एकूण 16 परिणाम
ऑक्टोबर 31, 2018
आपल्या सरकारच्या कार्यकालाच्या अंतिम वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनेक बिकट आव्हानांचा सामना करावा लागणार आहे आणि हे काम त्यांनी गेल्या चार वर्षांत पेललेल्या आव्हानांपेक्षा निश्‍चितच मोठे आहे. म हाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वी आजच्या तारखेला शपथ...
जुलै 04, 2018
आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वाहून जाता कामा नये. जनतेच्या मूलभूत प्रश्‍नांची खोलात जाऊन चर्चा सभागृहांत व्हायला हवी. मात्र, सत्ताधारी आणि विरोधकांचा पवित्रा पाहता त्याविषयी शंका निर्माण होते. तब्बल ४७ वर्षांनी नागपुरात होत असलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन...
मार्च 14, 2018
गरीब आदिवासी शेतकऱ्यांना जमिनीचे मालकी हक्‍क देणाऱ्या कायद्याची योग्य अंमलबजावणी आवश्‍यक आहे. त्या दिशेने सरकारने उचललेले पाऊल आदिवासींसारख्या दुर्लक्षित घटकाला मोठा दिलासा ठरावा. विधानभवनाला घेराव घालण्याच्या इराद्याने नाशिकपासून दोनशे किलोमीटरची पायपीट करून मुंबईत पोचलेला ‘लाँग मार्च’ राज्य...
डिसेंबर 14, 2017
महाराष्ट्राच्या उपराजधानीतील मंगळवारचा दिवस हा विरोधकांचाच होता! देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी अल्पमतातील सरकार स्थापन केले, तेव्हा शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस या सरकारच्या पाठीशी उभी आहे, असे चित्र निर्माण झाले होते. पुढे महिनाभरात शिवसेना विरोधी बाकांवरून उठून...
ऑक्टोबर 31, 2017
तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी महाराष्ट्रात भाजपचे सरकार सत्तेवर आले. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तरुण चेहरा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाला ही राज्याच्या राजकारणाला वळण देणारी बाब होती. या टप्प्यावर "कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा' हे भाजपचेच प्रचारवाक्‍य विरोधक सरकारला ऐकवतील आणि...
जुलै 17, 2017
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनीचे स्वप्न आजमितीला नेमके काय आहे, ते खरे तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनीचे स्वप्न तर एकच आहे आणि ते म्हणजे नागपूर-मुंबई 'समृद्धी' महामार्ग होता होईल, तेवढी किंमत देऊन पूर्ण करणे! मुख्यमंत्र्यांच्या नेमक्‍या याच स्वप्नाला...
जून 26, 2017
"ऐतिहासिक' असे वर्णन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी 34 हजार कोटींची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. याउपर देणे सरकारला झेपणारे नाही, अशी निर्वाणीची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. राज्याकडील उपलब्ध स्रोतांचा विचार करता त्या चौकटीत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे....
जून 15, 2017
शिवसेनेचा कोणे एके काळी धाक वाटत असे आणि त्याला बाळासाहेब ठाकरे यांचा दराराच कारणीभूत होता. तोच धाक आणि तोच दरारा यांचे रूपांतर पुढे काळाच्या ओघात दहशतीत होऊन गेले आणि आता उद्धव ठाकरे यांच्या जमान्यात शिवसेनेचे रूपांतर टिंगल-टवाळीपुरते मर्यादित होऊन गेले आहे! "येत्या जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय...
जून 13, 2017
शेतकऱ्यांच्या संघटनाचा ऐतिहासिक विजय, या शब्दांत सरकार आणि शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या बैठकीतील फलनिष्पत्तीचे स्वागत करावे लागेल. राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केलेलाच आहे. चर्चेच्या टप्प्यात सारी सूत्रे मंत्रिगटाचे प्रमुख चंद्रकांतदादा पाटील...
जून 06, 2017
खरीप हंगामाची लगबग तोंडावर असताना राज्यातले अन्नदाते शेतकरी एक जूनपासून संपावर गेले. पुणतांबे येथून पडलेल्या ठिणगीचा शिवारात वणवा पेटलाय. तिथल्या काही पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारला प्रतिसाद देणे भाग पडले याचेच...
जून 02, 2017
हिंदी महासागरावर तयार झालेले नैर्ऋत्य मोसमी वारे दीर्घ प्रवास करून आता महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. कृषी क्षेत्राच्या दृष्टीने खरे तर ही सुवार्ता! पेरणीच्या पूर्वतयारीत गुंतलेल्या शेतकऱ्यांसाठी हे धावपळीचे दिवस. प्रत्यक्षात मात्र यंदाच्या पेरणी हंगामाचे चित्र वेगळेच आहे. महाराष्ट्राच्या शिवारात...
मे 19, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत, 10 एप्रिल रोजी झालेल्या "राष्ट्रीय लोकशाही आघाडी'च्या बैठकीत दोन्ही हात शेल्यात बांधून संपूर्ण शरणागती पत्करत शमीच्या झाडावर ठेवलेली आपली शस्त्रास्त्रे शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पुन्हा बाहेर काढली आहेत! "रालोआ'च्या याच बैठकीत 2019...
एप्रिल 13, 2017
एकमेकांच्या विरोधात सातत्याने झोंबणारी शाब्दिक फटकेबाजी करणाऱ्या शिवसेना व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अचानक ‘मिले सूर..’ असे म्हणायला सुरवात केली आहे. यामागचे रहस्य काय, हे लोकांना कळायला हवे.   शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत काढलेल्या, ‘पंतप्रधान...
एप्रिल 06, 2017
शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना वेगवेगळ्या प्रकारे समोर येत असताना सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा तर द्यावाच; पण शेतीच्या मूळ दुखण्याला हात घालणेही अत्यावश्‍यक आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मूल येथे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेते विकासावर...
मार्च 24, 2017
सभागृहातील गोंधळाचे आणि वादग्रस्त निर्णयांचे समर्थन ज्या पद्धतीने केले जात आहे त्यामुळे सर्वच पक्षांची स्वतंत्र विचारशक्‍ती गोठून गेली आहे की काय, अशी शंका येते.परस्परांकडे बोट दाखवण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल. महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्‍नावरून १०-११ दिवस ठप्प...
मार्च 19, 2017
विरोधी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह सत्तारूढ शिवसेनेने लावून धरलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीमुळे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अखेर विधिमंडळात सादर झाला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाब्दिक फुलोरा फुलवत आणि विरोधकांना टपल्या मारत मांडलेल्या या अर्थसंकल्पात...