्या प्रकृतीकडे कोणतेही दुर्लक्ष होणार नाहीत. तशी काळजी घेण्यात येईल. त्यांच्या वैद्यकीय...
ऑक्टोबर 30, 2019
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला कठोर शब्दांमध्ये खडसावल्यानंतर महापालिका खडबडून जागी आली आहे. शहरातील विविध मार्गांवर पडलेल्या खड्ड्यांना बुजविण्यासाठी महापालिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. याद्वारे, आजवर 11 हजार 506 खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली...
ऑक्टोबर 29, 2019
नागपूर : देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्यास असणाऱ्याना नागपूरकरांना सणासुदीच्या आणि सुटीच्या काळामध्ये शहरात परत येण्यासाठी आणि जाण्यासाठी मोठा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागतो. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी खासगी बस कंपन्यांची हीच मनमानी पाहायला मिळत आहे. अवाजवी टिकीट आकारणी थांबवावी आणि...
ऑक्टोबर 25, 2019
मुंबई : ऐन दिवाळीच्या हंगामात खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट चालवली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट भाडे घेण्याचा अधिकार खासगी  वाहतूकदारांना आहे; परंतु खासगी वाहतूकदार दुप्पट अथवा त्याहून अधिक भाडे घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत.  विधानसभा निवडणूक संपताच...
ऑक्टोबर 23, 2019
नागपूर : कमी पाऊस पडलेल्या गावातील गुरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी अधिक पर्जन्यमानाच्या ठिकाणी चारा पीक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यासाठी बुडीत क्षेत्र भाडेपट्टीवर देण्याचे या निर्णयामध्ये ठरले. मात्र, पूर्वी निश्‍चित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची यादी आता बदलण्यात आल्याने त्या...
ऑक्टोबर 17, 2019
नागपूर : रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात नागरिकांनी महापालिका व वाहतूक पोलिस विभागाने उपलब्ध करून दिलेल्या सोशल मीडिया साईट्‌सवर तक्रार दाखल करावी. या तक्रारींची सात दिवसांत संबंधित विभागाने दखल घ्यावी. मुदत संपल्यानंतरही तक्रारीची दखल न घेतल्यास पोलिस विभागाने प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात करावी. तसेच...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : ओशिवरा येथील म्हाडाच्या जमिनीचा गैरवापर केल्याप्रकरणी बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिले आहेत. या गैरव्यवहारात म्हाडाचे सुमारे २००० कोटींचे नुकसान झाले आहे. बनावट कागदपत्रे बनवून गंडा घातल्याच्या प्रकरणात दोषींवर कारवाई होईल आणि...
ऑक्टोबर 15, 2019
नागपूर : विदर्भातील सिंचन घोटाळा प्रकरणात सर्व पक्षकारांनी 14 नोव्हेंबरपर्यंत आपले अंतिम मुद्दे दाखल करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तसेच या प्रकरणावर 20 नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणी करण्यात येणार असल्याचेही न्यायालयाने नमूद केले. न्यायमूर्ती झेड. ए. हक आणि...
ऑक्टोबर 11, 2019
नागपूर : रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताला जबाबदार कंत्राटदारांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर, इतर दोन अपघाताच्या प्रकरणातील जबाबदार वाहनचालकांवरसुद्धा गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. शहरातील खड्ड्यांच्या समस्येबाबत...
ऑक्टोबर 05, 2019
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज आरे वसाहतीतील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्ष कापणी विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर रात्री तत्काळ वृक्ष कापणीस सुरवात झाली असून तब्बल 200 झाडांची रात्रीत कत्तल करण्यात आली आहे. तसा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विधानसभा निवडणूक विरोधकांकडून हा प्रचाराचा मुद्दा होण्याची...