एकूण 272 परिणाम
डिसेंबर 10, 2019
इतर पक्षांतून फोडलेल्या आमदारांना पोटनिवडणुकीत निवडून आणण्यात भाजप यशस्वी ठरल्याने कर्नाटकातील येडियुरप्पा यांच्या सरकारचा धोका टळला आहे. भारतीय जनता पक्षाने ‘ऑपरेशन लोटस’ नावाने विरोधी पक्ष फोडण्याची मोहीम राबवत पादाक्रांत केलेल्या कर्नाटकातील सत्तेवर तेथील पोटनिवडणुकांच्या निकालांनी शिक्‍कामोर्तब...
डिसेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तांतराच्या पार्श्‍वभूमीवर भाजपमध्ये सुरू झालेली खदखद राजकारणाच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी ‘पार्टी विथ डिफरन्स’मध्ये सारे काही आलबेल नसल्याचे सांगणारी आहे. गेली चारेक वर्षे प्रमुख मंडळींपैकी एकनाथ खडसे तेवढे स्वपक्षाच्या सरकारवर नाराज होते. तुलनेत नाथाभाऊंचे मंत्रिपद जरा लवकर...
डिसेंबर 02, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या दुसऱ्या  कार्यकाळात 30 नोव्हेंबर रोजी सहा महिने पूर्ण केले आहेत. या सहा महिन्यांत सरकारने अनेक ऐतिहासिक आणि परिवर्तनात्मक निर्णय घेतले. हे निर्णय विशेषतः गरीब, वंचित, शेतकरी, महिला, युवक, मध्यमवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती यांच्या जीवनाला...
डिसेंबर 02, 2019
अर्थव्यवस्था सुस्थितीत नाही, हे मान्य करण्यास सरकार तयार नाही. ही तात्पुरती स्थिती आहे आणि आर्थिक चक्राचा व बदलाच्या प्रक्रियेचा हा भाग असल्याचे सांगून त्याचे गांभीर्य नाकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या प्रश्‍नांवरून जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्याचे प्रकार सुरू आहेत...
नोव्हेंबर 28, 2019
महाराष्ट्रात जे राजकीय महाभारत घडले, ते बघता या निवडणुकीची नोंद दोन कारणांनी बखरकारांना घ्यावी लागेल. शरद पवार यांची राज्याच्या राजकारणावरील हुकमत ही एक ठळक बाब! त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष आणि त्या पक्षाचे बडे नेते यांचा झालेला मुखभंग. गेल्या शनिवारी रामप्रहरी देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांचा...
नोव्हेंबर 25, 2019
राज्यसभेच्या २५०व्या सत्र किंवा अधिवेशनानिमित्त एक दिवसाचे चर्चासत्र राज्यसभेत झाले. त्या वेळी बोलताना पंतप्रधानांसह अनेक मान्यवर सदस्यांनी राज्यसभेचे महत्त्व विशद केले. पंतप्रधानांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत भाषण करताना राज्यसभेचे गुणगान केले. ‘राज्यसभा एक तरह से चेक्‍स अँड बॅलन्स का विचार उसके...
नोव्हेंबर 18, 2019
महाराष्ट्र, हरियाना विधानसभा निवडणुकीनंतर आता झारखंड विधानसभेचे वेध लागले आहेत. झारखंड विधानभेची निवडणूक पाच टप्प्यांत होत असून, त्याचा निकाल २३ डिसेंबरला लागणार आहे. राज्यातील ८१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर होत...
नोव्हेंबर 18, 2019
सूत्रे म्हणजे काय? याविषयी थोडके चिंतन आज आपण करू. सूत्रे म्हणजे संस्कृत साहित्य व व्याकरणातील किंवा तत्त्वज्ञानातील काही नीतिनियम असे म्हटले जाते; पण तो एक गैरसमज आहे. उपनिषदांचे अन्वयार्थ सांगणारी अनेक सूत्रे समाधी, साधना, विभूती आणि कैवल्य अशा चार पदांमध्ये विभागलेली आहेत, असे जरी प्राचीन...
नोव्हेंबर 17, 2019
ब्रिटिश राजवटीच्या काळात क्रांतिकारकांना आश्रय देणारे एक खासगी घर ताब्यात घेऊन त्याला वारसा दर्जा देण्याचा निर्णय पश्‍चिम बंगाल सरकारने केला आहे. विख्यात बंगाली क्रांतिकारक बटुकेश्‍वर दत्त यांनी या घरात आश्रय घेतला होता. केंद्र आणि राज्य वादातून सरकारने हा निर्णय केला आहे. वर्धमान जिल्ह्यातील ओआरी...
नोव्हेंबर 17, 2019
कर्नाटकातील पोटनिवडणूक जेवढी भाजपसाठी महत्त्वाची आहे तेवढीच ती काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी (जेडीएस) प्रतिष्ठेची आहे. भाजपला सत्तेवरील मांड भक्कम करावयाची आहे. काँग्रेसला आणखी मजबूत बनायचे आहे, तर जास्तीत जास्त जागा मिळवून ‘जेडीएस’ला बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे. जो जास्त जागा जिंकेल, तो...
नोव्हेंबर 17, 2019
आपल्या समान शत्रूविरोधात भाजप आणि डाव्यांची युती होऊ शकते, तर मग आता काँग्रेस ते का करू शकत नाही? तसंही आता काँग्रेसकडे फारसं काही गमावण्यासारखं उरलेलं नाहीच. युद्ध असो अथवा राजकारण, दोन्ही घटकांना एक जुनी म्हण चपखलपणे लागू पडते आणि ती म्हणजे ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो’; पण तुम्ही...
नोव्हेंबर 16, 2019
तीन पक्षांनी एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार करायचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचा एकमेव कार्यक्रम मुख्यमंत्रिपद आहे. पण, त्यासाठी तयार होणाऱ्या या आघाडीत समानता कशी आणावी, याचा विचार अन्य दोघे करीत आहेत. ही सगळी नवी गणिते जुळतील, की फिसकटतील याविषयीची अनिश्‍चितता कायम आहे. चार आठवडे उलटले...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून सर्वच पक्षांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला तो निव्वळ अशोभनीय म्हणावा लागेल. या साऱ्या घटनांचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या केवळ राजकारणावरच नव्हे, तर समाजकारणावरही होतील, यात शंका नाही.  महाराष्ट्रात अपेक्षेप्रमाणेच अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली....
नोव्हेंबर 13, 2019
सुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे.  आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा...
नोव्हेंबर 08, 2019
सरकार स्थापन व्हायचेच असेल तर ते शिवसेना वा भाजप यांनी आपल्या अहंकाराला तिलांजली दिली तरच होऊ शकते. अर्थात, या दोन पक्षांपैकी कोण पहिले पाऊल मागे घेते, यावरच महाराष्ट्राचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन पंधरवडा उलटल्यानंतरही राज्यात नवे सरकार...
नोव्हेंबर 05, 2019
प्रदूषणामुळे दिल्लीत ‘आरोग्य आणीबाणी’ जाहीर करावी लागल्याने ही धोक्‍याची घंटा समजून दिल्ली आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे पावले उचलण्याची गरज आहे. पण त्याऐवजी प्रदूषणाचे राजकारण करण्यातच राजकीय पक्ष दंग आहेत. भारताच्या राजधानीत राजकीय प्रदूषण किती आहे, हा वादाचा विषय होऊ शकतो! मात्र, गेले काही दिवस...
नोव्हेंबर 02, 2019
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता आठवडा उलटून गेला असला, तरीही नवे सरकार स्थापन होणे तर सोडाच; त्यासंबंधातील साधी चर्चाही भारतीय जनता पक्ष व शिवसेना या महायुतीमधील दोन प्रमुख पक्षांदरम्यान सुरू झालेली नाही. ही निवडणूक या दोन पक्षांनी अन्य छोट्या पक्षांशी आघाडी करून लढवली...
नोव्हेंबर 01, 2019
महाराष्ट्र आणि हरियाना विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या जागा २०१४ च्या तुलनेत कमी झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यांत भाजपला स्वबळावर बहुमत मिळविता आलेले नाही. थोडक्‍यात, भाजपला जनतेने पाय जमिनीवर ठेवून विचार करण्यास भाग पाडले आहे. निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेत्यांनी काश्‍मीर, ‘एनआरसी’...
सप्टेंबर 29, 2019
केरळमध्ये लोकसभा निवडणुकीवेळी वाहत असलेले वारे आता उलट्या दिशेने वाहू लागले आहे. डाव्यांना लोकसभा निवडणुकीत केरळ राज्यात सत्ताधारी असूनही मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला होता. आता जनमत पुन्हा डाव्यांकडे वळू लागल्याची चिन्हे आहेत. बदलाचे निदर्शक असणारे हे वारे पाला या मतदारसंघातून सुरू झाले आहे....
सप्टेंबर 23, 2019
कोणत्याही निवडणुकीत सरकारचा कारभार आणि जनतेला भेडसावणारे प्रश्‍न यांची साधकबाधक चर्चा व्हावी, अशी अपेक्षा असते. पण, लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजप भावनिक आणि राष्ट्रवादाच्या भावनिक मुद्द्यांवर भर देत असून, विरोधकांना त्यामागे फरफटत जावे लागत आहे. जागावाटपावरून तणातणी सुरू असली, तरी ‘युती’ होण्याची...