एकूण 101 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा निवडणुकीनिमित्त भाजपचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपकडून ‘कलम ३७०’चा महाराष्ट्राच्या निवडणुकीतील वापर, आयारामांना उमेदवारी देताना निष्ठावंतांवर झालेला अन्याय, महायुती झाल्याने वाढलेली बंडखोरी, याबाबत भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रभारी खासदार सरोज पांडे यांच्याशी ‘सकाळ’चे प्रतिनिधी मिलिंद...
ऑक्टोबर 15, 2019
सांगोला : ''शिवसेनेला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे. दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांसाठी मदत करीत होती. शिवसेना पीक विम्यासाठी सत्तेत असूनही सतत आवाज उठवत होती. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून घेणारे पिक विम्यासाठी गप्प का होते?'' असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सेनेचा...
ऑक्टोबर 14, 2019
गडहिंग्लज - 2014 पूर्वी 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा' असे विचारणाऱ्यांना आता जनतेने हाच प्रश्‍न महायुतीच्या नेत्यांना विचारावा, तसेच युती सरकारला लाज असेल तर आत्मचिंतन करून स्वत:लाही हा प्रश्‍न विचारावा. पाच वर्षाचा लेख्या जोख्याचा जाब विचारणारीच ही निवडणूक आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल...
ऑक्टोबर 11, 2019
अमरावती : कॉंग्रेस, राष्ट्रवादीमध्ये आता कुणी उरले नाही. उरलेले टिकतील की नाही याची हमी नाही. तिकीट मिळालेले ऐनवेळी पळत आहेत. त्यामुळे सामना करण्यासाठी कुणीच उरला नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (ता. 11) कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केली. शिवसेना-भाजप महायुतीच्या...
एप्रिल 12, 2019
इस्लामपूर - विश्‍वासघात हेच ज्यांचं कर्तृत्व आहे त्यांना पुन्हा संधी देणार का? असा सवाल करीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ‘स्वाभिमानी शेतकरी’चे खासदार राजू शेट्टी यांच्या अभद्र युतीवर तोफ डागली. शेतकऱ्यांना गोळ्या घालणाऱ्या व त्यांचे रक्त...
मार्च 08, 2019
कोल्हापूर - लोकसभेसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी जाहीर न झाल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नाहीत, अशी तक्रार आज कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी थेट ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली. श्री. पवार यांनी...
फेब्रुवारी 03, 2019
जालना : महाराष्ट्रात सातत्याने दुष्काळ येत आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार म्हणून जे जे करात येईल ते तर करूच, परंतू सरसकट कर्जमुक्तीसाठी वेळप्रसंगी संघर्ष करावा लागला तरी चालेल पण ती करवून घेऊच, अशा शब्दात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सरकारने केलेल्या कर्जमुक्तीवर आपल्या...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या...
ऑक्टोबर 01, 2018
बीड : राफेलमधून देशाची लुट झाली आहे. सरकारने 650 कोटी रुपयांचे विमान 1650 कोटी रुपयांना कसे खरेदी केले याचे स्पष्टीकरण द्यावे. चौकशी समितीला सामोरे जाऊन खरेदीची कागदपत्रे सादर करावीत, संसदेत उत्तर द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले.  राष्ट्रवादी काँग्रेसचा...
सप्टेंबर 11, 2018
इस्लामपूर - स्वाभीमानीतील बंडखोर यापुर्वी आंदोलनापासून दूर गेले आहेत. आता त्यांना रसद पुरवून भाजप सरकार बोलायला भाग पाडत आहे अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज येथे पत्रकार बैठकीत केली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सयाजी मोरे, तानाजी साठे, धैर्यशील...
जून 30, 2018
पुणे - राज्य सरकारने पीक कर्जमाफीचा घोळ करून ठेवला आहे. खरीप हंगाम सुरू होऊनही बॅंका शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायला तयार नाहीत. त्यामुळे संपूर्ण कृषी अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. तसेच, दुधाला योग्य भाव आणि ऊस उत्पादकांना थकीत एफआरपी (रास्त व किफायतशीर दर) न दिल्यास येत्या हंगामात एकही साखर कारखाना सुरू...
जून 28, 2018
राहुरी फॅक्टरी (नगर) : "इथेनॉल दरवाढीचा शेतकऱ्यांना काहीही फायदा नाही. कर्जमाफी फसवी ठरली. त्यामुळे शेतकरी आणखी आर्थिक कोंडीत सापडला. दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली. तरच शेतकऱ्यांना अच्छे दिन येतील." असे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.  काल (बुधवारी) रात्री...
जून 27, 2018
इंदापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून येताना जनतेस दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने त्यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे  जनता आगामी निवडणूकीत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय रहाणार नाही. असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. कळाशी, गंगावळण ( ता. इंदापूर ) येथील...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - जगात व्यापरयुध्द सुरू आहे आणि जगापुढे कृत्रीम बुध्दमत्तेचा धोका आहे. ड्रोन, रोबोट, विनावाहक गाड्या, महासंगणक याचे युग आहे. किती नोकऱ्या जातील आणि नवीन किती होतील याबाबत जगभर चिंता आहे. असे संशोधनही भारतात होत नाही. जागतिक दर्जाची गुणवत्ता निर्माण झाली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन...
मे 17, 2018
परभणी - 'राज्यात 2014 च्या निवडणुकीत आघाडी न झाल्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागले. त्यामुळे आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सन्मानपूर्वक आघाडी होईल, यात शंका नाही. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू आहेत. राज्यात आघाडीचेच सरकार आणण्याचे लक्ष्य असेल. विधान...
मे 07, 2018
कर्जवितरण २० टक्‍क्‍यांनी घटले नाशिक - जिल्हा बॅंकेच्या अडचणीमुळे ४४ नागरी सहकारी बॅंकांच्या ठेवी ३० टक्‍क्‍यांनी वाढल्या. मात्र कर्ज वितरण २० टक्‍क्‍यांनी घटल्याने ठेवी-कर्ज वितरणाचे प्रमाण टिकवण्याचे आव्हान बॅंकांपुढे आहे. कर्जमाफीच्या घोषणेच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी परतफेडीला दिलेला थंडा...
एप्रिल 09, 2018
सातारा - राज्यातील सोळा मंत्र्यांनी साडेतीन वर्षांत 90 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज हल्लाबोल आंदोलनानिमित्त गांधी मैदानावर आयोजित सभेत केला.  "क्‍या आपको अच्छे दिन महसूस हो रहे है?' असा सवालही उपस्थितांना केला. शेतकरी आणि...
एप्रिल 06, 2018
तासगाव - माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तासगावात पोलिसांवर हल्ला होणे, ही महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे. खासदार झालं म्हणून  फार अक्‍कल येतेच असे नाही. चुकीची माणसं मोठ्या पदांवर गेली की काय होतं, याचा अनुभव इथली जनता घेत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
एप्रिल 02, 2018
मुरगूड - शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी भाव नाही, अडीच हजार कोटींची ऊसाची बाकी द्यायची आहे. 89 लाख शेतकऱ्यांची 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करणारे हे सरकार गोरगरीबांना लुटून धनदांडग्याना मोठे करण्यात मग्न आहे. आता या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा हल्ला माजी...
मार्च 30, 2018
नाशिक : नोटबंदीसारखे चुकीचे दुसरे कुठलेही पाऊल असत नाही, असे टीकास्त्र केंद्र सरकारवर डागत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अर्थव्यवस्था निराशाजनक असल्याचे नमूद केले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी सरकारचा आता वेळ संपला असल्याने अर्थव्यवस्था सक्षमतेसाठी जनतेला सरकारच्या नाड्या आवळाव्या...