एकूण 349 परिणाम
जून 14, 2019
अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी...
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून ठेऊन, धमकी...
जून 12, 2019
औरंगाबाद - सरकारी जमीन बेकायदा हस्तांतरित करून घेतल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्यायमूर्ती के. के. सोनवणे यांनी आज दिले आहेत.  या प्रकरणी...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...
जून 10, 2019
पुणे-  राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थांमध्ये यंदा जवळपास एक लाख ३७ हजार ३०० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये सुमारे ८९ हजार ६१६ जागा; तर खासगी आयटीआयमध्ये ४७ हजार ६८२ जागा आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी अर्ज करण्याची ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून, ३० जूनपर्यंत अर्ज करता...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा...
मे 29, 2019
औरंगाबाद - महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र, कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. २८) प्रभाग दोनमध्ये कामगारांनी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन केले.  सोमवारी (ता. २७)...
मे 28, 2019
औरंगाबाद : महापालिकेने घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक करण्यासाठी खासगी कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र कंपनीतर्फे कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत असून, मंगळवारी (ता. 28) प्रभाग दोन मध्ये कामगारांनी सकाळपासून काम बंद आंदोलन केले. सोमवारी (ता. 27)...
मे 28, 2019
औरंगाबाद - बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रे सादर करून एलआयसीच्या जनश्री योजनेअंतर्गत 99 लाख 30 हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार केल्या प्रकरणातील चौघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी सोमवारी (ता. 27) फेटाळला.  अलीखान दाऊद...
मे 28, 2019
औरंगाबाद - नव्या दुचाकीसोबत हेल्मेट देण्याच्या आदेशाची सोमवारपासून (ता. 27) अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अचानक सुरू केलेल्या या सक्तीने वितरक आणि ग्राहकांत वाद उद्‌भवत आहेत; मात्र आठवडाभरात अंमलबजावणी सुरळीत होईल, असा विश्‍वास सहायक प्रादेशिक अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी व्यक्त केला.  नवीन...
मे 27, 2019
औरंगाबाद - आपल्या कार्यक्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्‍तींचा, त्यांच्या विधायक कार्याचा ‘सकाळ’ मराठवाडा आवृत्तीच्या विसाव्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी (ता. एक जून) जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज सिडको नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात सायंकाळी साडेसात...
मे 26, 2019
मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून 2018-19 या शैक्षणिक वर्षात झालेल्या बदलीची प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाने ग्राह्य ठरविली आहे. परंतु, या प्रक्रियेत सरकारी धोरणाचे काटेकोर पालन न झाल्यामुळे बाधित शिक्षकांना सामंजस्याने पुन्हा बदली करून घेण्याची मुभाही...
मे 25, 2019
औरंगाबाद : सिडको एन-4 भागात तब्बल नवव्या दिवशी तर एन-पाचमध्ये सहाव्या दिवशी नळाला पाणी न आल्याने नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर धाव घेऊन टॅंकरचा पाणी पुरवठा बंद पाडल्याचा प्रकार शनिवारी (ता. 25) सकाळी घडला. यावेळी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पाणी येणार...
मे 19, 2019
औरंगाबाद - देशात बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोप असलेल्या सिमी संघटनेवर केंद्राने घातलेल्या बंदीसंबंधी साक्षी-पुरावे तपासण्याचे काम दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्यासमोर सुरू आहे. सिमीवरील बंदी योग्य आहे की नाही, यासंबंधी स्थापन करण्यात आलेल्या न्यायाधिकरणाच्या माध्यमातून...
मे 19, 2019
औरंगाबाद : बी. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थी प्रवेश संख्या कमी केल्याप्रकरणातील याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायाधीश एस. एम. गव्हाणे यांनी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, संचालक, तंत्रशिक्षण यांच्यासह राज्य सरकारला नोटीस बजावली. 24 मे रोजी याचिकेवर पुढील सुनावणी...
मे 05, 2019
येवला : राज्य शासनाच्या सेवेत 2005 नंतर नियुक्त असणाऱ्या शिक्षकांसह इतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी दाखल केलेली याचिकेवर उच्च न्यायालयाने विरोधात निकाल दिला आहे. त्यामुळे पेन्शनसाठी राज्यातील शिक्षक आमदारांनी स्वतः पुढाकार घेऊन सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय...
मे 04, 2019
जळगाव : वाघूर, अटलांटा, जिल्हा बॅंकेतर्फे जळगाव नगरपालिकेला देण्यात आलेले कर्ज, आयबीपी खात्यातील व्यवहार, जळगाव विमानतळ उभारणी प्रकरणात झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) फेरचौकशी करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद : नांदेड येथील निवृत्त वन कर्मचाऱ्याच्या याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती ए. एम. ढवळे यांच्या पीठाने आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ देण्यासंदर्भात तीन महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश शासनाला दिले. तसेच महाराष्ट्र...
एप्रिल 16, 2019
नंदुरबार : भाजपमधील बंड थांबविण्यात वरिष्ठांना अपयश येत असल्याचे चित्र आज नंदुरबारमध्ये दिसून आले. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुहास नटावदकर यांनी भाजप उमेदवार डॉ. हीना गावितांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार डॉ. हीना गावित यांच्या उमेदवारीला...
एप्रिल 11, 2019
औरंगाबाद : केशव कुलकर्णी यांच्या मृत्युप्रकरणी संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंदविण्याबाबत सत्र न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज सादर करता येत असल्यामुळे तेथे जाणे योग्य राहील, असे मत व्यक्त करीत औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांनी याचिकाकर्त्याला सत्र...