एकूण 1389 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई केली जाणार आहे. मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिस यांना आपल्या खासगी वाहनावर 'पोलिस' अशी पाटी लावता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. खासगी वाहनावर 'पोलिस' पाटी अनेकदा आपण पाहिली असेल. अशी...
जून 26, 2019
मुंबई : अनेक पोलिसांच्या खासगी गाडीवर 'पोलिस' अशी पाटी लावलेली असते. याचा अनेकदा कारवाईपासून वाचण्यासाठी वापर केला जातो. मात्र, अशी पोलिस नावाची पाटी किंवा लोगो लावणाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. आता यापुढे गाडीवर मुंबई पोलिस किंवा वाहतूक पोलिसांचा लोगो लावता येणार नाही. महाराष्ट्र...
जून 25, 2019
सातारा - चारचाकी वाहनांच्या काचांना ‘ब्लॅक फिल्म’ लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरीही अनेक वाहने अद्यापही तशा स्थितीत फिरत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे अशा वाहनांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक विनय कारगावकर यांनी सर्व पोलिस अधीक्षकांना दिले...
जून 23, 2019
अमरावती : हवाई सुंदरीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सहा लाख रुपये लुबाडणाऱ्या साहिल इमरान शेख मेहमूद (वय 34 रा. कृषक कॉलनी, टाकळी, नागपूर) याला जिल्हा न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. 25) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. फ्रेजरपुरा पोलिसांनी बुधवारी (ता. 19) साहिल यास अटक केली. त्याचे दोन...
जून 22, 2019
सातारा : नो कमेंटस, नो कमेंटस, राजकीय षड्यंत्र, नो कमेंटस असे बोलतच आज बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले पोलिसांच्या गाडीत बसला आणि रवाना झाला. सह दिवाणी न्यायाधीश आर.व्ही.पाटील यांनी बिचुकलेस धनादेश न वठल्याप्रकरणात जामीन दिला परंतु खंडणी मागण्याच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावली. तूर्तास...
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 21, 2019
पुणे - लोकांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार व शोषणाविरुद्ध लोकांनी आवाज उठविणे किंवा सरकारच्या विरोधात बोलणे, हा देशद्रोह ठरू शकतो का? असा प्रश्‍न उपस्थित करीत एल्गार परिषदप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना पत्र पाठविले आहे. ‘खरी लोकशाही अस्तित्वात असेल, तर आमच्यासारख्या...
जून 20, 2019
तिघांना अटक; 86 लाखांचे 11 हजार 736 मुद्रांक जप्त पुणे - शासकीय कोशागारातील अधिकाऱ्यांची बनावट सही तसेच शिक्‍क्‍यांचा वापर करून मुद्रांकाची विक्री करणाऱ्या शनिवारवाड्याजवळील देशपांडे स्टॅम्प व्हेंडर्सचा विश्रामबाग पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी शंभर आणि पाचशे...
जून 18, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येत एका स्थानिकाचा समावेश असल्याचे आज पुढे आले आहे. त्या व्यक्तीचे वर्णन संशयित शरद कळसकर सांगतो आहे. पण त्याचे नाव सांगण्यास तो टाळाटाळ करीत आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार जोडणीचीही जबाबदारीही त्याच्यावर सोपविण्यात आली होती अशी माहिती तपासात...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 14, 2019
अमरावती : विद्यापीठातील पेपर फूटप्रकरणी अनेक जण रडारवर आहेत. पेपर लिक केल्यानंतर प्रत्येक पेपरसाठी विद्यार्थ्यांकडून दीड हजार रुपये या टोळीने वसूल केल्याची कबुली अटकेनंतर आशीष राऊत याने फ्रेजरपुरा पोलिसांपुढे दिली. त्या दोघांच्या घराची झडती पोलिसांनी घेतली. तपास अधिकाऱ्यांनी दोघांकडून त्यांनी...
जून 14, 2019
अंबाजोगाई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ते धनंजय मुंडे यांच्यासह इतर 14 जणांवर  शुक्रवारी (ता. 14) बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गेल्या तीन दिवसापुर्वीच दिले होते. यांनतर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी...
जून 14, 2019
मुंबई - अभिनेता नाना पाटेकर यांना गुरुवारी मुंबई पोलिसांकडून दिलासा मिळाला. अभिनेत्री तनुश्री दत्ताने "मी टू' मोहिमेंतर्गत त्यांच्याविरोधात केलेल्या विनयभंगाच्या आरोपामध्ये पोलिसांनी पाटेकर यांना कनिष्ठ न्यायालयात क्‍लीन चिट दिली आहे. मात्र, यामुळे संतापलेल्या तनुश्री यांनी "नॉट ओके' अशी...
जून 13, 2019
अभिव्यक्तीला अटकाव करण्याच्या दडपशाहीला सर्वोच्च न्यायालयाने चपराक लगावली आहे. मूलभूत हक्कांबाबत कोणतीही तडजोड नाही, हा दिलासा महत्त्वाचा आहे.‍ अ भिव्यक्‍ती स्वातंत्र्यासंदर्भात राज्यघटनेने नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्‍कांबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा सर्वोच्च...
जून 12, 2019
औरंगाबाद : तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज प्रभाकर लोहार याचा नियमीत जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. के. के. सोनवणे यांनी फेटाळला. डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांचे अपहरण करुन 25 लाखांच्या खंडणीची मागणी केली. त्याकरीता तक्रारदारास डांबून ठेऊन, धमकी...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
जून 11, 2019
कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येत पूर्वी साक्षीदार असलेल्या शरद भाऊसाहेब कळसकर याला आज कोल्हापूर एसआयटीने हत्येतील पिस्तुलाची विल्हेवाट लावल्याच्या संशयावरून मध्यरात्री अटक केली. दुपारी न्यायालयात हजर केले असता 18 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती...
जून 07, 2019
धुळे/जळगाव - राज्यातील बहुचर्चित जळगाव पालिकेतील घरकुल गैरव्यवहारप्रकरणी दीर्घ युक्तिवाद व सुनावणी पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण निकालाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचले आहे. धुळे न्यायालयात शुक्रवारी (ता. ७) या प्रकरणाचा निकाल लागणार असून, राज्यातील राजकीय वर्तुळाचे या निकालाकडे लक्ष लागून आहे. याआधी हा...
जून 06, 2019
पुणे -  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या फिरत्या लोक अदालतीद्वारे (मोबाईल लोक अदालत) आता जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन, तडजोडीने खटले मिटवले जाणार आहेत. काही ठिकाणी नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाईल.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा...
जून 04, 2019
मुंबई - आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तपासात ढिसाळपणा दाखवल्याचा ठपका ठेवून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला १० लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम संबंधित मुलीच्या पालकांना देण्याचा आदेश न्यायालयाने सोमवारी दिला.  या प्रकरणात सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या...