एकूण 10 परिणाम
डिसेंबर 12, 2017
नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सरकारला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती एक हजार रुपयांच्या स्टॅम्प...
डिसेंबर 11, 2017
नागपूर - गेल्या तीन वर्षांपासून खोटी आश्‍वासने देऊन फसविणाऱ्या युती सरकारचे भाजप अन्‌ शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोनच लाभार्थी असल्याचा घणाघात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषित...
मे 22, 2017
मुंबई - ‘एक देश, एक कर’ हा मूलमंत्र घेऊन भाजप सरकारने ‘जीएसटी’ लागू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला असला तरी, यावरून मात्र ‘यूपीए’ सरकार व मोदी सरकार यांच्यातील राजकीय स्पर्धा तीव्र झाली आहे. याचेच पडसाद आज विधिमंडळातील चर्चेत प्रकर्षाने उमटले. आजी व माजी...
मे 21, 2017
सरकारची ग्वाही; नुकसान भरपाईसंदर्भातील विधेयक मंजूर मुंबई - राज्य वस्तू आणि सेवाकर विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात पहिल्या दिवशी महापालिकांना आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे विधेयक दोन्ही सभागृहांत चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले....
मे 17, 2017
सावर्डेत सभा - नेत्यांसह ४० आमदार होणार सहभागी चिपळूण - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाने राज्यात सुरू केलेली संघर्ष यात्रा बुधवारी चिपळुणात येणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह छोट्या पक्षाचे राज्यातील नेते, ४० आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी होणार आहेत, मात्र काँग्रेसचे नेते...
एप्रिल 26, 2017
गारगोटी - शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या असंवेदनशील सरकारला जागे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देणारच. शेतकऱ्यांचा सात- बारा कोरा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. मुदाळ (ता. भुदरगड) येथे संघर्ष यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते बोलत...
एप्रिल 04, 2017
सोलापूर - ""सध्या सुरू असलेल्या संघर्ष यात्रेने लगेच काही साध्य होणार नाही. हा संघर्ष कायम सुरू राहिला पाहिजे आणि त्यासाठी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात संघटन होणे आवश्‍यक आहे. त्यांच्या मुलांनीही या संघर्ष यात्रेत सहभागी झाले पाहिजे,'' असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ...
मार्च 31, 2017
मुंबई : विधान परिषद बरखास्तीबाबत भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी मांडलेले मत हे व्यक्तिगत असून त्याच्याशी मी सहमत नाही. परिषद बरखास्तीबाबत राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही. विधानसभा आणि विधान परिषद ही दोन्ही सार्वभौम सभागृह असून, त्यांचा सन्मान केला जाईल. आश्‍वासन देताना, अनिल गोटे यांना मी...
मार्च 31, 2017
नागपूर - भाजपने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना भरमसाट आश्‍वासने दिली. आता त्यांची फसवणूक केली जात आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांपेक्षा मेट्रो रेल्वे व स्मार्ट सिटी जास्त प्रिय आहे, असा आरोप विरोधकांनी केला. सरकारला चले जाव म्हणण्याची हीच वेळ आहे. संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकार...
मार्च 18, 2017
मुंबई - राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पी अधिवेशन सुरू असून, उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून गेल्या नऊ दिवसांपासून विधिमंडळ ठप्प झाले असताना याचा गोंधळाचे अर्थसंकल्पावर सावट पडणार आहे.  गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात 56 हजार कोटींच्या वार्षिक योजना मांडण्यात...